नवी दिल्ली, 9 जानेवारी 2025 महाकुंभ 2025 साठी जगभरातून येणाऱ्या 40-45 कोटीपेक्षा जास्त भाविकांना उत्तर प्रदेशातल्या गावांमध्ये स्वच्छ सुजल गाव या संकल्पनेतून झालेला बदल अनुभवायला मिळेल. पेयजलाचा पर्याय – माझ्या गावाची नवी ओळख या संकल्पनेवर आधारित या उपक्रमाद्वारे एकेकाळी जलदुर्भिक्ष्याचा सामना कराव्या लागणाऱ्या बुंदेलखंड प्रदेशाने पेयजलाची समस्या सोडवणारा प्रदेश अशी …
Read More »आंध्र प्रदेशातील तिरुपती इथे चेंगराचेंगरी होऊन झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले तीव्र दु:ख
आंध्र प्रदेशातील तिरुपती इथे चेंगराचेंगरी होऊन झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. या संदर्भात पंतप्रधान कार्यालयाने एक्स या समाज माध्यमावर पोस्ट केलेला शोक संदेश ; ‘आंध्र प्रदेशातील तिरुपती इथे झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेबद्दल अंत्यत दु:ख झाले. ज्यांनी आपल्या जवळच्या प्रियजनांना गमावले आहे माझ्या संवेदना त्यांच्यासोबत आहेत. …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले ओदिशामध्ये आयोजित 18 व्या प्रवासी भारतीय दिन अधिवेशनाचे उद्घाटन
नवी दिल्ली, 9 जानेवारी 2025 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ओदिशातील भुवनेश्वर इथे आयोजित केलेल्या 18 व्या प्रवासी भारतीय दिन अधिवेशनाचे उद्घाटन केले. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या अधिवेशनासाठी आलेल्या प्रतिनिधींचे तसेच जगभरात विविध देशांमध्ये वसलेल्या भारतीय समुदायाच्या (Indian diaspora) नागरिकांचे स्वागत केले. या अधिवेशनाचे उद्घाटन गीत या पुढे, …
Read More »जिनोम इंडिया प्रकल्पाच्या शुभारंभ प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलेले विचार
नवी दिल्ली, 9 जानेवारी 2025 जिनोम इंडिया प्रकल्पाचा शुभारंभ करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे आज आपले विचार व्यक्त केले. भारताने संशोधन क्षेत्रात एक ऐतिहासिक पाऊल टाकले आहे, असे पंतप्रधान यावेळी बोलताना म्हणाले. जिनोम इंडिया प्रकल्पाला 5 वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली होती आणि आपल्या शास्त्रज्ञांनी प्रामाणिकपणे काम केले आणि कोविड …
Read More »युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा निखिल खडसे यांनी ओदिशातील आकांक्षी जिल्हा ढेंकनालला भेट देऊन विकासकामांचा घेतला आढावा
मुंबई, 8 जानेवारी 2025 केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा निखिल खडसे यांनी भारत सरकारच्या प्रमुख आकांक्षा जिल्हा कार्यक्रमाचा (ADP) भाग म्हणून, 7 जानेवारी 2025 (मंगळवार) रोजी ओदिशातील ढेंकनाल जिल्ह्याला भेट दिली. हा कार्यक्रम सहकारिता-संघवादाच्या भावनेने राज्यांना मुख्य प्रेरक मानून, प्रत्येक जिल्ह्याच्या सामर्थ्यावर लक्ष केंद्रित करतो, तत्काळ सुधारणा आवश्यक …
Read More »एआय आणि ब्लॉक चेन तंत्रज्ञान आता एक पर्याय नव्हे तर एकमेव पर्याय असेल, मानवतेच्या कल्याणासाठी त्यांचा सर्वोत्तम वापर हे आव्हान,” केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांचे सायबर सिक्युरिटी, एआय आणि ब्लॉकचेनवरील राष्ट्रीय परिषदेत प्रतिपादन
नवी दिल्ली, 8 जानेवारी 2025 कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञान हे यापुढे केवळ पर्याय असणार नाहीत तर त्यांना भविष्यात एकमेव व्यवहार्य पर्याय म्हणून त्यांना पसंती राहील असे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी विशद केले. पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री येथे आज सायबर …
Read More »भविष्यासाठी स्वतःला सज्ज बनवण्याच्या दिशेने भारतीय रेल्वेची वाटचाल सुरु, प्रवाशांना सुरक्षित, जलद आणि जागतिक दर्जाचा प्रवासाचा अनुभव देण्यासाठी चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीपैकी 76% रक्कम क्षमता विकासावर केले खर्च
नवी दिल्ली, 8 जानेवारी 2025 कोट्यवधी भारतीयांना वाजवी दरात जलद, सुरक्षित आणि जागतिक दर्जाचा प्रवासाचा अनुभव देणे ही सोपी गोष्ट नाही. मात्र, भौगोलिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण भारताला सेवा देणारी भविष्यासाठी सज्ज असलेली संस्था म्हणून स्वत:मध्ये परिवर्तन घडवून, भारतीय रेल्वेने हे काम मिशन मोडमध्ये हाती घेतले आहे. अर्थसंकल्पीय तरतुदीशी …
Read More »भारतीय नवीकरणीय ऊर्जा विकास संस्थेने सलग चौथ्या वर्षी सामंजस्य करार कामगिरीमध्ये मिळवले उत्कृष्ट मानांकन
भारतीय नवीकरणीय ऊर्जा विकास संस्था मर्यादित(IREDA) ने नूतन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयासोबत 2023-24 या आर्थिक वर्षाकरिता केलेल्या सामंजस्य कराराच्या कामगिरीसाठी 98.24( पूर्णांकी 98) गुणांसह सर्वोत्कृष्ट मानांकन मिळवले आहे. सलग चौथ्या वर्षी या संस्थेने सर्वोत्कृष्ट हे मानांकन मिळवून परिचालनात्मक उत्कृष्टता आणि कॉर्पोरेट शासनाच्या सर्वोच्च निकषांप्रति आपल्या अविचल वचनबद्धतेचे दर्शन घडवले आहे. …
Read More »60 दिवसांच्या चिकाटी कार्यक्रमाचा भाग म्हणून, भारतीय नौदलाने मानसिक आरोग्यासंबंधी कार्यशाळा केली आयोजित
नवी दिल्ली, 8 जानेवारी 2025 भारतीय नौदलाने 07 जानेवारी 2025 रोजी, नवी दिल्लीतील, डीआरडीओ भवनातील डॉ डी एस कोठारी सभागृहात आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या अध्यात्म शिक्षिका, सिस्टर बीके शिवानी यांच्या नेतृत्वाखाली ‘स्व-परिवर्तन आणि आंतरिक-जागरण’ या विषयावरील परिवर्तनात्मक कार्यशाळा आयोजित केली होती. नौदल कर्मचाऱ्यांचा मानसिक आणि भावनिक कणखरपणा वाढवण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात …
Read More »संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मालदीवचे संरक्षण मंत्री मोहम्मद घसान मौमून यांच्यात नवी दिल्ली येथे द्विपक्षीय चर्चा
नवी दिल्ली, 8 जानेवारी 2025 संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 8 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्ली येथे मालदीवचे संरक्षण मंत्री मोहम्मद घसान मौमून यांच्यासमवेत द्विपक्षीय चर्चा केली तसेच द्विपक्षीय संरक्षण आणि सुरक्षा सहकार्याच्या विविध पैलूंचा व्यापक आढावा घेतला. चर्चेदरम्यान, उभय नेत्यांनी भारत-मालदीव सर्वसमावेशक आर्थिक आणि सागरी सुरक्षा भागीदारीसाठी संयुक्त दृष्टीकोन …
Read More »
Matribhumi Samachar Marathi