राज्यसभेत आज झालेल्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी संसदेतील कामकाजाच्या स्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले,
“ माननीय सदस्यगण,
संपूर्ण जग आपल्या लोकशाहीकडे पाहते, तरीही आपल्या वर्तनातून आपण आपल्या नागरिकांचा विश्वास गमावत आहोत. संसदेतील हा गोंधळ म्हणजे जनतेचा विश्वास आणि अपेक्षांची थट्टा आहे. अतिशय प्रामाणिकपणे सेवा करण्याच्या आपल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष होत आहे.
जिथे तर्कसंगत संवाद असला पाहिजे, तिथे आपल्याला केवळ गोंधळ पाहायला मिळतो आहे. मी सर्व पक्षाच्या संसद सदस्यांना आपल्या सद्सदविवेकबुद्धीचा अवलंब करण्याचे आवाहन करतो.
आपल्या लोकशाहीचे नागरिक- मानवतेचा सहावा भाग हे सर्व या गोंधळाच्या परिस्थितीपेक्षा अधिक चांगल्या परिस्थितीसाठी पात्र आहेत.
आपण अशा बहुमूल्य संधी वाया घालवत आहोत ज्यांच्या मदतीने आपण आपल्या जनतेचे अधिक चांगल्या प्रकारे कल्याण करू शकलो असतो.
मला अशी आशा आहे की आपले सदस्य सखोल आत्मपरीक्षण करतील आणि नागरिकांविषयीचे त्यांचे उत्तरदायीत्व निभावतील.
हे पवित्र कक्ष, आपल्या शपथेचा सन्मान करणाऱ्या वर्तनासाठी पात्र आहेत, त्यांचा विश्वासघात करणाऱ्या नाटकी वर्तनाचे नाहीत.
Matribhumi Samachar Marathi

