Tuesday, January 13 2026 | 11:16:16 AM
Breaking News

एफसीआय महाराष्ट्रने खुला बाजार विक्री योजना (देशांतर्गत) अंतर्गत गहू आणि तांदूळ विक्रीची केली घोषणा – 18 डिसेंबर 2024 रोजी लिलाव

Connect us on:

भारतीय अन्न महामंडळ (एफसीआय ), प्रादेशिक कार्यालय महाराष्ट्र ने  खुली बाजार विक्री योजना (देशांतर्गत [ओएमएसएस (डी)] अंतर्गत ऑगस्ट 2024 च्या  पहिल्या आठवड्यापासून तांदूळ आणि डिसेंबर 2024 च्या पहिल्या आठवड्यापासून गहू विक्रीची घोषणा केली आहे.  इच्छुक खरेदीदार गहू आणि तांदूळ साठा खरेदी करण्यासाठी भारतीय अन्न महामंडळाच्या ई-लिलाव सेवा प्रदाता, “m-Junction Services Limited”(https://www.valuejunction.in/fci/)  या पॅनेलमध्ये स्वतः ला समाविष्ट करून ई- लिलाव प्रक्रियेमध्ये सहभागी  होऊ शकतात आणि बोली लावू शकतात.  72 तासांच्या आत एम्पानेलमेंट प्रक्रिया पूर्ण केली जाईल. 18 डिसेंबर 2024 च्या आगामी लिलावासाठी गोवा राज्यातून एकूण 500 मेट्रिक टन तांदूळ साठा देऊ केला जाणार आहे. गोवा राज्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून एकूण 5000 मेट्रिक टन गव्हाचा साठा उपलब्ध करून दिला जाणार  आहे. गव्हासाठी, पीठ गिरण्या/गहू उत्पादनांचे उत्पादक/प्रक्रियाकर्ते /गव्हाचे अंतिम वापरकर्ते आणि तांदळाचे घाऊक व्यापारी /उत्पादक सहभागी होऊ शकतात. तांदूळासाठी किमान मर्यादा  1 मेट्रिक टन आहे आणि प्रति बोलीदार कमाल बोली 2000 मेट्रिक टनपेक्षा जास्त नसावी.  गव्हाच्या बाबतीत, एकाच ई-लिलावात एकत्रित ठेवलेल्या सर्व प्रदेशांसाठी किमान 10 मेट्रिक टन आणि कमाल बोली एलटी जोडणी असलेल्या प्रक्रिया युनिट्ससाठी प्रति बोलीदार  25 मेट्रिक टन आणि एचटी जोडणीसह प्रक्रिया युनिटसाठी 100 मेट्रिक टन पेक्षा जास्त नसावी. देशांतर्गत खुली बाजार विक्री  योजनेमुळे वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल आणि सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळेल.

About Matribhumi Samachar

Check Also

आणि यशाचा गुलाल उधळला, कामाला जाऊन केला अभ्यास

अमरावती. एका ध्येय वेड्या युवकाने खेडेगावात राहून कठोर परिश्रम घेऊन परीक्षा उत्तीर्ण केली मात्र, परीक्षा वादाच्या …