Tuesday, December 09 2025 | 10:15:15 PM
Breaking News

गती शक्ती पोर्टलचे ई-श्रम पोर्टलबरोबर एकत्रीकरण

Connect us on:

सत्यापित आणि आधारशी संलग्न असा असंघटित कामगारांचा सर्वसमावेशक राष्ट्रीय डेटाबेस तयार करण्यासाठी श्रम आणि रोजगार मंत्रालयाने 26 ऑगस्ट 2021 रोजी देशभरात ई-श्रम पोर्टल (eshram.gov.in) सुरु  केले.  ई-श्रम पोर्टल हे असंघटित कामगारांना युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) आणि ई-श्रम कार्ड देऊन त्यांची नोंदणी आणि त्यांना मदत  करण्यासाठी आहे.

गति शक्ती राष्ट्रीय बृहत आराखड्यामध्ये वास्तविक आधारावर कार्यक्षम नियोजन आणि अंमलबजावणीसाठी, सर्वसमावेशक डेटाबेससह विविध मंत्रालये/विभागांशी संबंधित पायाभूत सुविधा प्रकल्पांचा एक सामायिक मंच तयार करणे अंतर्भूत आहे. राष्ट्रीय बृहत आराखडा  पोर्टलवर मंत्रालये/विभागांद्वारे डेटा (प्रकल्पांचे जिओ -कोऑर्डिनेट्स) अपलोड करण्याचा उद्देश प्रयत्नांची द्विरुक्ती कमी करणे आणि प्रकल्पांच्या नियोजनासाठी आणि त्यांच्या एका वेळेत अंमलबजावणीसाठी एकात्मिक दृष्टिकोनाचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देणे हा आहे.

श्रम आणि रोजगार मंत्रालय दोन मंचांमधील  समन्वयाचा लाभ घेण्यासाठी, वर्धित नियोजन आणि निर्णय प्रक्रियेसाठी ई श्रम पोर्टलचे गती शक्ती राष्ट्रीय बृहत आराखड्याबरोबर एकत्रीकरण  करत आहे.

केंद्रीय श्रम आणि रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

About Matribhumi Samachar

Check Also

वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त लोकसभेत आयोजित विशेष चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले संबोधित

नवी दिल्ली, 8 डिसेंबर 2025. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त लोकसभेत आयोजित …