Thursday, January 15 2026 | 05:34:27 AM
Breaking News

श्री सत्य साईबाबा यांच्या शताब्दी समारंभानिमित्त आयोजित विशेष सत्रात राष्ट्रपतींची उपस्थिती

Connect us on:

नवी दिल्ली , 22 नोव्हेंबर 2025. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज (22 नोव्हेंबर 2025) आंध्र प्रदेशातील प्रशांती निलयम, पुट्टपर्थी येथे श्री सत्य साईबाबांच्या शताब्दी सोहळ्यानिमित्त आयोजित विशेष सत्रात सहभागी झाल्या होत्या.

याप्रसंगी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की, प्राचीन काळापासून आपले संत आणि ऋषी त्यांच्या कृती आणि शब्दांद्वारे समाजाला मार्गदर्शन करीत आले आहेत. या महान आत्म्यांनी समाजाच्या कल्याणासाठी असंख्य कार्ये केली आहेत. अशा महान व्यक्तिमत्त्वांमध्ये श्री सत्य साई बाबा यांचे विशेष स्थान आहे. त्यांनी नेहमीच समाजाच्या कल्याणासाठी काम केले.श्री सत्य साई बाबा यांनी “मानवतेची सेवा हीच ईश्वराची सेवा” या विश्वासावर भर दिला आणि त्यांच्या भक्तांना या आदर्शाचे पालन करण्यास प्रोत्साहित केले. त्यांनी अध्यात्माला निःस्वार्थ सेवा आणि वैयक्तिक परिवर्तनाशी जोडले, लाखो लोकांना सेवेचा मार्ग अवलंबण्यास प्रेरित केले.

राष्ट्रपती म्हणाल्या की श्री सत्य साई बाबांनी असंख्य सामाजिक कल्याणकारी कामे करून आदर्शांना  वास्तवात रूपांतरित करण्याचे उदाहरण घालून दिले आहे. श्री सत्य साई सेंट्रल ट्रस्ट विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे मोफत शिक्षण उपलब्ध करून देते, जे शैक्षणिक उत्कृष्टतेशी चारित्र्य निर्माणाची सांगड घालते. शिक्षणाबरोबरच मोफत दर्जेदार वैद्यकीय सेवेद्वारे सत्य साई बाबांचे ध्येय देखील पुढे नेले जात आहे. या प्रदेशातील हजारो दुष्काळग्रस्त गावांना पिण्याचे पाणी पुरवणे हादेखील त्यांच्या दूरदृष्टीचा परिणाम असल्याचे त्यांनी सांगितले.

राष्ट्रपती म्हणाल्या की सत्य साईबाबांचे “सर्वांवर प्रेम करा, सर्वांची सेवा करा” आणि “सर्वकाळ मदत करा, कधीही कुणाला दुखवू नका” हे संदेश शाश्वत आणि वैश्विक आहेत. त्यांचा असा विश्वास होता की जग ही आपली शाळा आहे आणि सत्य, नैतिकता, शांती, प्रेम आणि अहिंसा ही पाच मानवी मूल्ये आपला अभ्यासक्रम आहेत. मानवी मूल्यांबद्दलची त्यांची शिकवण सर्व संस्कृती आणि सर्व काळासाठी खरी आहे.

राष्ट्रपती म्हणाल्या की, ‘राष्ट्र प्रथम’ या भावनेनुसार राष्ट्र उभारणी हे सर्व संघटनांचे कर्तव्य आहे. आध्यात्मिक संघटना यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतात.

About Matribhumi Samachar

Check Also

आणि यशाचा गुलाल उधळला, कामाला जाऊन केला अभ्यास

अमरावती. एका ध्येय वेड्या युवकाने खेडेगावात राहून कठोर परिश्रम घेऊन परीक्षा उत्तीर्ण केली मात्र, परीक्षा वादाच्या …