Friday, January 09 2026 | 11:55:23 AM
Breaking News

ए. के. बालासुब्रमणयन यांनी स्वीकारली मुंबईतील अणुऊर्जा नियामक परिषदेच्या अध्यक्षपदाची सूत्रे

Connect us on:

प्रख्यात शास्त्रज्ञ ए. के. बालासुब्रमणयन यांनी  01   जानेवारी  2026  रोजी मुंबईतील अणुऊर्जा नियामक परिषद  (एईआरबी) अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. त्यांनी डॉ. डी. के. शुक्ला यांच्याकडून पदभार घेतला.

एईआरबीमध्ये दाखल होण्यापूर्वी बालासुब्रमणयन यांनी प्रकल्प डिझाईन सुरक्षा समितीचे अध्यक्षपद भूषवले. (ही समिती प्रेशराईज्ड हेवी वॉटर रिअॅक्टर – पीएचडब्ल्यूआर आधारित अणुऊर्जा प्रकल्पांसाठी आहे).

ए. के. बालसुब्रमण्यन हे एक प्रतिष्ठित शास्त्रज्ञ असून, ते अणु अभियांत्रिकीचे प्रशिक्षण घेतलेले यांत्रिकी शाखेचे  अभियंता आहेत इंडियन नॅशनल अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगचे ते फेलो आहेत.

श्री .केबालासुब्रमणयनअध्यक्षपरमाणु ऊर्जा नियामक परिषद

Shri A.K. Balasubrahmanian, Chairman, Atomic Energy Regulatory Board

परमाणु ऊर्जा नियामक परिषदमुंबई

Atomic Energy Regulatory Board, Mumbai

अणुऊर्जा प्रकल्पांची रचना, विकास, सुरक्षा मूल्यांकन, बांधकाम व कार्यान्वयन या सर्व क्षेत्रांत त्यांना जवळपास 40 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी पीएचडब्ल्यूआर अणुभट्ट्यासांठी व्यवस्थापन धोरण तयार केले आहे. त्यातील उपकरणे जसजशी जुनी होतात, त्यांची सुरक्षितता आणि कार्यक्षमता टिकवण्यासाठी आखलेली तपासणी, देखभाल आणि सुधारणा यांची व्यवस्थापन योजना विकासात त्यांना व्यापक अनुभव आहे.  तसेच पहिल्यांदाच तयार केलेल्या प्रणालींच्या नवोन्मेषी रचनांमध्ये, सुरक्षा वैशिष्ट्यांमध्ये आणि स्वदेशीकरणाच्या प्रयत्नांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यामुळे ते अणुभट्टी  तंत्रज्ञानातील उल्लेखनीय  तज्ज्ञ मानले जातात. पीएचडब्ल्यूआर व्यतिरिक्त इतर अणुभट्टी (रिअॅक्टर) तंत्रज्ञानातही त्यांना चांगले ज्ञान आहे.

पूर्वी ते न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (एनपीसीआयएल-भारतीय अणुऊर्जा महामंडळ ) च्या संचालक (तांत्रिक) पदावर कार्यरत होते. त्यांनी अणुभट्टी तंत्रज्ञान व सुरक्षा यावर अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग घेतला आहे.

About Matribhumi Samachar

Check Also

एडीएद्वारे आयोजित दोन दिवसीय ‘एअरोनॉटिक्स 2047’राष्ट्रीय चर्चासत्राला बंगळुरुमध्ये प्रारंभ

एअरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी (एडीए) द्वारे आयोजित ‘एअरोनॉटिक्स 2047’या दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राला  बंगळुरूच्या सेंटर फॉर एअरबोर्न …