Thursday, January 22 2026 | 04:39:55 PM
Breaking News

ॲक्सिस बँकेने वाढत्या डिजिटल फसवणुकीला आळा घालण्यासाठी ग्राहकांच्या नियंत्रणाखालील सुरक्षा सुविधांसह ‘सेफ्टी सेंटर’ सुरू केले

Connect us on:

ग्राहकांना रिअल-टाइममध्ये पूर्णतः नियंत्रित करता येणाऱ्या सुरक्षा सुविधांद्वारे सक्षम करते
एसएमएस शिल्ड : बँकेकडून येणाऱ्या संदेशांची सत्यता तपासण्यासाठीचे देशातील पहिलेच साधन
सूक्ष्म (ग्रॅन्युलर) नियंत्रण : इंटरनेट बँकिंगचा ॲक्सिस बंद करणे, पैसे हस्तांतरण रोखणे, यूपीआय मर्यादित करणे, व्यवहार मर्यादा ठरवणे, नवीन लाभार्थी (पेयी) जोडण्यास प्रतिबंध
स्तरित सुरक्षा, भविष्यकालीन क्षमता आणि उपाययोजनांसह बँकेच्या ‘सेफ बँकिंग’ उपक्रमाला अधिक बळ देते

नागपूर, जानेवारी 2026: भारतातील आघाडीच्या खासगी क्षेत्रातील बँकांपैकी एक असलेल्या ॲक्सिस बँकने आपल्या ओपन या ॲक्सिस मोबाइल बँकिंग ॲपवर नवीन ‘सेफ्टी सेंटर’ सुरू केल्याची घोषणा केली. हे सुरक्षा केंद्र ग्राहकांना रिअल-टाइममध्ये, स्वतःच्या नियंत्रणाखालील सुरक्षा सुविधा उपलब्ध करून देते. त्यामुळे ग्राहकांना ग्राहकसेवेशी संपर्क साधण्याची किंवा शाखेत भेट देण्याची गरज न पडता, अनधिकृत किंवा संशयास्पद हालचालींपासून आपल्या खात्यांचे संरक्षण करता येणार आहे.

‘सेफ्टी सेंटर’ द्वारे डिजिटल बँकिंगमधील महत्त्वाच्या सुविधांवर सूक्ष्म (ग्रॅन्युलर) नियंत्रण मिळते. ग्राहक आपल्या वापराच्या सवयी आणि सोयीप्रमाणे सुरक्षा सेटिंग्ज सानुकूल करू शकतात. यातील प्रमुख सुविधा पुढीलप्रमाणे — एसएमएस शिल्ड: उद्योगातील पहिलीच सुविधा जे बँकेकडून आलेल्या एसएमएसचा सेंडर आयडी ॲक्सिस बँकच्या अधिकृत आयडीशी पडताळून संदेशाची सत्यता तपासते.

इंटरनेट बँकिंग बंद करणे: गरज नसल्यास इंटरनेट बँकिंगचा प्रवेश पूर्णतः निष्क्रिय करता येतो. निधी हस्तांतरण थांबवणे: एका क्लिकमध्ये मोबाईल बँकिंग आणि इंटरनेट बँकिंगमधील सर्व निधी हस्तांतरण सुविधा तात्काळ बंद करता येतात. नेट बँकिंगद्वारे ऑनलाइन खरेदी रोखते: हे फीचर नेट बँकिंगला पेमेंट मोड म्हणून वापरणाऱ्या थर्ड-पार्टी अँप्स (उदा. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्स) मार्फत सुरू होणारे व्यवहारही ब्लॉक करते.

यूपीआय पेमेंट्स थांबवणे: ॲक्सिस मोबाईल ॲपद्वारे होणारे यूपीआय व्यवहार मर्यादित/बंद करता येतात. नवीन लाभार्थी (पेयी) जोडण्यास प्रतिबंध: केवळ पूर्व-मंजूर लाभार्थ्यांनाच निधी पाठवता येईल, याची खात्री. निधी हस्तांतरण व यूपीआयसाठी मर्यादा ठरवणे: प्रति-व्यवहार मर्यादा निश्चित करता येतात. उच्च रकमेच्या व्यवहारांसाठी अतिरिक्त प्रमाणीकरण आवश्यक राहील.

‘सेफ्टी सेंटर’मुळे सुरक्षा सेटिंग्ज तात्काळ सक्रिय होतात आणि कोणताही प्रतीक्षा कालावधी न ठेवता बदल लगेच लागू होतात. यामुळे वापरकर्त्यांना पूर्ण नियंत्रण मिळते आणि कोणत्याही बाह्य मदतीशिवाय ते आपल्या खात्यांची सक्रियपणे सुरक्षा करू शकतात. निवडक ब्लॉकिंग आणि रिअल-टाइम नियंत्रणाच्या सुविधांमुळे डिजिटल फसवणुकीचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो. तसेच, शाखा किंवा कॉल सेंटरवरील अवलंबित्व कमी झाल्याने कार्यक्षमता वाढते, समस्या जलद सुटतात आणि सलग, सुरळीत बँकिंग अनुभव मिळतो.

या उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी बोलताना समीर शेट्टी, ग्रुप एक्झिक्युटिव्ह – डिजिटल बिझनेस, ट्रान्सफॉर्मेशन अँड स्ट्रॅटेजिक प्रोग्राम्स, ॲक्सिस बँक म्हणाले, “ॲक्सिस बँकेने नेहमीच ग्राहकांच्या सुरक्षिततेला आपल्या डिजिटल-फर्स्ट दृष्टिकोनाचा कणा मानले आहे”. ‘सेफ्टी सेंटर’मुळे डिजिटल फसवणुकीत झालेल्या वाढीला आळा घालण्यासाठी ग्राहकांना त्यांच्या बँकिंग सुरक्षेवर रिअल-टाइम नियंत्रण देण्याचा ठोस टप्पा आम्ही उचलला आहे. स्तरित सुरक्षा आणि एसएमएस शिल्ड तसेच इन-ॲप मोबाईल ओटीपीसारख्या प्रगत प्रमाणीकरण सुविधांद्वारे आम्ही संरक्षण अधिक बळकट करत आहोत. यामुळे बाह्य नेटवर्कवरील अवलंबित्व कमी होत असून, अखंड प्रवेश सुनिश्चित होतो. मजबूत सुरक्षा आणि सहज अनुभव यांचा मेळ घालणाऱ्या या नवकल्पनांमुळे डिजिटल बँकिंग अधिक सोपे व विश्वासार्ह ठरते. भविष्यासाठी सज्ज क्षमता अंतर्भूत करून, बदलत्या धोका-परिस्थिती आणि ग्राहकांच्या अपेक्षांनुसार विकसित होणारी सुरक्षित बँकिंग परिसंस्था उभारण्याचा आमचा उद्देश आहे.”

हा उपक्रम ॲक्सिस बँकच्या सेफ बँकिंग उपक्रमाला अधिक बळ देणारा ठरतो. या उपक्रमांतर्गत उद्योगातील पहिल्यांदाच सादर करण्यात आलेल्या ‘लॉक एफडी’सारख्या सुविधांचा समावेश आहे, ज्यामुळे डिजिटल माध्यमांतून मुदत ठेवी (एफडी) अकाली बंद होण्यास प्रतिबंध होतो. तसेच ‘इन-ॲप मोबाईल ओटीपी’द्वारे ॲपमध्येच वेळाधारित ओटीपी निर्माण होत असल्याने एसएमएस ओटीपीशी संबंधित फसवणुकीचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो.

डिजिटल बँकिंगचा स्वीकार झपाट्याने वाढत असताना, ग्राहक-केंद्रित नवकल्पनांद्वारे अॅक्सिस बँक या क्षेत्रात नेतृत्व कायम राखत आहे. सुरक्षित, लवचिक आणि भविष्यासाठी सज्ज बँकिंग अनुभव देण्यावर बँकेचा सातत्यपूर्ण भर आहे.

About Matribhumi Samachar

Check Also

सेव्हलाइफ फाउंडेशन आणि पार्ले बिस्किट्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून नागपूरमधील ग्रामीण रुग्णालयांना गंभीर शस्त्रक्रिया उपकरणे सुपूर्द

रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्या उच्च-जोखीम असलेल्या कॉरिडॉरवर असलेल्या रुग्णालयांमध्ये आपत्कालीन वैद्यकीय आणि ट्रॉमा केअर सेवा …