Saturday, December 13 2025 | 07:09:35 PM
Breaking News

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा बुधवार, 25 डिसेंबर रोजी नवी दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय परिषदेत 10,000 पेक्षा जास्त बहुउद्देशी प्राथमिक कृषी पतसंस्था, दुग्ध आणि मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था राष्ट्राला करणार समर्पित

Connect us on:

नवी दिल्ली, 24 डिसेंबर 2024

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा, बुधवार, 25 डिसेंबर रोजी, नवी दिल्लीतील पुसा येथील आयसीएआर कन्व्हेन्शन सेंटर मध्ये, सहकार क्षेत्राच्या राष्ट्रीय परिषदेत, नव्याने स्थापन झालेल्या 10,000 हून अधिक बहुउद्देशीय प्राथमिक कृषी सहकारी संस्था (M-PACSs), दुग्ध आणि मत्स्यपालन सहकारी संस्था राष्ट्राला समर्पित करतील. अमित शाह नव्याने स्थापन झालेल्या सहकारी संस्थांना नोंदणी प्रमाणपत्रे, रुपे किसान क्रेडिट कार्ड (KCC) आणि मायक्रो एटीएम देखील वितरित करतील.पंचायतींमध्ये क्रेडिट सेवा सहज उपलब्ध करून देण्यासाठी आणि आर्थिक समावेशनाला प्रोत्साहन देण्यासाठी, ग्रामीण नागरिकांना विविध योजनांचा लाभ घेण्यास आणि देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये सहभागी होण्यासाठी सक्षम करण्यासाठी ही आर्थिक साधने आरेखित केलेली आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली, सहकार मंत्रालय स्थानिक विकास आणि स्वावलंबनाच्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने प्रत्येक पंचायतीमध्ये सहकारी संस्थांची स्थापना सुनिश्चित करण्यासाठी कटिबद्ध आहे.

केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी सहकारी संस्थांच्या माध्यमातून स्थानिक समुदायांना, विशेषत: महिलांच्या नेतृत्वाखालील पंचायतींना सक्षम बनविण्याच्या महत्त्वावर भर दिला आहे. नव्याने स्थापन झालेल्या बहुउद्देशी प्राथमिक कृषी पतसंस्था  ग्रामीण भागात आत्मनिर्भरता आणि आर्थिक सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील अशी अपेक्षा आहे.

या सोसायट्या केवळ आर्थिक सेवाच देणार नाहीत तर ग्रामीण समुदायांना एकत्र येण्यासाठी आणि सहकार्याने काम करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणूनही काम करतील.

आतापर्यंत नव्याने स्थापन झालेल्या 10,496 बहुउद्देशीय  प्राथमिक कृषी पतसंस्था, दुग्ध आणि मत्स्यपालन सहकारी संस्थांपैकी 3,523 बहुउद्देशीय प्राथमिक कृषी पतसंस्था,6,288 दुग्ध सहकारी संस्थांची नोंदणी झाली आहे. याशिवाय 685 नव्या मत्स्यपालन सहकारी संस्थांही नोंदवण्यात आल्या आहेत.

राष्ट्रीय परिषदेत, बहु उद्देशी प्राथमिक कृषी पतसंस्था, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यपालन सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींसह देशभरातील सुमारे 1,200 प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. यात राज्य सरकार, सहकार मंत्रालय आणि विविध संबंधित संस्थांचे अधिकारी यांच्यासह प्राथमिक कृषी पतसंस्थांचे 400 प्रतिनिधी, 700 सहकारी डेअरी प्रतिनिधी आणि मत्स्यपालन सहकारी संस्थांचे 100 प्रतिनिधी यांचा समावेश आहे.

नव्याने स्थापन झालेल्या सहकारी संस्थांच्या कार्यक्षमतेत वाढ करण्याच्या धोरणांवर चर्चा करण्यासाठी ही परिषद एक व्यासपीठ म्हणून काम करेल.याव्यतिरिक्त, शेतकरी आणि ग्रामीण समुदायांची उपजीविका  स्थिर करण्यासाठी, तसेच त्यांना उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत उपलब्ध करून देण्याच्या आणि शाश्वत कृषी पद्धतींना प्रोत्साहन देण्याच्या संधीवर देखील या परिषदेत विचार विनिमय होणार आहे.

About Matribhumi Samachar

Check Also

भारताच्या जनगणना 2027 ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्‍ये भारताच्या जनगणना 2027 ला मंजुरी देण्‍यात आली. या …