Monday, December 08 2025 | 10:53:34 AM
Breaking News

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे केले स्मरण

Connect us on:

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त पं‌तप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांचे स्मरण केले.

मुखर्जी हे एक उत्कृष्ट राजकारणी होते, तसेच उत्तम प्रशासक होते देशाच्या विकासातील त्यांच्या योगदानाची पंतप्रधान मोदी यांनी प्रशंसा केली.

पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावरच्या एका संदेशात म्हटले आहे :

“श्री प्रणव मुखर्जी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र आदरांजली. प्रणव बाबू एकमेवेद्वितीय सार्वजनिक व्यक्तिमत्त्व होते तसेच ते एक उत्कृष्ट राजकारणी, एक अद्भुत प्रशासक आणि ज्ञानाचे भांडार होते. भारताच्या विकासातील त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. त्यांना एखाद्या मुद्यावर संपूर्ण लोकांमध्ये एकमत निर्माण करण्याच्या अनोख्या क्षमतेचे वरदान लाभले होते. हे वरदान त्याना त्यांच्या विपुल अनुभवातून, शासन आणि भारताच्या संस्कृतीबद्दलची सखोल ज्ञान यामुळे लाभले होते. आपल्या राष्ट्राबाबतची त्यांची दृष्टी प्रत्यक्षात साकार करण्यासाठी आम्ही काम करत राहू.”

About Matribhumi Samachar

Check Also

देशभरातल्या किनारी राज्यांसाठी मत्स्यपालन सहकारी संस्थांसाठी प्रगत क्षमता बांधणी कार्यक्रमाचे व्हॅम्निकॉमकडून आयोजन

वैकुंठभाई मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेने (व्हॅमनिकॉम), नव्या नोंदणीकृत मत्स्यपालन सहकारी संस्थांसाठी सहकारी संस्थांचे प्रशासन …