Wednesday, December 10 2025 | 10:40:37 AM
Breaking News

आर्मेनियाच्या संसदीय शिष्टमंडळाने राष्ट्रपतींची भेट घेतली

Connect us on:

आर्मेनिया प्रजासत्ताकच्या संसदीय शिष्टमंडळाने आज (16 डिसेंबर 2024) राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. आर्मेनिया प्रजासत्ताकच्या नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष एलेन सिमोनियन यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ आले आहे.

शिष्टमंडळाचे स्वागत करताना राष्ट्रपतींनी भारत आणि आर्मेनिया यांच्यातील शतकानुशतके प्राचीन प्रगाढ  सांस्कृतिक बंध आणि लोकशाहीच्या सामायिक मूल्यावर आधारित बहुआयामी समकालीन संबंधांना उजाळा दिला.

राष्ट्रपतींनी जागतिक बहुपक्षीय मंचावरील दोन्ही देशांमधील घनिष्ठ सहकार्याचीही दखल घेतली आणि आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमधील आर्मेनियाच्या सदस्यत्वाबद्दल तसेच व्हॉइस ऑफ ग्लोबल साउथच्या तीनही  शिखर परिषदेतील सहभागाबद्दल प्रशंसा केली.

भारत आपल्या विविध विकासात्मक भागीदारी कार्यक्रमांच्या माध्यमातून आर्मेनियामध्ये क्षमता निर्माण आणि कौशल्य विकास या क्षेत्रात असेच सहकार्य सुरु ठेवण्यासाठी उत्सुक असल्याचे राष्ट्रपतींनी सांगितले. याशिवाय द्विपक्षीय व्यापार अधिक वृद्धिंगत करण्याच्या आवश्यकतेवर त्यांनी भर दिला तसेच दोन्ही देशांमधील प्रत्यक्ष आणि आर्थिक संपर्क वाढवण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.

अशा प्रकारचा  नियमित संसदीय संवाद परस्परांच्या देशातील शासन प्रणाली आणि कायदे यांच्याबद्दलचे ज्ञान वृद्धिंगत करण्यात महत्वाची भूमिका बजावतो असे राष्ट्रपतींनी सांगितले. आर्मेनियाच्या संसदीय शिष्टमंडळाच्या भेटीमुळे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत होतील, असे त्या म्हणाल्या.

About Matribhumi Samachar

Check Also

भारत-ब्रुनेई दरम्यानचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी नवी दिल्ली येथे संरक्षण सहकार्यावरील भारत-ब्रुनेई संयुक्त कार्यगटाची बैठक संपन्न

नवी दिल्ली, 9 डिसेंबर 2025 भारत-ब्रुनेई दरम्यानची द्विपक्षीय भागीदारी पुढे नेण्यामधील महत्वाचा टप्पा म्हणून नवी …