आपल्या राष्ट्रीय परिवर्तनाचा पाया हा सामाजिक सलोखा, कौटुंबिक प्रबोधन, पर्यावरण विषयक जाणीव, स्वदेशी आणि नागरी कर्तव्ये या पाच शक्तिशाली स्तंभांवर आधारलेला आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले आहे. हे पाच संकल्प – अर्थात आपले पंच प्रण आपल्या समाजाच्या धमन्यांमधून प्रवाहित होत असून ते राष्ट्रवादाच्या अजेय भावनेला उत्तेजन देत असल्याचेही उपराष्ट्रपतींनी म्हटले आहे. …
Read More »हिंदू आणि सनातन संदर्भात भारतात उमटणाऱ्या धक्कादायक प्रतिक्रिया आकलना पलीकडील आणि वेदनादायक असल्याचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे प्रतिपादन
हिंदू आणि सनातन संदर्भात भारतात उमटणाऱ्या धक्कादायक प्रतिक्रिया आकलना पलीकडील आणि वेदनादायक असल्याचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटले आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील कन्व्हेन्शन सेंटर येथे आज वेदांताच्या 27 व्या आंतरराष्ट्रीय काँग्रेसच्या उद्घाटनपर भाषणात उपराष्ट्रपती धनखड म्हणाले की, “आपली संस्कृती सर्वात प्राचीन संस्कृतींपैकी एक असून, ती सर्व प्रकारे एकमेवाद्वितीय आहे. उपरोधाची आणि खेदाची गोष्ट …
Read More »ग्वाल्हेरमध्ये जी एस आय भूविज्ञान संग्रहालयाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते उद्घाटन
मध्य प्रदेशात ग्वाल्हेर मध्ये व्हिक्टोरिया मार्केट इमारत येथे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज फित कापून आणि फलकाचे अनावरण करून अत्याधुनिक भूवैज्ञानिक सर्वेक्षण ऑफ इंडिया (जीएसआय ) भूविज्ञान संग्रहालयाचे उद्घाटन केले. भव्य परंपरेसह आधुनिक नवकल्पनांच्या चमत्कारांचा अनोखा संयोग घडवत एका उल्लेखनीय सोहळ्याच्या स्वरुपात हा कार्यक्रम सादर झाला. ग्वाल्हेर भूविज्ञान संग्रहालय हे …
Read More »सध्याची संस्थात्मक आव्हाने अर्थपूर्ण संवाद व योग्य अभिव्यक्तीच्या कमतरतेतून निर्माण होत आहेत – उपराष्ट्रपती
संस्थात्मक आव्हानांकडे लक्ष वेधताना उपराष्ट्रपती जगदीप धनखड म्हणाले, ‘सध्या संस्थाअंतर्गत किंवा संस्थाबाह्य आव्हाने बरेचदा अर्थपूर्ण संवाद व योग्य अभिव्यक्ती यांच्या कमतरतेमुळे निर्माण होत आहेत. अभिव्यक्ती व अर्थपूर्ण संवाद हे दोन्हीही लोकशाहीतील अमूल्य रत्ने आहेत. अभिव्यक्ती व संवादकौशल्य एकमेकांना पूरक आहेत. या दोन्हीतला योग्य ताळमेळ हे यशाचे गमक आहे.’ अंतस्थ मूल्यांचे …
Read More »उपराष्ट्रपतींनी पिकांचे अवशेष जाळण्यावर पद्धतशीर उपाय शोधण्याचे केले आवाहन, आपला निष्काळजीपणा आपल्यालाच संकटात टाकत असल्याचा दिला इशारा
शेतातील पिकांचे अवशेष जाळण्यावर पद्धतशीर उपाय शोधण्याचे आवाहन आज उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले. ‘हे काम कोणा एका व्यक्तीकडे सोपवून चालणार नाही,’ असे ते म्हणाले. राष्ट्रीय उर्जा संवर्धन दिन 2024 निमित्त नवी दिल्लीतल्या विज्ञान भवनात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. धनखड म्हणाले, ‘पिकांचे अवशेष जाळल्यामुळे निर्माण होणाऱ्या घातक पर्यावरणीय परिस्थितीचा सामना राजधानी दिल्लीला …
Read More »संसदेवरील हल्ल्यातील शहीदांना उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि लोकसभेच्या अध्यक्षांनी वाहिली श्रद्धांजली
संसदेवर 13 डिसेंबर 2001 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात संसदेचे रक्षण करताना आपल्या प्राणांचे बलिदान दिलेल्या शहीदांना आज उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड ; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी अनेक केंद्रीय मंत्री, खासदार, माजी खासदार, शहीदांचे कुटुंबीय आणि इतर मान्यवरांनी पुष्पांजली अर्पण केली. लोकसभेचे सरचिटणीस उत्पल कुमार सिंह आणि राज्यसभेचे सरचिटणीस पी.सी. …
Read More »
Matribhumi Samachar Marathi