दिल्लीतील आर्मी हॉस्पिटल (रिसर्च अँड रेफरल) येथील नर्सिंग महाविद्यालयाच्या अकराव्या तुकडीच्या 29 नर्सिंग कॅडेट्सचा दीपप्रज्वलन समारंभ 8 फेब्रुवारी 2025 रोजी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात वरिष्ठ अधिकारी, लष्करी परिचारक सेवेतील अधिकारी, निवृत्त अधिकारी, सिव्हिल नर्सिंग विद्यालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते. लेफ्टनंट जनरल शंकर नारायण, कमांडंट, एएच (आर अँड आर) यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांना व्यावसायिक दर्जा राखण्यासाठी प्रेरितही केले. …
Read More »
Matribhumi Samachar Marathi