2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदारांचा सहभाग वाढविण्याच्या आणि मतदानाची टक्केवारी वाढवण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र, यांनी आज, 8 नोव्हेंबर 2024 रोजी प्रसिद्ध गेटवे ऑफ इंडिया, मुंबई येथे राज्यस्तरीय मतदार जागृती कार्यक्रमाचा शुभारंभ केला. 20 नोव्हेंबर 2024 च्या निवडणुकीपूर्वी मतदारांना शिक्षित आणि प्रेरित करण्याच्या उद्देशाने राज्यव्यापी उपक्रमाची अधिकृत सुरुवात म्हणून या कार्यक्रमाला मान्यवरांचा समूह आणि प्रसिद्ध सार्वजनिक …
Read More »हेवी वॉटर बोर्ड (एचडब्ल्यूबी) ने न्यूक्लिओइलेक्ट्रिका अर्जेंटिना एस.ए समवेत जड पाण्याच्या पुरवठ्यासाठी केला करार
अणु उर्जा विभागाच्या हेवी वॉटर बोर्ड (एचडब्ल्यूबी) ने न्यूक्लिओइलेक्ट्रिका अर्जेंटिना एस.ए (नासा) समवेत जड पाण्याच्या पुरवठ्यासाठी करार केला आहे. हे पाणी अर्जेंटिनामधील नासा द्वारे संचालित प्रेशराईज्ड हेवी वॉटर रिएक्टर्स (पीएचडब्ल्यूआर) यासाठी वापरण्यात येईल. चार वर्षांच्या कालावधीचा हा करार 4 नोव्हेंबर 2024 रोजी झाला. या प्रसंगी एचडब्ल्यूबी चे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी एस. सत्यकुमार यांनी …
Read More »महापर्व छठ पूजाविधी नागरिकांना नवीन उत्साह आणि ऊर्जा देत समर्थ करतात: पंतप्रधान
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज छठच्या प्रभातकालच्या अर्ध्यदानाच्या पवित्र पूजेच्या नागरिकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि महापर्व छठपूजेच्या निमित्ताने चार दिवस चालणारे विधी नागरिकांना नवीन उर्जा आणि उत्साह देतात,असे नमूद केले. पंतप्रधानांनी आपल्या एक्स पोस्टवर म्हटले आहे; “महापर्व छठपूजेच्या चार दिवसांच्या निमित्ताने यातून दिसणारे निसर्ग आणि संस्कृतीचे दर्शन देशवासियांना नवीन …
Read More »पंतप्रधानांनी जैनाचार्य रत्नसुंदरसुरीश्वरजी महाराज साहेब यांची घेतली भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जैनाचार्य रत्नसुंदरसुरीश्वरजी महाराज साहेब यांची भेट घेतली. पंतप्रधानांनी जैनाचार्य रत्नसुंदरसुरीश्वरजी महाराज साहेब यांच्या समाजसेवा आणि अध्यात्म या क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांची प्रशंसा केली. पंतप्रधानांचा एक्स या समाज माध्यमावरील संदेश : “धुळे इथे आज जैनाचार्य रत्नसुंदरसुरीश्वरजी महाराज साहेब यांची भेट घेतली. समाजसेवा व आध्यात्मिक क्षेत्रातील त्यांचे योगदान …
Read More »लालकृष्ण अडवाणी जी यांना वाढदिवसानिमित्त पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लालकृष्ण अडवाणी जी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. भारताच्या विकासाला पुढे नेण्यासाठी स्वतःला समर्पित करणारे लालकृष्ण अडवाणी जी म्हणजे भारताच्या सर्वाधिक प्रशंसनीय राजनेत्यांपैकी एक आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, लालकृष्ण अडवाणी जी यांच्या निवासस्थानी देखील गेले आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केलेः “लालकृष्ण …
Read More »दक्षता जागृती सप्ताह 2024 मध्ये राष्ट्रपती सहभागी
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दक्षता जागृती सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात आज ( 8 नोव्हेंबर 2024 ) सहभागी झाल्या. या कार्यक्रमात बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की, आपल्या समाजात इमानदारी आणि शिस्त ही आयुष्यातली आदर्श तत्वे मानली जातात. भारतीयांना बेशिस्त आवडत नाही, ते कायद्याचे पालन करतात. त्यांच्या जगण्यात साधेपणा व काटेकोरपणा आहे असे मत सुमारे 2300 वर्षांपूर्वी मेगॅस्थेनीसने भारतीयांविषयी नोंदविले होते. फाहियान …
Read More »केंद्रीय लोक सेवा आयोगाने सप्टेंबर 2024 महिन्यातील भरती निकाल केले जाहीर
केंद्रीय लोक सेवा आयोगाचे सप्टेंबर 2024 महिन्यातील भरतीचे अंतिम निकाल पुढीलप्रमाणे आहेत.शिफारस केलेल्या उमेदवारांना वैयक्तिक पत्राद्वारे कळवण्यात आले आहे. इतर उमेदवारांचे अर्ज विचारात घेण्यात आले, परंतु त्यांना मुलाखतीसाठी बोलावणे किंवा पदासाठी शिफारस करणे शक्य झाले नाही याबद्दल आम्ही खेद व्यक्त करतो. निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
Read More »न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनीच्या अधिकाऱ्याला सक्तमजुरी, रक्कम जप्त
सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण विभागाच्या मुंबईतील एका प्रकरणांबाबत विशेष न्यायालयाने न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनीच्या तत्कालीन उप महाव्यवस्थापकांना चार वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.तसेच फसवणूकीच्या खोट्या दाव्यातील सहभागातून मिळालेले 1.3 कोटी रुपये जप्त केले. न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेडचे (NIACL) तत्कालीन उप महाव्यवस्थापक (DGM) आनंद प्रकाश मित्तल यांना (कंपनीच्या नायजेरियन उपकंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून …
Read More »इफ्फी 2024 मध्ये फिल्म बाजार व्ह्युईंग रुममध्ये 208 चित्रपटांचे होणार प्रदर्शन
20 ते 28 नोव्हेंबर 2024 दरम्यान गोव्याचे सांस्कृतिक परिदृश्य उजळून टाकण्यासाठी 55वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फी सज्ज झाला आहे. या सोबतच 20 ते 24 नोव्हेंबर दरम्यान फिल्म बाजारच्या 18व्या आवृत्तीचं देखील आयोजन करण्यात येणार आहे. चित्रपट निर्माते आणि उद्योगातील व्यावसायिकांना परस्परांसोबत जोडले जाण्यासाठी, सहकार्य करण्यासाठी आणि आपल्या प्रतिभेचे दर्शन …
Read More »केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह उद्या नवी दिल्लीत एनआयएने आयोजित केलेल्या ‘दहशतवाद प्रतिबंधक परिषद-2024’ ला करणार संबोधित
केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह उद्या नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या दहशतवाद प्रतिबंधक परिषद-2024’ च्या उद्घाटन सत्राला संबोधित करणार आहेत.केंद्रीय गृह मंत्रालयाच्या राष्ट्रीय तपास संस्थेने(एनआयए) या दोन दिवसीय परिषदेचे आयोजन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दहशतवादाविरोधात शून्य सहिष्णुता धोरणाचा अवलंब करून,दहशतवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी भारत सरकार वचनबद्ध …
Read More »