Wednesday, December 10 2025 | 10:41:13 PM
Breaking News

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाहा यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे उद्या “अंमली पदार्थ तस्करी आणि राष्ट्रीय सुरक्षा” या विषयावर प्रादेशिक परिषद

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह  हे उद्या शनिवार, 11 जानेवारी रोजी नवी दिल्ली येथे “अंमली पदार्थ तस्करी आणि राष्ट्रीय सुरक्षा” या विषयावरील प्रादेशिक परिषदेचे अध्यक्षस्थान भूषवतील. अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरो  (एनसीबी) द्वारे आयोजित या परिषदेचे उद्दिष्ट ड्रग्ज तस्करीची  वाढती समस्या  आणि राष्ट्रीय सुरक्षेवर त्याचा परिणाम यावर लक्ष केंद्रित करत …

Read More »

बुलढाणा जिल्ह्यात एफएसएसएआयच्या “स्वच्छ आहार संकल्प”मध्ये रस्त्यावर खाद्य पदार्थ विकणारे 2000 विक्रेते होणार सहभागी

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण(एफएसएसएआय) पश्चिम क्षेत्र,  रविवारी 12 जानेवारी 2025 रोजी बुलढाणा जिल्ह्यात रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी एका व्यापक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे.  केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. बुलढाणा शहरात चिखली रोड, विद्या नगरी येथील सहकार विद्या मंदिर शाळेत आयोजित होणाऱ्या अन्न सुरक्षा …

Read More »

भांडवली खर्चाला गती देण्यासाठी आणि विकास आणि कल्याणाशी संबंधित खर्चांना वित्तपुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारांना 1,73,030 कोटी रुपयांचे कर हस्तांतरण केले जारी

केंद्र सरकारने आज राज्य सरकारांना 1,73,030 कोटी रुपयांचे कर हस्तांतरण जारी केले. डिसेंबर 2024 मध्ये राज्य सरकारांना जारी करण्यात आलेले कर हस्तांतरण 89,086 कोटी रुपये इतके होते. भांडवली खर्चाला गती देण्यासाठी, तसेच विकास आणि कल्याणाशी संबंधित खर्चाला वित्तपुरवठा करण्यास राज्यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने या महिन्यात अधिक रक्कम हस्तांतरित केली जात आहे. जारी केलेल्या रकमेचे राज्यनिहाय तपशील पुढील …

Read More »

प्रजासत्ताक दिन 2025 सोहळा : वीर गाथा 4.0 उपक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद, देशभरातून 1.76 कोटी विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग

प्रजासत्ताक दिन सोहळ्याचा एक भाग म्हणून संरक्षण मंत्रालय आणि शिक्षण मंत्रालयानं संयुक्तरीत्या आयोजित केलेल्या वीर गाथा 4.0 प्रकल्पाच्या चौथ्या आवृत्तीला संपूर्ण देशभरातून भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. यावर्षी सुमारे  2.31 लाख शाळांमधील 1.76 कोटींहून अधिक शालेय विद्यार्थ्‍यांनी या स्पर्धेत भाग घेतला आहे. राष्ट्रीय स्तरावर 100 विजेत्यांची निवड करण्यात आली आहे. या विजेत्यांपैकी  प्रत्येकी 25 विद्यार्थ्यांचा एक असे चार गट करण्यात आले …

Read More »

छात्रांना वास्तविक जगातील आव्हानांवर उपाय विकसित करण्यासाठी साधने आणि मार्गदर्शन प्रदान करण्यासाठी डीजी एनसीसीने आयोजित केलेल्या ‘आयडिया अँड इनोव्हेशन कॉम्पिटिशन’चे नवी दिल्ली येथे उद्घाटन

राष्ट्रीय छात्र सेनेचे (नॅशनल कॅडेट कोर) महासंचालक लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंह यांनी 10 जानेवारी 2025 रोजी एनसीसी बिल्डिंग, सफदरजंग, नवी दिल्ली येथे ‘आयडिया अँड इनोव्हेशन (कल्पना आणि नवोन्मेश) कॉम्पिटिशन’ या स्पर्धेचे उद्घाटन केले. एनसीसी प्रजासत्ताक दिन शिबिरात (आरडीसी) प्रथमच हाती घेण्यात आलेल्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून, छात्रांना सूक्ष्म विचार करण्यासाठी आणि प्रत्यक्षातील आव्हानांवर उपाय विकसित करण्यासाठी साधने आणि …

Read More »

सध्याचे सुरक्षेशी संबंधित वातावरण पाहता जागतिक समुदायांनी एकजूट वाढवण्याचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे आवाहन

अनेक संघर्ष आणि आव्हानांनी ग्रासलेले सध्याचे सुरक्षाविषयक वातावरण पाहता जागतिक समुदायांनी एकजूट वाढवण्यावर भर देण्याचे आवाहन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह  यांनी केले आहे. एअरो इंडिया 2025 या हवाई प्रदर्शनासाठी पूर्वतयारीच्या निमित्ताने नवी दिल्ली इथे आयोजित केलेल्या राजदूतांच्या गोलमेज परिषदेत ते बोलत होते. परस्पर समृद्धी आणि जागतिक शांततेसाठी सध्याच्या भूराजकीय तणावातून बाहेर येण्याची गरज …

Read More »

नमामि गंगे मिशन अंतर्गत महाकुंभ 2025 मध्ये विशेष स्वच्छता उपाययोजना

राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियानांतर्गत महाकुंभ 2025 मध्ये विशेष स्वच्छता व्यवस्थापन उपाययोजना राबवल्या जात असून, यासाठी रु. 152.37 कोटी खर्च करण्यात येत आहेत.पारंपारिक पद्धतींना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन, कार्यक्रम स्थळी स्वच्छ आणि शाश्वत पर्यावरण सुनिश्चित करण्यात आले आहे. गंगा नदीची शुद्धता कायम राखून, प्रभावी कचरा व्यवस्थापन आणि प्लास्टिकमुक्त झोन तयार करणे, याला महाकुंभ 2025 च्या आयोजनात सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. …

Read More »

कारागिरांनी परिस्थितीनुसार तसेच युवा पिढीच्या आवडीनिवडीनुसार डिझाईन बनवल्या तर त्यांना एक मोठी बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आवाहन

आपल्या देशातील रोजगार क्षेत्रामध्ये  हातमाग, हस्तकला या क्षेत्राचे योगदान महत्त्वाचे असून या कलेच्या  वस्तू चांगल्या डिझाईन विकसित करून निर्यात करता येतात.  कारागिरांनी परिस्थितीनुसार तसेच  युवा पिढीच्या आवडीनिवडीनुसार   डिझाईन बनवल्या तर त्यांना एक मोठी बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते असे प्रतिपादन  केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी  यांनी आज केले केंद्रीय …

Read More »

18 व्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाच्या समारोप समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार प्रदान

ओदिशामध्ये भुवनेश्वर येथे आयोजित केलेल्या 18 व्या प्रवासी भारतीय दिवस अधिवेशनाच्या समारोप सत्रामध्ये आज (10 जानेवारी, 2025) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू  सहभागी झाल्या आणि त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी त्यांनी प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार देखील प्रदान केले. यावेळी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या परदेशातील भारतीय समुदाय आपल्या देशाचे सर्वोत्तम प्रतिनिधित्व करतो. त्यांनी या पवित्र भूमीतून प्राप्त केलेले …

Read More »

आरटीआय पोर्टलचे कामकाज सुरळीत सुरू, ओटीपी बाबतच्या तक्रारींवर कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाकडून स्पष्टीकरण

नवी दिल्‍ली, 9 जानेवारी 2025 कार्मिक व प्रशिक्षण विभागाने (डीओपीटी) माहितीचा अधिकार पोर्टलच्या कामकाजाबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नांबाबत सर्व प्रकारची तपासणी करुन, नवी वन टाइम पासवर्ड (ओटीपी) सुविधा सुरू केल्यानंतरही पोर्टलचे काम सुरळीतपणे चालू असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. डीओपीटी ने सर्वंकष आढावा घेऊन पोर्टलच्या सुधारित सुरक्षा प्रणालीसह सर्व नव्याने सुरू केलेल्या …

Read More »