Thursday, January 01 2026 | 08:57:58 AM
Breaking News

Matribhumi Samachar

सीमा शुल्क विभागाच्या मुंबई शाखेने काल छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या वेगवेगळ्या कारवायांमध्ये 11 कोटी रुपयांहून अधिक किमतीचा गांजा (हायड्रोपोनिक वीड), परदेशी वन्यजीव आणि सोने केले जप्त

सीमा शुल्क विभागाच्या मुंबई शाखेतील, झोन-3 च्या अधिकाऱ्यांनी विमानतळ आयुक्तालय इथे दि. 5 जुलै रोजी केलेल्या केलेल्या वेगवेगळ्या कारवायांमध्ये प्रवाशांकडून तस्करी केला जात असलेला 11 कोटी रुपयांहून अधिक किमतीचा अवैध मुद्देमाल जप्त केला. या अंतर्गत पहिल्या प्रकरणातून 9.662 किलोग्रॅम वजनाचा, 9.662 कोटी रुपये किमतीचा गांजा (हायड्रोपोनिक वीड) जप्त करण्यात आला. तसेच दुसऱ्या प्रकरणात वन्यजीव (जिवंत आणि मृत प्राणी) जप्त …

Read More »

जे. पी. नड्डा यांच्या हस्ते दिल्लीत आरोग्य सेवा अधिकारी आणि वैद्यकीय सहाय्यक कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्रांचे वाटप; आयुष्मान भारत नोंदणी वाहनांना हिरवा झेंडा

केंद्रीय आरोग्यमंत्री  जगत प्रकाश नड्डा यांनी आज विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे दिल्लीत आरोग्य सेवा अधिकारी आणि वैद्यकीय सहाय्यक कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्रांचे वाटप केले. यावेळी उपस्थित असलेल्या दिल्लीच्या मुख्यमंत्री  रेखा गुप्ता यांनी आयुष्मान भारत नोंदणी व्हॅन्सना हिरवा झेंडा दाखवला. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना  नड्डा म्हणाले, “हा अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे कारण …

Read More »

सप्ततारांकित आणि पंचतारांकित खाणींचा गौरव समारंभ

खाण मंत्रालयांतर्गत असलेले भारतीय खाण खाते , 2023-24 वर्षासाठी देशभरातल्या 7 आणि 5 तारांकित खाणींच्या कामगिरीचा गौरव करण्यासाठी एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे. 7.07.2025 रोजी जयपूर इथे या गौरव कार्यक्रमात विविध मान्यवर, भागधारक आणि निमंत्रित पाहुणे उपस्थित राहाणार आहेत. या कार्यक्रमाला, केंद्रीय कोळसा आणि खाणमंत्री  जी. किशन रेड्डी यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहाण्यास संमती दर्शवली आहे आणि राजस्थानचे …

Read More »

पंतप्रधानांच्या त्रिनिदाद व टोबागो दौऱ्याबाबतचे संयुक्त निवेदन

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 आणि 4 जुलै 2025 दरम्यान त्रिनिदाद व टोबागोला भेट दिली. त्रिनिदाद व टोबागोच्या पंतप्रधान कमला प्रसाद बिसेस्सर यांनी पंतप्रधान मोदी यांना या भेटीचे निमंत्रण दिले होते. गेल्या २६ वर्षांमधील त्रिनिदाद व टोबागोचा भारतीय पंतप्रधानांचा हा पहिलाच दौरा होता. भारतीय नागरिक त्रिनिदाद व टोबागो देशात स्थलांतरित झाल्याला 180 वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून …

Read More »

सुरक्षेसाठी ग्राहकांना फक्त भारतीय मानक ब्युरो (बीआयएस) प्रमाणित हेल्मेट वापरण्याचे केंद्राचे आवाहन

भारत सरकारचा ग्राहक व्यवहार विभाग आणि भारतीय मानक ब्युरो (बीआयएस) तर्फे देशभरातील ग्राहकांना केवळ बीआयएस-प्रमाणित हेल्मेट वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, विभागाने बीआयएस प्रमाणपत्राशिवाय हेल्मेटचे उत्पादन किंवा विक्री करण्याविरुद्ध कठोर अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले आहे. भारतीय रस्त्यांवर 21 कोटींहून अधिक दुचाकी वाहने असल्याने, दुचाकीस्वारांची सुरक्षितता ही सर्वात महत्त्वाची आहे. मोटार वाहन कायदा, 1988 अंतर्गत …

Read More »

पुढील चार महिन्यात भंडारा ते नागपूर रस्त्याचे सहा पदरी करणाच काम चालू होणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा

नागपूर /भंडारा, 5 जुलै 2025 भंडारा ते नागपूर या रस्त्याच्या सहापदरीकरणाच काम पुढील चार महिन्यात सुरू होईल अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी आज भंडारा येथे केली .राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या द्वारे राष्ट्रीय महामार्ग 53 वरील भंडारा बायपास तसेच मौदा  वाय जंक्शन येथील सहा पदरी उड्डाणपुलाचे लोकार्पण तसेच भंडारा जिल्ह्यातील …

Read More »

त्रिनिदाद आणि टोबॅगोमधील भारतीय समुदायाचा प्रवास धैर्याचा आहेः पंतप्रधान

पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी आज त्रिनिदाद आणि टोबॅगोमधील विशाल भारतीय समुदायाच्या सभेला संबोधित केले. या कार्यक्रमाला रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या पंतप्रधान, महामहीम कमला पेरसाद-बिसेसार, त्यांच्या मंत्रिमंडळाचे सदस्य, संसद सदस्य आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात पंतप्रधानांचे भारतीय समुदायाने अतिशय जिव्हाळ्याने स्वागत केले आणि त्यांना रंगीबेरंगी पारंपारिक इंडो-त्रिनिदादियन …

Read More »

राष्ट्रपतींनी ड्युरंड कप स्पर्धेच्या ट्रॉफींचे अनावरण केले

राष्ट्रपती भवनाच्या सांस्कृतिक केंद्रात आज (4 जुलै 2025) आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात  राष्ट्रपती,  द्रौपदी मुर्मू यांनी ड्युरंड कप स्पर्धा 2025 च्या ट्रॉफींचे अनावरण केले आणि त्यांना हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. या प्रसंगी आपल्या संक्षिप्त भाषणात राष्ट्रपती म्हणाल्या की, खेळ शिस्त, दृढनिश्चय आणि सांघिक भावना वाढवतात. लोकांना, प्रदेशांना आणि देशांना जोडण्याची खेळांमध्ये एक अद्वितीय शक्ती आहे. भारतात, हे राष्ट्रीय एकात्मतेसाठी …

Read More »

153 देश भारतातून खेळणी आयात करत आहेत : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल

एकेकाळी आयातीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असलेला भारतातील खेळणी उद्योग आता देशांतर्गत उत्पादन करत आहे आणि 153 देशांमध्ये निर्यात करत आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज नवी दिल्ली येथे 16 व्या टॉय बिझ इंटरनॅशनल बी 2 बी एक्स्पो 2025 ला संबोधित करताना या उल्लेखनीय परिवर्तनावर प्रकाश टाकला. सातत्यपूर्ण धोरणात्मक पाठबळ, गुणवत्ता मानकांची अंमलबजावणी आणि स्थानिक उत्पादन …

Read More »

राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइनने गेल्या दोन महिन्यांमध्ये ग्राहकांना 7.14 कोटी रुपये परत मिळवून दिले

राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइनने गेल्या दोन महिन्यांमध्ये  ग्राहकांना 7.14 कोटी रुपये परत मिळवून  देण्यात यश मिळवले आहे. प्रामुख्याने 30 क्षेत्रांमध्ये ही भरपाई करण्यात आली असून,  ग्राहकांच्या परतावा  दाव्यांशी संबंधित 15,426 तक्रारींचे प्रभावीपणे निराकरण करण्यात आले. विशेष म्हणजे ई-कॉमर्स क्षेत्रात सर्वाधिक 8,919 तक्रारी नोंदवण्यात आल्या असून, त्याअनुषंगाने सर्वाधिक 3.69 कोटी रुपयांचा परतावा मिळवून देण्यात आला. त्याखालोखाल ट्रॅव्हल अँड टुरिझम (प्रवास आणि पर्यटन) क्षेत्राला 81 लाख रुपयांचा …

Read More »