Wednesday, January 07 2026 | 10:03:43 PM
Breaking News

दूरदर्शनसाठी अभिमानाचा क्षण : भारत निवडणूक आयोगाच्यावतीने मतदार जागृतीसाठीच्या इलेक्ट्रॉनिक माध्यम (दूरचित्रवाणी) वर्गवारीतल्या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मान

Connect us on:

मतदार जागृती आणि मतदार साक्षरतेविषयक सर्व पैलू व्यापणारी मोहीम राबवल्याबद्दल दूरदर्शनला भारत निवडणूक आयोगाच्या वतीने दिल्या  जाणाऱ्या  इलेक्ट्रॉनिक माध्यम (दूरचित्रवाणी) वर्गवारीतल्या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने आज सन्मानित केले गेले. ही माहिती सामायिक करताना दूरदर्शनला प्रचंड अभिमान वाटतो आहे. दूरदर्शनने लोकसभा निवडणूक 2024 च्या काळात “चुनाव का पर्व देश का गर्व” या मालिकेसह, प्रभावी प्रसारण केले होते, आणि या माध्यमातून माहितीच्या आधारे तसेच जबाबदारीने मतदान करण्याचे महत्व अधोरेखित केले होते. दूरदर्शनच्या याच प्रयत्नांची दखल घेत हा पुरस्कार प्रदान केला गेला आहे.

लोकसभा निवडणूक 2024 च्या काळात दूरदर्शनने देशभरात ही मोहीम राबवली. या मोहिमेतून दूरदर्शनची माहितीसंपन्न आणि सक्रिय नागरिक घडवण्याची वचनबद्धता दिसून आली. दूरदर्शनने राबवलेले ठळक उपक्रम खाली नमूद केले आहेत. :

• नाविन्यपूर्ण कार्यक्रमांचे प्रसारण:  मतदार साक्षरतेविषयी 30 लघुपटांची निर्मिती आणि प्रसारण.

• बहुभाषिक प्रसार: डीडी नॅशनल, डीडी इंडिया आणि डीडी न्यूज

या वाहिन्यांच्या माध्यमातून व्यापक प्रसार, याद्वारे पोहचवायचा संदेश देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचेल याची सुनिश्चित केली गेली.

• लक्ष वेधून घेणाऱ्या जाहिराती: लक्षावधी लोकांना लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्याकरता प्रेरित करण्याच्या उद्देशाने लक्ष  वेधून घेणाऱ्या L-band जाहिराती,  कप (Mug) ब्रँडिंग आणि जाहिराती (45 सेकंद / स्पॉट्स) असे उपक्रम राबवले गेले.

About Matribhumi Samachar

Check Also

एडीएद्वारे आयोजित दोन दिवसीय ‘एअरोनॉटिक्स 2047’राष्ट्रीय चर्चासत्राला बंगळुरुमध्ये प्रारंभ

एअरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी (एडीए) द्वारे आयोजित ‘एअरोनॉटिक्स 2047’या दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राला  बंगळुरूच्या सेंटर फॉर एअरबोर्न …