Friday, December 26 2025 | 09:06:09 PM
Breaking News

अभियांत्रिकी निर्यातीतील उत्कृष्टतेसाठी ईईपीसी इंडिया राष्ट्रीय पुरस्कार 111 पुरस्कार विजेत्यांना प्रदान

अभियांत्रिकी निर्यात क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाचा सन्मान करण्यासाठी इंजीनियरिंग एक्सपोर्ट प्रोमोशन कौन्सिल ऑफ इंडिया- राष्ट्रीय पुरस्कार सोहळा, 22 जून 2025 रोजी मुंबईत आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात 2022-23 या आर्थिक वर्षात अभियांत्रिकी निर्यात क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल 111 निर्यातदारांना गौरविण्यात आले. ईईपीसी इंडिया कडून दरवर्षी दिला जाणारा हा पुरस्कार अभियांत्रिकी वस्तू निर्यातदारांच्या दृढतेचा, सर्जनशीलता आणि महत्त्वाकांक्षेचा गौरव करतो. महाराष्ट्र …

Read More »

भारतीय नौदलाच्या ताफ्यात लवकरच स्टेल्थ तंत्रज्ञानयुक्त युद्धनौका ‘तामाल’ सामील होणार; रशियात होणार समारंभ

भारतीय नौदल आपल्या ताफ्यात लवकरच नवी गुप्त बहुउद्देशीय स्टेल्थ तंत्रज्ञानयुक्त युद्धनौका तामाल समाविष्ट करणार असून, हे समावेशन 1 जुलै 2025 रोजी रशियाच्या कॅलिनिनग्राड येथे होणार आहे. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी भारतीय नौदलाच्या पश्चिम नौदल कमांडचे प्रमुख फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ व्हाइस अ‍ॅडमिरल संजय जे. सिंग हे असणार आहेत. या प्रसंगी भारत आणि रशियामधील अनेक उच्चस्तरीय शासकीय व …

Read More »

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत एप्रिल 2025 मध्ये 19.14 लाख सदस्यांची भर, तर 8.49 लाख नवीन सदस्यांची नोंदणी

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) एप्रिल 2025 ची तात्पुरती वेतनपट आकडेवारी जाहीर केली असून, त्यात 19.14 लाख सदस्यांची भर पडली आहे. मार्च 2025 च्या तुलनेत ही आकडेवारी 31.31 टक्क्यांनी वाढ दर्शवते. वार्षिक म्हणजेच एप्रिल 2024 च्या तुलनेत निव्वळ वेतनपटात 1.17 टक्क्यांची वाढ झाली आहे. यामुळे रोजगार संधी वाढल्याचे आणि कर्मचाऱ्यांच्या लाभाविषयी जनजागृती झाल्याचे स्पष्ट होते, तसेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या प्रभावी जनजागृती …

Read More »

अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाच्या सचिवांनी उमीद पोर्टलच्या महाराष्ट्रातील अंमलबजावणी आणि हज 2025 संबंधीच्या कार्यवाहीची घेतली बैठक

केंद्र सरकारच्या अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाने दिनांक 6 जून 2025 रोजी  उमीद (UMEED) अर्थात ‘युनिफाईड वक्फ मॅनेजमेंट, एम्पॉवरमेंट, एफिशियन्सी अँड डेव्हलपमेंट अ‍ॅक्ट, 1995 या केंद्रीय पोर्टलचा प्रारंभ केला. त्यानंतर या वैधानिक पोर्टलची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी मंत्रालयाच्या वतीने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांशी सक्रिय संवाद साधला जात आहे. या पोर्टलच्या नियमांनुसार, देशभरातील सर्व नोंदणीकृत वक्फ मालमत्तांची माहिती  या पोर्टलवर सहा महिन्यांच्या …

Read More »

पंतप्रधान मोदी यांनी इराणच्या राष्ट्राध्यक्षांसोबत प्रादेशिक परिस्थितीवषयी दूरध्वनीवरून चर्चा केली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इराणचे राष्ट्राध्यक्ष, महामहीम डॉ. मसूद पेझेश्कियान यांच्याशी प्रादेशिक परिस्थिविषयी सविस्तर चर्चा केली. या संभाषणादरम्यान, पंतप्रधानांनी नुकत्याच वाढलेल्या तणावाबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. त्यांनी संवाद आणि मुत्सद्दीपणाचे महत्त्व अधोरेखित केले. दीर्घकालीन प्रादेशिक शांतता, सुरक्षा आणि स्थैर्य सुनिश्चित करण्यासाठी युद्ध थांबवणे आवश्यक असल्याचा आवाहनाचा पुनरुच्चारही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम इथे 11 व्या आंतरराष्ट्रीय योग दिन सोहळ्याला केले संबोधित

नवी दिल्‍ली, 21 जून 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम इथे आयोजित 11 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सोहळ्याला संबोधित केले. पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या समारंभाचे नेतृत्व केले आणि योगसाधना सत्रात भाग घेतला. यावेळी पंतप्रधानांनी आपल्या संबोधनातून भारत आणि जगभरातील लोकांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या, तसेच 21 …

Read More »

आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 निमित्त पुण्यात 2000 हून अधिक योगसाधकांनी एकत्र येत केला सामूहिक योगाभ्यास

पुणे, 21 जून 2025. आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 च्या निमित्ताने 21  जून रोजी सकाळी 6.30   वाजता पुणे येथे सिंहगड रोडवरील पंडित फार्म्स  येथे एक भव्य योग कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात सुमारे 2000 योगप्रेमींनी एकत्र येत कॉमन योगा प्रोटोकॉल अंतर्गत सामूहिक योगाभ्यास केला.     या विशेष योग सत्रात भारत …

Read More »

नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट, मुंबईने आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 केला साजरा

मुंबई, 21 जून 2025. मुंबईतल्या नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट गॅलरी आणि इशा फाऊंडेशन यानी संयुक्तपणे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पूर्वसंध्येला दि. 20 जून 2025 रोजी दुपारी 12 ते 1 या वेळेत एका विशेष योग सत्राचे आयोजन केले होते. योग ही एक सर्वांगीण साधना असून, यामुळे शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्याला अनेक …

Read More »

एक पृथ्वी, एक आरोग्य’ साठी योग: सदर्न कमांडने आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 केला साजरा

पुणे, 21 जून 2025. सदर्न कमांडने 21 जून 2025 रोजी पुण्यात 11वा आंतरराष्ट्रीय योग दिन अतिशय आवडीने आणि मोठ्या उत्साहात साजरा केला. या कार्यक्रमात सर्व स्तरांतील अधिकारी, सैनिक, निवृत्त सैनिक, त्यांचे कुटुंबीय आणि बालकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. या वर्षीच्या “एक पृथ्वी, एक आरोग्य” (Yoga for One Earth, One Health) या …

Read More »

“एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी” हजारोच्या संख्येने सोलापुरकरानी केली योगसाधना

सोलापूर/मुंबई, 21 जून 2025. योग हा ध्यान आणि व्यायामापुरतता मर्यादित नसून अध्यात्माच्या सर्व प्रकारच्या शक्यतांची ओळख करून देणारे अत्यंत प्राचीन असे शास्त्र आहे. भारताला याचा अत्यंत समृद्ध वारसा लाभला आहे. योगविद्येच्या परंपरेचे संवर्धन आणि जतन केले पाहिजे, योगाला आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवा असे, आवाहन ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी …

Read More »