Thursday, January 08 2026 | 01:01:45 AM
Breaking News

सीबीआयसी चे अध्यक्ष संजय कुमार अग्रवाल यांनी मंडळाच्या सदस्यांच्या उपस्थितीत करदात्यांना उत्तम सेवा पुरवण्यासाठी नवीन उपक्रमांचा केला प्रारंभ

Connect us on:

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळ (सीबीआयसी) चे अध्यक्ष संजय कुमार अग्रवाल यांनी आज मंडळाच्या सर्व सदस्यांच्या उपस्थितीत करदात्यांना उत्तम सेवांचा अनुभव देण्यासाठी आणि पारदर्शकता वाढवण्याच्या उद्देशाने अनेक उपक्रमांचा  प्रारंभ केला.

उपक्रमांचा प्रारंभ केल्यानंतर अग्रवाल म्हणाले, “आज सुरू केलेले उपक्रम हे कर प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आणि पारदर्शकता आणि विश्वासाच्या संस्कृतीला चालना देण्याप्रती आमच्या अतूट वचनबद्धतेचा दाखला आहेत. करदात्यांना सक्षम बनवून आणि त्यांच्या सूचनांचा समावेश करून, आम्ही एक अशी प्रणाली तयार करत आहोत जी कार्यक्षम आहे त्याचबरोबर  नागरिकांच्या गरजा आणि आकांक्षा देखील प्रतिबिंबित करते.”

आज सुरु करण्यात आलेले चार उपक्रम पुढीलप्रमाणे :

  1. सुधारित सिटिझन्स चार्टर: उत्तम सेवा मानकांप्रति  वचनबद्धता: सीबीआयसी ने सुधारित सिटिझन्स चार्टर सादर केली आहे, जी करदात्याच्या प्रमुख सेवांसाठी अद्ययावत समयसीमा  आणि सेवा मानके प्रदान करते.
  2. सूचना देण्यासाठी ‘इज ऑफ डुइंग बिझनेस’ टॅब:  व्यवसाय सुलभतेमध्ये करदात्यांना थेट योगदान देण्यास सक्षम बनवण्यासाठी  एक नवीन मंच  सुरू करण्यात आला आहे.
  3. सुधारित सिटिझन्स कॉर्नर : नॉलेज ऍट युवर फिंगरटीप्स : कर-संबंधित माहितीसाठी वन-स्टॉप हब म्हणून काम करण्यासाठी सिटीझन कॉर्नर ऑनलाइन पोर्टलमध्ये लक्षणीय सुधारणा करण्यात आल्या आहेत. करदात्यांना योग्य माहिती देण्याच्या दृष्टीने  डिझाइन केलेले, सिटीझन कॉर्नर स्वयं-अनुपालन सुलभ करते आणि कर नियमांचे ऐच्छिक पालन करण्यास प्रोत्साहित करते.
  4. सीबीआयसी संग्रहालय: अ डिजिटल विंडो टू इंडियाज टॅक्स हिस्टरी : सीबीआयसी  ने भारतातील अप्रत्यक्ष करांच्या ऐतिहासिक उत्क्रांती दर्शन घडवणारे  डिजिटल संग्रहालय सुरू केले आहे. या वापरकर्ता-स्नेही मंचावर  आता अंदाजे 82 सब-मेनूसह सहा (6) परस्परसंवादी मेनू टाईल्स आहेत, ज्या करदात्यांना व्हिडिओ, वेबिनार आणि विविध कर-संबंधित विषयांवरील नवीन घडामोडी जाणून घेण्यास मदत करतात.

हे उपक्रम करदाते-केंद्रित शासन आणि डिजिटल परिवर्तनाप्रति सीबीआयसीची वचनबद्धता अधोरेखित करतात. तंत्रज्ञानाचा वापर करून आणि प्रक्रिया सुव्यवस्थित करून,  अधिक कार्यक्षम आणि पारदर्शक कर प्रशासन प्रणाली तयार करण्याचे सीबीआयसीचे उद्दिष्ट आहे.

About Matribhumi Samachar

Check Also

रिलॅक्सो फूटवेअरने स्प्रिंग समर २०२६ कलेक्शनमध्ये बोल्ड आणि रोमांचक श्रेणी केली सादर

मुंबई, महाराष्ट्र, जानेवारी 2026: भारतातील सर्वात मोठी आणि सर्वात विश्वासार्ह फूटवेअर उत्पादक कंपनी रिलॅक्सो फूटवेअर्स …