Sunday, December 07 2025 | 08:41:58 AM
Breaking News

Tag Archives: Prime Minister

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एस्टोनिया प्रजासत्ताकाच्या राष्ट्राध्यक्षांची घेतली भेट

नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पॅरिसमधील एआय ॲक्शन समिटच्या पार्श्वभूमीवर एस्टोनिया प्रजासत्ताकाचे राष्ट्रपती अलार कारिस यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांची ही पहिलीच भेट होती. भारत आणि एस्टोनियामधील मधुर आणि मैत्रीपूर्ण संबंध लोकशाही, कायद्याचे राज्य आणि स्वातंत्र्य तसेच बहुलवादाच्या मूल्यांप्रती त्यांच्या सामायिक वचनबद्धतेवर आधारित आहेत, हे पंतप्रधान …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूषवले पॅरिसमधील एआय-कृती शिखर परिषदेचे सह अध्यक्षपद

नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फ्रान्सचे अध्यक्ष एम्मान्युएल मॅक्राँ यांच्यासह पॅरिसमध्ये एआय कृती शिखर परिषदेचे सहअध्यक्षपद भूषवले. एक आठवडाभर चालणाऱ्या या शिखर परिषदेची 6-7 फेब्रुवारी या विज्ञान दिनी सुरुवात झाली. त्यानंतर 8-9 फेब्रुवारीला सांस्कृतिक सप्ताहांचे आयोजन झाले. जागतिक नेते, धोरणकर्ते आणि उद्योग धुरीण यांच्या उपस्थितीत एका …

Read More »

फ्रान्स आणि अमेरिका दौऱ्याला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निवेदन

नवी दिल्‍ली, 10 फेब्रुवारी 2025. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी दिलेल्या निमंत्रणाला प्रतिसाद म्हणून मी 10 ते 12 फेब्रुवारी या दरम्यान फ्रान्सला भेट देणार आहे. पॅरिसमध्ये पोहोचल्यावर, मी तिथे होणार असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ताविषयक कृती शिखर परिषदेचे सहअध्यक्षपद भूषविण्यासाठी उत्सुक आहे. या शिखर परिषदेत जगभरातील नेते आणि तंत्रज्ञान क्षेत्रातले जगभरातले अनेक मुख्य कार्यकारी …

Read More »

यंदाच्या परीक्षा पे चर्चा या संवादात्मक उपक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला

नवी दिल्‍ली, 10 फेब्रुवारी 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील सुंदर नर्सरी येथील विद्यार्थ्यांशी ‘परीक्षा पे चर्चा’ (पीपीसी) कार्यक्रमाद्वारे संवाद साधला. संवादात्मक उपक्रमाचा हा 8 वा भाग होता. देशभरातील विद्यार्थ्यांशी अनौपचारिक संवाद साधताना पंतप्रधानांनी विविध विषयांवर चर्चा केली. हिवाळ्यात शरीर उबदार ठेवण्यासाठी पारंपरिकपणे दिल्या जाणाऱ्या तिळापासून बनवलेल्या मिठाईंचे वाटप …

Read More »

श्री कामेश्वर चौपाल यांच्या निधनाबद्दल,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले दुःख

श्री कामेश्वर चौपाल यांच्या निधनाबद्दल,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दुःख व्यक्त केले आहे.अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीत मोलाचे योगदान देणारे समर्पित रामभक्त अशा शब्दांत पंतप्रधानांनी त्यांची प्रशंसा केली आहे. आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधानांनी लिहिले आहे : “भाजपचे ज्येष्ठ नेते आणि रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र विश्वस्थ संस्थेचे विश्वस्थ कामेश्वर चौपाल यांच्या निधनाने दु:ख झाले आहे.  …

Read More »

‘परीक्षा पे चर्चा’ चे पुनरागमन आणि ते सुद्धा नव्या तसेच अधिक उत्साहवर्धक स्वरुपात : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्‍ली, 6 फेब्रुवारी 2025. सर्व परीक्षार्थी त्यांचे पालक आणि शिक्षक यांना 2025 चा परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम पाहण्याची विनंती करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या समाज माध्यमावर लिहिले आहे. “‘परीक्षा पे चर्चा’ चे पुनरागमन झाले आहे आणि ते सुद्धा एका नव्या तसेच उत्साहवर्धक रुपात ! सर्व #ExamWarriors, त्यांचे …

Read More »

प्रयागराज मधल्या महाकुंभाला उपस्थित राहण्याचे भाग्य लाभले: पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्‍ली, 5 फेब्रुवारी 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रयागराज येथे महाकुंभाला भेट दिली आणि संगमावर जाऊन पवित्र स्नान केले. एक्स या समाज माध्यमावर लिहिलेल्या स्वतंत्र संदेशात त्यांनी म्हटले आहे: “प्रयागराज येथे महाकुंभाला जाण्याचा पवित्र योग आला हे भाग्य. संगमावर स्नान करणे हा दिव्य संयोगाचा क्षण आहे आणि या कुंभमेळ्यात …

Read More »

बेल्जियमच्या पंतप्रधानपदाचा कार्यभार बर्ट डी वेव्हर यांनी स्वीकारल्या बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे

महामहीम बर्ट डी वेव्हर यांनी  बेल्जियमच्या पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारल्या बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांचे अभिनंदन केले. भारत आणि बेल्जियम मधील संबंध अधिक दृढ करण्यासाठी आणि जागतिक स्तरावरील मुद्द्यांवर  सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी एकत्र काम करण्याचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केला. पंतप्रधानांनी एक्स समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये लिहिले आहे : …

Read More »

करसनभाई सोलंकी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक

नवी दिल्‍ली, 4 फेब्रुवारी 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरात विधानसभेचे सदस्य करसनभाई सोलंकी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. X या समाज माध्यमावरच्या संदेशात पंतप्रधानांनी म्हटले आहे : “ગુજરાત વિધાનસભાના સભ્ય શ્રી કરસનભાઈ સોલંકીના અવસાનના સમાચાર આઘાતજનક છે. સાદગીભર્યું જીવન અને વંચિતોના કલ્યાણ માટે કરેલા સેવાકીય કાર્યો માટે તેઓ સદાય …

Read More »

लठ्ठपणाशी लढण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदेशाला पाठिंबा देण्यासाठी केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या नेतृत्वाखाली 250 हुन अधिक सायकलस्वार एकत्र आले

देशातील नागरिकांना लठ्ठपणाच्या समस्येविरोधात लढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने  केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी नवी दिल्लीत आज सायकल रॅलीचे नेतृत्व केले. मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये या आठवड्यातील फिट इंडिया संडे या उपक्रमाअंतर्गत ही सायकल रॅली आयोजित केली गेली होती. यात असंख्य …

Read More »