पणजी, 6 ऑगस्ट 2025
केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सेंट्रल ब्युरो ऑफ कम्युनिकेशन (सीबीसी) गोवा, आणि न्यूट्रिशन सोसायटी ऑफ इंडिया – गोवा विभाग आणि गोवा कॉलेज ऑफ होम सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने,आज, दिनांक 6 ऑगस्ट रोजी मिरामार येथील धेम्पे कला आणि विज्ञान महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताह 2025चे औचित्य साधून एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
धेंपे महाविद्यालयामधील आरोग्य केंद्राच्या समन्वयाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे उद्दिष्ट, स्तनपानाचे महत्त्व अधोरेखित करत माता आणि नवजात शिशूंसाठी शाश्वत आधार व्यवस्था उभारण्याच्या दृष्टीने जागरूकता निर्माण करणे हे होते.

सीबीसी गोवा येथील प्रचार अधिकारी रियास बाबू यांच्या उद्घाटनपर भाषणाने या सत्राचा आरंभ झाला. धेम्पे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एस. रामू मूर्ती यांनीही उपस्थितांना संबोधित केले आणि माता आणि बाल आरोग्याला प्रोत्साहन देण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
R8TE.jpeg)
न्यूट्रिशन सोसायटी ऑफ इंडिया – गोवा विभागाच्या निमंत्रक आणि गोवा कॉलेज ऑफ होम सायन्सच्या सहाय्यक प्राध्यापक वर्षा नाईक यांनी या वर्षीच्या जागतिक स्तनपान सप्ताहाची संकल्पना “स्तनपानाला प्राधान्य द्या: शाश्वत आधार व्यवस्था निर्माण करा”,यावर माहितीपूर्ण पॉवरपॉइंट सादरीकरण केले
त्यांनी स्तनपान देणाऱ्या मातांना समुदाय, आरोग्यसेवा आणि धोरणात्मक चौकटींद्वारे पाठिंबा देण्याच्या सामाजिक जबाबदारीवर भर दिला.

या कार्यक्रमात सत्तरहून अधिक विद्यार्थिनींनी उत्साहाने सहभाग घेतला,तसेच प्रश्नोत्तरांच्या सत्रात सक्रिय सहभाग घेतला आणि पोषण आणि बालसंगोपनाच्या विविध पैलूंवरील माहिती मिळवली.
28Q9.jpeg)
शिक्षण आणि समर्थनाद्वारे निरोगी भारत निर्माण करण्यातील त्यांच्या योगदानाची प्रशंसा करत सीबीसीने वर्षा नाईक यांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान केला.
Matribhumi Samachar Marathi

