Wednesday, December 24 2025 | 04:39:08 AM
Breaking News

भारत-ब्रिटन सहकार्य मजबूत करणे हे हरित हायड्रोजनवरील कार्यशाळेचे उद्दिष्ट

Connect us on:

नवी दिल्‍ली, 6 फेब्रुवारी 2025. हरित हायड्रोजन उत्पादन आणि नियमनाच्या माध्यमातून हायड्रोजन मानकीकरणावरील भारत-ब्रिटन सहकार्य मजबूत करण्याच्या उद्देशाने, भारतीय मानक ब्युरोने, बीएसआय (ब्रिटिश मानक संस्था) आणि ब्रिटन सरकारचे परराष्ट्र, राष्ट्रकुल आणि विकास कार्यालय (एफसीडीओ) यांच्या सहकार्याने नवी दिल्ली येथे हरित हायड्रोजनवर   दोन दिवसीय भारत-ब्रिटन मानक भागीदारी कार्यशाळेचे आयोजन केले होते.

स्वच्छ ऊर्जा संक्रमण साध्य करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याला चालना देण्याच्या दिशेने हरित हायड्रोजनवरील भारत-ब्रिटन मानक भागीदारी कार्यशाळा हा एक मैलाचा दगड आहे. शाश्वत हायड्रोजन बाजारपेठ उभारण्यासाठी ज्ञानाची देवाणघेवाण, प्रमाणीकरण आणि नवोन्मेष महत्त्वाचे असल्याचा हा दाखला आहे, असे कार्यशाळेमध्ये बीएसआयच्या  ऊर्जा क्षेत्र प्रमुख ॲबे डोरियन यांनी सांगितले.

“हरित हायड्रोजनमध्ये अग्रणी  बनण्याची आणि  निव्वळ शून्य(उत्सर्जन) भविष्याच्या ध्येयाला बळ देण्याची भारत आणि ब्रिटनची सामायिक महत्त्वाकांक्षा आहे” असे त्या म्हणाल्या.

हा कार्यक्रम ब्रिटन सरकारच्या मानके भागीदारी कार्यक्रमाच्या  व्यापक उपक्रमांचा  एक भाग असून त्याचा उद्देश विकासाला गती देण्यासाठी, गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी आणि व्यापार वाढवण्यासाठी भारतामध्ये आंतरराष्ट्रीय मानकांचा वापर वाढवणे हा आहे. हा कार्यक्रम सुरक्षित, व्यापक आणि जागतिक स्तरावर सामंजस्यपूर्ण नियमन , संहिता आणि मानके यावर  भर देतो.  हा कार्यक्रम फास्ट-ट्रॅक पीएएस (सार्वजनिकरित्या उपलब्ध निर्देश ) मानके आणि जागतिक हायड्रोजन प्रमाणीकरण  स्वीकारण्यावर केंद्रित होता.

हा कार्यक्रम राष्ट्रीय हरित हायड्रोजन अभियान  अंतर्गत बीआयएसच्या प्रयत्नांना देखील  बळ देतो.  यामुळे मानकांमधील तफावत  ओळखण्यात, नवीन क्षेत्रे शोधण्यात आणि तज्ञांशी संपर्क साधण्यात मदत झाली. जागतिक सर्वोत्तम पद्धतींमधील माहिती आणि सूचना भारताचे प्रमाणीकरण, चाचणी आणि मानकीकरण वृद्धिंगत करतील आणि शाश्वत व स्पर्धात्मक हरित हायड्रोजन अर्थव्यवस्थेला सहाय्य करतील.

या कार्यक्रमात भारत आणि ब्रिटनमधील धोरणकर्ते, तांत्रिक तज्ञ आणि उद्योजकांनी माहितीपूर्ण चर्चा केली . कार्यशाळेचे उद्घाटन बीआयएस चे उपमहासंचालक (मानकीकरण-I) राजीव शर्मा,  हवामान आणि ऊर्जा प्रमुख (ब्रिटिश उच्चायुक्तालय) लॉरा आयलेट आणि बीएसआयच्या ऊर्जा क्षेत्र प्रमुख, ॲबे डोरियन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी हरित हायड्रोजन क्षेत्रात नवोन्मेष  आणि शाश्वततेला चालना देण्याचा  भारत आणि ब्रिटनचा  सामायिक दृष्टीकोन अधोरेखित केला.

About Matribhumi Samachar

Check Also

पारंपरिक औषधोपचारांवरील जागतिक आरोग्य संघटनेच्या दुसऱ्या जागतिक शिखर परिषदेच्या समारोप समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले संबोधित

​पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम इथे पारंपरिक औषधोपचारांवरील जागतिक आरोग्य संघटनेच्या …