Tuesday, December 16 2025 | 10:39:53 PM
Breaking News

वैद्यकीय वस्त्रांसाठीच्या गुणवत्ता नियंत्रण आदेशाचा (Quality Control Order – QCO) अवलंब करण्यासाठीच्या कालावधीला मुदतवाढ

भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाने वैद्यकीय वस्त्रांकरता गुणवत्ता नियंत्रण आदेश (Quality Control Order – QCO) जारी केला होता. वैद्यकीय वस्त्रे, वैद्यकीय वस्त्रोद्योग (गुणवत्ता नियंत्रण) आदेश, 2024 या शिर्षकाअंतर्गत हा आदेश जारी केला गेला होता. वैद्यकीय वस्त्रांच्या श्रेणीअंतर्गत येणाऱ्या उत्पादनांची सुरक्षा आणि कार्यक्षमता सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने मंत्रालयाने हा आदेश जारी केला होता. या आदेशाच्या माध्यमातून …

Read More »

वंदे भारत स्लीपर रेल्वेगाड्या लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना लवकरच देणार जागतिक दर्जाच्या रेल्वे प्रवासाचा अनुभव

हे नवे वर्ष भारतातील प्रवाशांना जलद आणि सुरक्षित रेल्वे प्रवासाची भेट देण्यासाठी सज्ज झाले आहे.  केंद्र सरकारने याआधीच देशभरातील रेल्वे प्रवाशांकरता, कमी आणि मध्यम पल्ल्याच्या बसण्याची आसन व्यवस्था ( chair car) असलेल्या रेल्वे गाड्यांमधून जलद, सुरक्षित आणि जागतिक दर्जाच्या प्रवासाचा अनुभव घेण्याची सुविधा यशस्वीरित्या उपलब्ध करून दिली आहे. त्यानंतर आता भारतीय रेल्वे याच प्रकारच्या …

Read More »

ईपीएफओच्या भारतभरातील सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये केंद्रीकृत पेन्शन पेमेंट प्रणाली पूर्ण क्षमतेने कार्यान्वित

निवृत्ती वेतन वितरण सेवेचा विस्तार करण्याच्या दिशेने महत्वाचे पाऊल उचलत, ईपीएफओने डिसेंबर 2024 मध्ये कर्मचारी पेन्शन योजना 1995 अंतर्गत नवीन केंद्रीकृत निवृत्ती वेतन वितरण प्रणाली (सीपीपीएस) पूर्ण क्षमतेने कार्यान्वित केली. ईपीएफओच्या सर्व 122 पेन्शन वितरण क्षेत्रीय कार्यालयांशी संबंधित 68 लाखांहून अधिक पेन्शनधारकांना डिसेंबर 2024 साठी सुमारे 1570 कोटी रुपये पेन्शन वितरित करण्यात आले. सेंट्रलाइज्ड पेन्शन पेमेंट सिस्टीमचा (सीपीपीएस) पहिला प्रायोगिक उपक्रम ऑक्टोबर, 2024 मध्ये …

Read More »

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय संचार ब्युरोच्या प्रदर्शनाला भेट

पुणे, दिनांक ३ जानेवारी २०२५ पुण्यामध्ये आर्मी दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्यूरोतर्फे नागरिकांसाठी सैन्य विषयक माहिती आणि चित्र प्रदर्शन उभे करण्यात आले आहे. या बहुमाध्यम प्रदर्शनाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील भेट दिली. यामध्ये भारतीय लष्कराशी संबंधित छायाचित्रे आणि माहिती प्रदर्शित करण्यात आली आहे. सोबतच डिजीटल मीडियाचा उपयोग करुन आकर्षक आणि मनोरंजक …

Read More »

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली आयलंड डेव्हलपमेंट एजन्सीची (आयडीए) सातवी बैठक संपन्न

केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली येथे आयलंड डेव्हलपमेंट एजन्सी (आयडीए), अर्थात बेट विकास संस्थेची सातवी बैठक पार पडली. बैठकी दरम्यान केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अंदमान-निकोबार बेटे आणि लक्षद्वीपमध्ये सुरू असलेल्या विकास प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला. गृह मंत्रालय, अंदमान आणि निकोबार बेटे प्रशासन आणि लक्षद्वीप प्रशासनाने …

Read More »

राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी)च्या प्रजासत्ताक दिन शिबिर 2025 मध्ये सहभागी होणाऱ्या 2,361 पैकी 917 इतक्या विक्रमी संख्येने मुलींचा सहभाग

राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) च्या प्रजासत्ताक दिन शिबिर 2025 मध्ये 2,361 पैकी 917 इतक्या विक्रमी संख्येने मुलींचा सहभाग असून हे प्रमाण आतापर्यंतचे सर्वाधिक आहे. महिनाभर चालणाऱ्या या शिबिरात जम्मू आणि काश्मीर आणि लडाखमधील 114 आणि ईशान्य विभागातील 178 छात्रांचा समावेश आहे असे राष्ट्रीय छात्र सेनेचे महासंचालक (डीजीएनसीसी) लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंग यांनी 3 जानेवारी 2025 रोजी, दिल्ली कँट येथील पत्रकार परिषदेत सांगितले. युवक आदानप्रदान कार्यक्रमाअंतर्गत 18 मित्र …

Read More »

सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना वाहिली आदरांजली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे. सावित्रीबाई फुले या महिला सक्षमीकरणाचा दीपस्तंभ आहेत , तसेच त्या शिक्षण आणि सामाजिक सुधारणांच्या क्षेत्राच्या आद्य प्रवर्तक आहेत अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सावित्रीबाई फुले यांचा गौरव केला आहे. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या समाज माध्यमावर लिहिलेला संदेश …

Read More »

राणी वेलू नचियार यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी केले त्यांचे स्मरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शूर राणी वेलू नचियार यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण केले आहे. अतुलनीय शौर्य आणि सामरिक तेज दाखवून त्यांनी  वसाहतवादी राजवटीविरुद्ध वीरतापूर्ण लढा दिला, असा उल्लेख मोदींनी केला. X वर एका पोस्टमध्ये मोदींनी लिहिले की: “शूर राणी वेलू नचियार यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे भावपूर्ण स्मरण! त्यांनी अतुलनीय शौर्य आणि सामरिक तेज दाखवत वसाहतवादी राजवटीविरुद्ध वीरतापूर्ण लढा दिला. येणाऱ्या पिढ्यांना त्यांनी दडपशाहीविरुद्ध उभे राहण्यासाठी आणि …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीतील अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील अनेक महत्त्वाच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यानिमित्ताने झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना संबोधितही केले. त्यांनी उपस्थितांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. 2025 हे वर्ष भारताच्या विकासासाठी अफाट संधींचे वर्ष ठरेल आणि हे वर्ष देशाला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या ध्येयपूर्तीच्या दिशेने घेऊन जाईल, असा …

Read More »

पंतप्रधान 4 जानेवारी रोजी नवी दिल्ली येथे ग्रामीण भारत महोत्सव 2025 चे करणार उद्घाटन

नवी दिल्ली – दि.  03 जानेवारी, 2025 नवी दिल्ली येथील भारत मंडपममध्‍ये उद्या – 4 जानेवारी रोजी सकाळी 10:30 वाजता  पंतप्रधान  नरेंद्र मोदी ग्रामीण भारत महोत्सव 2025 चे उद्घाटन करणार आहेत. यावेळी ते उपस्थितांना संबोधित करणार आहेत. ग्रामीण भारताची उद्योजकता आणि सांस्कृतिक वारसा साजरा करणारा, हा महोत्सव 4 ते 9 जानेवारी या कालावधीत होणार आहे. विकसित भारत 2047 साठी एक लवचिक ग्रामीण भारत निर्माण करणे  …

Read More »