गुरुवार, नवंबर 21 2024 | 03:04:08 PM
Breaking News
Home / Choose Language / marathi / एचएमजेएस ने सुरू केले “भू-नीर” पोर्टल, भूगर्भजल वापरासाठी परवाने मिळवण्याची प्रक्रिया झाली सुलभ

एचएमजेएस ने सुरू केले “भू-नीर” पोर्टल, भूगर्भजल वापरासाठी परवाने मिळवण्याची प्रक्रिया झाली सुलभ

Follow us on:

केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील यांनी 19 सप्टेंबर 2024 रोजी भारत जल सप्ताह 2024 च्या समारोप सोहळ्यात “भू-नीर” या नवीन पोर्टलचे डिजिटल स्वरूपात उद्‌घाटन केले. हे अत्याधुनिक पोर्टल केंद्रीय भूजल प्राधिकरणाने (सीजीडब्ल्यूए), जलशक्ती मंत्रालयांतर्गत, राष्ट्रीय माहिती-विज्ञान केंद्र (एनआयसी) च्या सहकार्याने विकसित केले आहे. देशभरातील भूगर्भजलाच्या प्रभावी नियमनासाठी हे पोर्टल तयार करण्यात आले आहे. भूजलाच्या शाश्वत वापरासाठी पारदर्शकता, कार्यक्षमता, आणि टिकाऊपणाला प्रोत्साहन देणे हा भू-नीर पोर्टलचा मुख्य उद्देश आहे.

“भू-नीर” पोर्टलवर भूगर्भजलाच्या उपशासित वापराबाबत असलेल्या कायदेशीर चौकटीची सविस्तर माहिती उपलब्ध आहे. तसेच, भूगर्भजल उपसा आणि संबंधित नियमांबाबत राज्य व राष्ट्रीय स्तरावरील धोरणांची माहिती देखील येथे उपलब्ध आहे. या पोर्टलद्वारे केंद्रीय डेटाबेसचा वापर करून भूजलासंबंधित अनुपालन, धोरणे आणि शाश्वत पद्धतींची माहिती मिळवता येईल.

पॅन-आधारित सिंगल आयडी प्रणाली, क्यूआर कोडसह एनओसी, वापरण्यास सोपी माहितीपूर्ण यंत्रणा ही या पोर्टलची वापरकर्त्यांसाठी अनुकूल ठरतील अशी वैशिष्ठ्ये आहेत. “भू-नीर” पोर्टल पूर्वीच्या “एनओसीएपी” पोर्टलच्या तुलनेत अधिक प्रगत आहे.

“भू-नीर” पोर्टल, पंतप्रधानांच्या “इज ऑफ डूइंग बिजनेस” या संकल्पनेला पुढे नेणाऱ्या उपक्रमांपैकी एक असून, भूगर्भजल नियमन प्रक्रिया अधिक सोपी व डिजिटल स्वरूपात करण्याचा प्रयत्न आहे.

हे पोर्टल आता सर्वसामान्यांसाठी खुले आहे. सर्व प्रकल्प प्रस्तावक भूगर्भजल वापराशी संबंधित शंका,अर्जाचा तपशील जाणून घेणे, शुल्क भरणे यासाठी वापरकर्ते या पोर्टलला भेट देऊ शकतात.

मित्रों,
मातृभूमि समाचार का उद्देश्य मीडिया जगत का ऐसा उपकरण बनाना है, जिसके माध्यम से हम व्यवसायिक मीडिया जगत और पत्रकारिता के सिद्धांतों में समन्वय स्थापित कर सकें। इस उद्देश्य की पूर्ति के लिए हमें आपका सहयोग चाहिए है। कृपया इस हेतु हमें दान देकर सहयोग प्रदान करने की कृपा करें। हमें दान करने के लिए निम्न लिंक पर क्लिक करें -- Click Here


* 1 माह के लिए Rs 1000.00 / 1 वर्ष के लिए Rs 10,000.00

Contact us

Check Also

वीर गाथा 4.0 मध्ये 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील 1.76 कोटींहून अधिक शालेय विद्यार्थ्‍यांचा सहभाग

देशातील सर्व 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील 1.76 कोटींहून अधिक शालेय विद्यार्थ्यांनी वीर गाथा 4.0 …