Sunday, December 21 2025 | 05:51:46 AM
Breaking News

सचिव संजय जाजू यांची राष्ट्रीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्था (FTII) तसेच राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (NFAI) भेट

Connect us on:

पुणे,  2 जुलै 2025. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी आज पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्था अर्थात ‘फिल्म अँड टेलिव्हिजन इंस्टीट्युट ऑफ इंडिया’ (FTII) ला भेट दिली.

या भेटीत त्यांनी संस्थेतील सर्व विभागांमध्ये जाऊन संस्थेमध्ये चालणाऱ्या कामकाजाची तसेच प्रशिक्षणाची माहिती घेतली; तसेच उपस्थित विद्यार्थ्यांसोबत व शिक्षक वर्गासोबत देखील त्यांनी संवाद साधला.

या पहिल्या सत्रातील भेटीनंतर त्यांनी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या (NFAI) पुण्याच्या कोथरूड भागातील परिसराला देखील भेट दिली.

यावेळी राष्ट्रीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्थेचे संचालक धीरज सिंग, राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी) चे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम, केंद्रीय संचार ब्युरो, पुणेचे उपसंचालक व प्रमुख निखील देशमुख, राष्ट्रीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्थेचे निबंधक प्रतिक जैन तसेच आकाशवाणी वृत्त विभागाचे प्रमुख, सहायक संचालक माधव जायभाये उपस्थित होते.

About Matribhumi Samachar

Check Also

केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयातर्फे (एमओएचयुए) 10 व्या स्वच्छ सर्वेक्षणाची सुरुवात

नवी दिल्ली 20 डिसेंबर 2025. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री मनोहर लाल यांनी आज मध्यप्रदेशात …