देशात आज 7 डिसेंबर 2025 रोजी सशस्त्र सेना ध्वज दिन साजरा होत आहे. सशस्त्र दलांच्या शौर्य, समर्पण, बलिदान आणि अढळ वचनबद्धतेचा सन्मान करण्याचा हा प्रसंग आहे. बाह्य आणि अंतर्गत आव्हानांपासून देशाचे रक्षण करणाऱ्या शूर सैनिकांना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी श्रद्धांजली वाहिली आणि सशस्त्र सेना ध्वज दिन निधीमध्ये उदारहस्ते योगदान देऊन …
Read More »पूर्वावलोकन : भारतीय नौदल अकादमी प्रतिष्ठित ‘अडमिरल्स कप – 2025’ स्पर्धा आयोजित करणार
नौदल अधिकारी प्रशिक्षणातील देशातील सर्वोच्च संस्था असलेली येथील भारतीय नौदल अकादमी (आयएनए) एझिमाला 08 ते 13 डिसेंबर 2025 दरम्यान अॅडमिरल्स कप 2025 स्पर्धेचे आयोजन करत आहे. जगातील सर्वाधिक प्रतिष्ठित नौदल नौकानयन स्पर्धांपैकी एक मानल्या जाणाऱ्या या स्पर्धेच्या 14व्या आवृत्तीत 35 देश सहभागी होणार आहेत. यामुळे जागतिक सहभागात मोठी वाढ झाली असून, …
Read More »स्टार्टअप्सच्या पुढील पिढीला आकार देण्यासाठी अर्थसहाय्यापेक्षा मार्गदर्शनच महत्वाचे- डॉ. जितेंद्र सिंह
भारताच्या भविष्यातील प्रगतीमध्ये स्टार्टअप्स निर्णायक भूमिका बजावतील, असे केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे. केवळ अर्थ सहाय्य नव्हे तर मार्गदर्शन हेच नव्या पिढीच्या स्टार्टअप्सला आकार देतील असे त्यांनी सांगितले. भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवात सिंह यांनी आज उद्योजक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सक्षम मार्गदर्शनाची …
Read More »इंडिगो सेवा व्यत्ययावर नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाची कारवाई – प्रवाशांना परतफेड संरक्षण
नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने इंडिगोला सर्व प्रवाशांचे तिकिटांचे प्रलंबित पैसे विनाविलंब परत देण्याचे निर्देश दिले आहेत. रद्द केलेल्या किंवा विस्कळीत झालेल्या सर्व उड्डाणांसाठी परतफेड प्रक्रिया रविवार, 7 डिसेंबर 2025 रोजी रात्री 8:00 वाजेपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश मंत्रालयाने दिले आहेत. उड्डाण रद्द झाल्यामुळे ज्या प्रवाशांचा प्रवास प्रभावित झाला आहे, त्यांच्यासाठी कोणतेही पुनर्निर्धारण शुल्क …
Read More »इंडिगो परिचालन संकटावर नागरी विमान वाहतूक मंत्रालयाची कारवाई – विमानाच्या भाड्याचे कठोर नियमन
सध्या सुरू असलेल्या विमानवाहतुकीमध्ये व्यत्ययाच्या पार्श्वभूमीवर काही विमान कंपन्यांकडून जरुरीपेक्षा जास्त विमानभाडे आकारले जात असल्याची गंभीर दखल नागरी उड्डाण मंत्रालयाने घेतली आहे. कोणत्याही प्रकारच्या संकटामुळे भाड्याच्या किंमतींपासून प्रवाशांचे संरक्षण करण्यासाठी, मंत्रालयाने सर्व प्रभावित मार्गांवर योग्य आणि वाजवी भाडे सुनिश्चित करण्यासाठी त्यांच्या नियामक अधिकारांचा वापर केला आहे. सर्व विमान कंपन्यांना अधिकृत निर्देश …
Read More »‘राष्ट्रीय दूरसंवाद अकादमी – वित्त’ या संस्थेत आयोजित ‘विशेष मूलभूत अभ्यासक्रम 2025’ या प्रशिक्षणाच्या समारोप समारंभात केंद्रीय दूरसंवाद राज्यमंत्री डॉ. चंद्रा सेखर पेम्मासनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित
राष्ट्रीय दूरसंवाद अकादमी – वित्त (एनसीए – एफ) या संस्थेच्या 6 डिसेंबर 2025 रोजी झालेल्या विशेष मूलभूत अभ्यासक्रम 2025 समारोप समारंभाला केंद्रीय दूरसंवाद आणि ग्राम विकास राज्यमंत्री डॉ. चंद्रा सेखर पेम्मासनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. केंद्र सरकारच्या दूरसंवाद विभागाच्या या मध्यवर्ती प्रशिक्षण संस्थेला सर्वोत्कृष्ट (5 स्टार) दर्जा मिळाला आहे. प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी त्यांनी निवडलेल्या …
Read More »एनडीआरएफ अकादमी, नागपूरने साजरा केला नागरी संरक्षण दिन
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) अकादमी, नागपूरने आज मोठ्या उत्साहात आणि सामुदायिक सुरक्षा तसेच आपत्ती सज्जता मजबूत करण्याप्रति दृढ वचनबद्धतेसह नागरी संरक्षण दिन साजरा केला. एनडीआरएफ अकादमीचे उपमहानिरीक्षक आणि संचालक डॉ. हरि ओम गांधी यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी कमांडंट मसूद मोहम्मद, कमांडंट पंकज कुमार, अधिकारी, प्रशिक्षक, कर्मचारी आणि सध्या सुरु असलेल्या विविध …
Read More »9 व्या परीक्षा पे चर्चा (पीपीसी 2026) उपक्रमाचे जानेवारी 2026 मध्ये आयोजन
नवी दिल्ली, 06 डिसेंबर 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परीक्षा पे चर्चा (पीपीसी) या अभिनव संवादात्मक कार्यक्रमाच्या 9 व्या आवृत्तीचे पुन्हा एकदा जानेवारी 2026 मध्ये आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून भारतातील तसेच परदेशातील विद्यार्थी, पालक आणि शिक्षक त्यांच्याशी परीक्षेमुळे येणारा ताण दूर करून परीक्षेचा काळ उत्सवाच्या रुपात जीवनाचा अविभाज्य भाग …
Read More »रशियाच्या राष्ट्राध्यक्षांसोबत घेतलेल्या संयुक्त वार्ताहर परिषदेत पंतप्रधानांनी प्रसारमाध्यमांना दिलेले निवेदन
महामहीम, माझे मित्र राष्ट्रपती पुतीन दोन्ही देशांचे प्रतिनिधी, प्रसारमाध्यमांचे सहकारी नमस्कार! “दोबरी देन”! आज भारत आणि रशियाच्या तेविसाव्या शिखर परिषदेत राष्ट्रपती पुतीन यांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. त्यांचा हा दौरा अशा वेळी होत आहे, ज्यावेळी आमचे द्विपक्षीय संबंध अनेक ऐतिहासिक टप्प्यांदरम्यान वाटचाल करत आहेत. बरोबर 25 वर्षांपूर्वी …
Read More »नागपुरात जागतिक मृदा दिनी सेंद्रीय शेती संदर्भात प्रादेशिक सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती केंद्र तसेच एनडीआरएफ अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन
नागपूर 5 डिसेंबर 2025 मृदेचे आरोग्य आपण जर व्यवस्थित राखले , रसायनाचा उपयोग न करता कचऱ्यापासून कंपोस्ट निर्मिती करून त्याद्वारे भाजीपाला निर्माण केल्यास आपण जे मातीला दिलं तीच माती आपल्याला भरभरून देईल असे प्रतिपादन नॅशनल डिझास्टर रेस्पॉन्स फोर्स एनडीआरएफ अकॅडमी चे नागपूर येथील उपमहासंचालक डॉ . हरिओम गांधी यांनी केलं .केंद्रीय …
Read More »
Matribhumi Samachar Marathi