पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसी येथून पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेचा 20 वा हप्ता जारी केला. भूधारक शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी पीएम-किसान ही फेब्रुवारी 2019 मध्ये पंतप्रधानांनी सुरू केलेली एक केंद्रीय योजना आहे. या योजनेंतर्गत, शेतकऱ्यांच्या आधार-जोडणी केलेल्या बँक खात्यांमध्ये थेट लाभ हस्तांतरण पद्धतीने, वार्षिक रु.6,000/- तीन …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (124 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार! ‘मन की बात’मध्ये पुन्हा एकदा चर्चा होईल ती देशाला मिळालेल्या यशाची, देशवासियांनी केलेल्या कामगिरीची! गेल्या काही आठवड्यामध्ये क्रीडा क्षेत्र असो, विज्ञान असो अथवा संस्कृतीचे क्षेत्र असो, प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा, अशी कामगिरी अनेकांनी केली आहे. अलिकडेच शुभांशू शुक्ला हे अवकाशातून परतले, याविषयी संपूर्ण देशामध्ये खूप चर्चा झाली. शुभांशू सुरक्षित भूमीवर परतताच लोकांच्या …
Read More »निर्णयांची सूची: पंतप्रधानांचा मालदीवचा राजकीय दौरा
अनुक्रमांक करार/सामंजस्य करार 1. मालदीवसाठी 4,850 कोटी भारतीय रुपयांची कर्ज मर्यादा (LoC) वाढवणे. 2. भारत सरकारद्वारे निधी उपलब्ध केलेल्या LoC वर मालदीवच्या वार्षिक कर्ज परतफेडीची बंधने कमी करणे. 3. भारत-मालदीव मुक्त व्यापार करार (IMFTA) वाटाघाटींचा शुभारंभ. 4. भारत-मालदीव राजनैतिक संबंध स्थापनेच्या 60 व्या वर्धापन दिनाच्या स्मरणार्थ संयुक्तपणे टपाल तिकीट जारी करणे. अनुक्रमांक उद्घाटन / हस्तांतरण 1. भारताच्या बायर्स क्रेडिट (खरेदीदार कर्ज योजना) …
Read More »संसदेच्या पावसाळी अधिवेशन 2025 च्या आरंभी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले निवेदन
नवी दिल्ली, 21 जुलै 2025. संसदेच्या पावसाळी अधिवेशन 2025 च्या आरंभी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संसद भवन परिसरात प्रसारमाध्यमांना संबोधित केले. पावसाळी अधिवेशनात सर्वांचे स्वागत करताना, पंतप्रधान म्हणाले की मान्सून हे नवोन्मेष आणि पुनरुज्जीवनाचे प्रतीक आहे. देशभरातील हवामानाची स्थिती सुधारत असल्याचे अधोरेखित करून त्यांनी सांगितले की त्यामुळे कृषिक्षेत्रासाठी लाभदायक भविष्याचा …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील मोतिहारी येथे 7,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन केले
नवी दिल्ली, 18 जुलै 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमधील मोतिहारी येथे 7,000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि राष्ट्रार्पण केले. पवित्र श्रावण महिन्यात बाबा सोमेश्वरनाथांच्या चरणी नमस्कार करत पंतप्रधानांनी आशीर्वाद मागितले आणि बिहारमधील सर्व नागरिकांच्या जीवनात आनंद आणि समृद्धी नांदो, अशी सदिच्छा व्यक्त केली. सभेला संबोधित …
Read More »पंतप्रधानांचा 18 जुलै रोजी बिहार आणि पश्चिम बंगाल राज्यांचा दौरा
नवी दिल्ली, 17 जुलै 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 जुलै रोजी बिहार आणि पश्चिम बंगाल राज्यांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. बिहारमधील मोतीहारी इथे सकाळी सुमारे 11.30 वाजता राज्यातल्या 7,200 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे भूमीपूजन, उद्घाटन आणि लोकार्पण त्यांच्या हस्ते केले जाणार आहे. या कार्यक्रमात त्यांचे भाषणही होणार आहे. त्यानंतर …
Read More »राष्ट्रपतींकडून राज्यसभेसाठी नामनिर्देशीत करण्यात आलेल्या चार मान्यवर व्यक्तींना पंतप्रधानांच्या शुभेच्छा
राष्ट्रपतींकडून राज्यसभेसाठी नामनिर्देशीत करण्यात आलेल्या चार मान्यवर व्यक्तींना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनःपूर्वक शुभेच्छा देत अभिनंदन केले आहे. एक्स या समाज माध्यमावरच्या संदेशातून पंतप्रधानांनी प्रत्येक नामनिर्दशीत व्यक्तीचे योगदान अधोरेखित केले. पंतप्रधानांनी, श्री उजव्वल निकम यांच्या विधि क्षेत्रातील उल्लेखनीय निष्ठा व संविधान मूल्यांप्रती असलेल्या बांधिलकीचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, निकम …
Read More »पंतप्रधानांनी घेतली ब्राझीलच्या राष्ट्रपतींची भेट
नवी दिल्ली, 9 जुलै 2025 पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्राझीलियाच्या राजकीय दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज ब्राझीलियातील अल्व्होराडा पॅलेस येथे ब्राझीलचे राष्ट्रपती महामहिम लुईझ इनासियो लुला दा सिल्वा यांची भेट घेतली. आगमनानंतर, अध्यक्ष लूला यांनी पंतप्रधानांचे हार्दिक स्वागत केले आणि त्यांनंतर औपचारिक आणि स्वागत सोहळा पार पडला. पंतप्रधान आणि राष्ट्रपती लूला यांनी …
Read More »ब्राझीलच्या राष्ट्रपतींसोबत संयुक्त पत्रकार परिषदेदरम्यान पंतप्रधानांनी पत्रकारांना दिलेल्या निवेदनाचा मराठी मजकूर
महामहिम, माझे जिवलग मित्र राष्ट्रपती लूला, आणि दोन्ही देशांतील माध्यम प्रतिनिधींनो! नमस्कार “बोआ तार्ज”! रिओ आणि ब्राझिलियामध्ये अतिशय जिव्हाळ्याने केलेल्या माझ्या स्वागताबद्दल मी माझे मित्र, राष्ट्राध्यक्ष लुला यांचे मनापासून आभार मानतो. अमेझॉनच्या सौंदर्याने आणि तुमच्या सह्रदयतेने आम्ही खरोखरच प्रभावित झालो आहोत. आज, ब्राझीलच्या राष्ट्रपतींकडून ब्राझीलच्या सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित होणे हा केवळ माझ्यासाठीच नाही तर 140 कोटी …
Read More »ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथे 17 व्या ब्रिक्स शिखर परिषदेत पंतप्रधान झाले सहभागी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 6-7 जुलै 2025 ला ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथे आयोजित केलेल्या सतराव्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभाग घेतला.जागतिक स्तरावर प्रशासनात सुधारणा, साउथ ग्लोबल देशांचा आवाज अधिक बुलंद करणे, शांतता आणि सुरक्षा, बहुपक्षीयता बळकट करणे, विकासाचे मुद्दे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यासह ब्रिक्स कार्यक्रम सूचीवरील विविध मुद्द्यांवर सर्व नेत्यांनी फलदायी चर्चा केली. ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांनी जिव्हाळ्याने केलेल्या आदरातिथ्याबद्दल आणि शिखर …
Read More »
Matribhumi Samachar Marathi