Wednesday, January 14 2026 | 09:00:50 AM
Breaking News

राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी)च्या प्रजासत्ताक दिन शिबिर 2025 मध्ये सहभागी होणाऱ्या 2,361 पैकी 917 इतक्या विक्रमी संख्येने मुलींचा सहभाग

Connect us on:

राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) च्या प्रजासत्ताक दिन शिबिर 2025 मध्ये 2,361 पैकी 917 इतक्या विक्रमी संख्येने मुलींचा सहभाग असून हे प्रमाण आतापर्यंतचे सर्वाधिक आहे. महिनाभर चालणाऱ्या या शिबिरात जम्मू आणि काश्मीर आणि लडाखमधील 114 आणि ईशान्य विभागातील 178 छात्रांचा समावेश आहे असे राष्ट्रीय छात्र सेनेचे महासंचालक (डीजीएनसीसी) लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंग यांनी 3 जानेवारी 2025 रोजी, दिल्ली कँट येथील पत्रकार परिषदेत सांगितले. युवक आदानप्रदान कार्यक्रमाअंतर्गत 18 मित्र राष्ट्रांमधले सुमारे 135 छात्र शिबिरात भाग घेतील, असे ते म्हणाले.

या शिबिरात सहभागी होणारे छात्र अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये आणि प्रशिक्षण विषयक स्पर्धांमध्ये भाग घेतील. भारताच्या समृद्ध संस्कृती आणि परंपरांचे दर्शन घडवणे तसेच छात्रांच्या वैयक्तिक गुणांना अधिक वाव देऊन त्यांची मूल्य प्रणाली अधिक बळकट करणे हा या शिबिराचा उद्देश आहे. या शिबिराला उपराष्ट्रपती, संरक्षण मंत्री, संरक्षण राज्य मंत्री, दिल्लीचे मुख्यमंत्री, चीफ ऑफ डिफेंस स्टाफ, तिन्ही दलांचे प्रमुख आणि संरक्षण सचिव यांच्यासह अनेक मान्यवर भेट देणार आहेत. 26 जानेवारी, 2025 रोजी कर्तव्यपथावरील प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात एनसीसी ची तुकडी देखील सहभागी होईल. 27 जानेवारी, 2025 रोजी पंतप्रधानांच्या रॅलीने या उपक्रमांचा समारोप होईल.

एनसीसी कॅडेट्सची संख्या 17 लाखांवरून 20 लाखांपर्यंत वाढली असून त्यात 40% मुली आहेत, असे राष्ट्रीय छात्र सेनेच्या महासंचालकांनी नमूद केले.

About Matribhumi Samachar

Check Also

आयुष निर्यात प्रोत्साहन परिषदेने नवी दिल्ली येथे साजरा केला चौथा स्थापना दिन

भारतीय पारंपरिक औषध प्रणाली आणि आरोग्यविषयक उत्पादनांच्या निर्यातीला चालना देण्यासाठी भारताच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून …