पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी हे उद्या म्हणजे २३ डिसेंबर रोजी सकाळी १०:३० वाजता दूरस्थ पद्धतीने नव्याने नियुक्त झालेल्या उमेदवारांना ७१,००० हून अधिक उमेदवारांना नियुक्ती पत्रांचे वितरण करणार आहेत. या प्रसंगी ते उपस्थितांना संबोधित देखील करणार आहेत.
रोजगार मेळावा हा पंतप्रधान यांच्या रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या वचनाची पूर्तता करण्याच्या दिशेने एक पाऊल आहे. हा उपक्रम युवकांना राष्ट्रनिर्माणाबरोबरच आत्मनिर्भर होण्याची संधी उपलब्ध करून देईल .
हा रोजगार मेळावा देशभरातील ४५ ठिकाणी आयोजित केला जाणार आहे. केंद्र
सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागांसाठी भरती केली जात आहे. देशभरातून निवडलेले नवे उमेदवार गृह मंत्रालय, टपाल कार्यालय, उच्च शिक्षण विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, वित्तीय सेवा विभाग यांसारख्या विविध मंत्रालये/विभागांमध्ये नियुक्त होतील.
Matribhumi Samachar Marathi

