मुंबई , 2 डिसेंबर 2025. महाराष्ट्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, 2025-26 या वर्षात अतिवृष्टी आणि पुरामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकूण 6 लाख 8 हजार 956 हेक्टर क्षेत्र आणि 6 लाख 89 हजार 75 शेतकरी बाधित झाले आहेत. पिकांच्या नुकसानीचे आर्थिक मूल्य अंदाजे 1695.01 कोटी रुपये इतके आहे. महाराष्ट्र शासनाने पूरग्रस्त क्षेत्राचे सर्वेक्षण …
Read More »मुंबईच्या नागरिकांना आधुनिक, शाश्वत व शेवटच्या टप्प्यापर्यंत पोचणारी सेवा देण्यासाठी भारतीय टपाल विभागाचा परिवर्तनकारी उपक्रम
मुंबई , 2 डिसेंबर 2025. भारतीय टपाल विभाग, मुंबई क्षेत्र यांनी मुंबईच्या नागरिकांना शेवटच्या टप्प्यापर्यंत दिल्या जाणाऱ्या सेवांचे आधुनिकीकरण व शाश्वतिकरण करण्याच्या दिशेने एक परिवर्तनकारी उपक्रम सुरु केला आहे. पार्सल्स ची वाढती संख्या लक्षात घेता ती ग्राहकांपर्यंत कार्यक्षमतेने पोहचण्याची आवश्यकता वाढत आहे. त्यासाठी भारतीय टपाल विभागाच्या मुंबई क्षेत्राने पायी पत्रे पोहचवण्यापेक्षा …
Read More »पश्चिम नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ व्हाइस ऍडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी नौदल दिनाच्या वार्षिक पत्रकार परिषदेत माध्यमांशी साधला संवाद
मुंबई , 2 डिसेंबर 2025 व्हाइस ऍडमिरल कृष्णा स्वामीनाथन, एव्हीएसएम एनएम, फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ वेस्टर्न नेव्हल कमांड (एफओसी-इन-सी वेस्ट), यांनी 02 डिसेंबर 2025 रोजी मुंबईतील वेस्टर्न नेव्हल कमांड ऑफिसर्स मेस मधील नव्याने उद्घाटन झालेली बहुमजली इमारत ‘सुमेरू’ येथे नौदल दिनाच्या वार्षिक पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधला. 1971 च्या भारत-पाक युद्धात …
Read More »राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची पादत्राणे डिझाइन आणि विकास संस्थेच्या दीक्षांत समारंभाला उपस्थिती
नवी दिल्ली, 1 डिसेंबर 2025. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज (1 डिसेंबर 2025) नवी दिल्ली येथील पादत्राणे डिझाइन आणि विकास संस्थेच्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहिल्या. पादत्राणांचे उत्पादन आणि वापराच्या बाबतीत भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे, असे राष्ट्रपती म्हणाल्या. 2024-25 या आर्थिक वर्षात, भारताची पादत्राण निर्यात 2500 कोटी अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त होती, तर …
Read More »राज्यसभेचे सभापती थिरू सी. पी. राधाकृष्णन यांच्या सत्कार समारंभादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण
नवी दिल्ली, 1 डिसेंबर 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांचे आज प्रथमच राज्यसभेचे अध्यक्षपद भूषवत असल्याबद्दल स्वागत केले. राज्यसभेच्या सर्व माननीय सदस्यांसाठी हा क्षण अभिमानाचा असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. सभापतींचे मनःपूर्वक स्वागत करताना मोदी म्हणाले, “सभागृहाच्या वतीने आणि माझ्या स्वतःच्या वतीने, मी तुमचे मनःपूर्वक अभिनंदन करतो, तुम्हाला शुभेच्छा …
Read More »2025 च्या हिवाळी अधिवेशनाचा प्रारंभ होण्यापूर्वी पंतप्रधानांनी दिलेले निवेदन
नवी दिल्ली, 1 डिसेंबर 2025. संसदेच्या 2025 च्या हिवाळी अधिवेशनाचा प्रारंभ होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संसदेच्या आवारात प्रसारमाध्यमांसमोर निवेदन केले. हे अधिवेशन केवळ एक औपचारिकता नसून, देशाच्या सध्याच्या वेगवाग प्रगतीच्या वाटचालीकरता ऊर्जेचा एक महत्त्वाचा स्रोत आहे, असे ते म्हणाले. हे अधिवेशन देशाच्या प्रगतीला अधिक गती देण्यासाठी सध्या सुरू असलेल्या …
Read More »पेट्रोलियम आणि स्फोटक सुरक्षा संघटना ही केवळ नियामक संघटना नसून, सुविधा पुरवण्यासाठी मदत करणारी संघटना आहे : आर. एन. मीना, मुख्य स्फोटक नियंत्रक
नागपूर, 1 डिसेंबर 2025. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीतील उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या पेट्रोलियम आणि स्फोटक सुरक्षा संघटनेच्या (PESO) वतीने आज नागपूर इथे भारताच्या वेगाने विस्तारत असलेल्या ऊर्जा आणि संलग्न क्षेत्रांना, नेमक्या आणि व्यावहारिक सुरक्षा परिणामकारतेसोबत जोडून घेण्यासाठी एक दिवसीय चिंतन शिबिराचे आयोजन केले होते. …
Read More »गोव्यात संचार लेखा महानियंत्रकांची पश्चिम विभागीय आढावा परिषद सुरू
पणजी, 1 डिसेंबर 2025. दूरसंचार मंत्रालयाच्या दूरसंचार विभागाच्या संचार लेखा महानियंत्रक (सीजीसीए) यांच्या अखत्यारीतील क्षेत्रीय कार्यालयांची पश्चिम विभागीय आढावा परिषद आज, 1 डिसेंबर रोजी गोव्यात सुरू झाली. दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत सीजीसीए कार्यालय, दूरसंचार विभागाचे मुख्यालय आणि पश्चिम विभागाच्या (महाराष्ट्र आणि गोवा, मुंबई, राजस्थान आणि गुजरात) अंतर्गत येणाऱ्या संचार लेखा …
Read More »उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचे एनआयटी कुरुक्षेत्रच्या 20 व्या दीक्षांत समारंभात मार्गदर्शन
उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन, आज हरियाणातील कुरुक्षेत्र येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (NIT) च्या 20 व्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले. यावेळी बोलताना उपराष्ट्रपती म्हणाले की, कुरुक्षेत्र ही एक पवित्र भूमी आहे, जी आपल्याला आठवण करून देते की अधर्म कितीही शक्तिशाली वाटला तरी धर्माचाच नेहमी विजय होईल. दीक्षांत …
Read More »विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांसोबत सरकारची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न
संसदेच्या हिवाळी अधिवेशन 2025 संदर्भातील मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी, आज 30 नोव्हेंबर 2025 रोजी नवी दिल्ली येथील संसद भवन संकुलात, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली राजकीय पक्षांच्या नेत्यांची बैठक पार पडली. ही बैठक संसदीय कामकाज आणि अल्पसंख्याक कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी बोलावली होती. बैठकीस केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण तसेच रसायन …
Read More »
Matribhumi Samachar Marathi