Friday, January 16 2026 | 03:26:28 AM
Breaking News

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी वर्ष 2025 साठीचे दिव्यांग व्यक्ती सक्षमीकरण राष्ट्रीय पुरस्कार केले प्रदान

Connect us on:

नवी दिल्ली, 3 डिसेंबर 2025. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (3 डिसेंबर 2025) आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनाच्या निमित्ताने नवी दिल्ली येथे 2025 साठी दिव्यांग व्यक्ती सक्षमीकरण राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केले. समानता हा दिव्यांग व्यक्तींचा देखील अधिकार आहे. समाज आणि  राष्ट्राच्या विकासाच्या यात्रेत त्यांचा समान सहभाग सुनिश्चित करणे हे  दानधर्माचे कार्य नव्हे तर सर्वांचे कर्तव्य आहे, असे त्यांनी सांगितले.

“सामाजिक प्रगतीसाठी दिव्यांगांचा सहभाग असलेल्या समाजाला चालना देणे” ही  यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनाची संकल्पना देखील या पुरोगामी विचारावर आधारित आहे”, असे त्या म्हणाल्या.

आपला देश कल्याणकारी मानसिकतेच्या पलीकडे विचार करुन दिव्यांग व्यक्तींसाठी   अधिकारांवर आधारित आणि त्यांच्या प्रतिष्ठेला केंद्रस्थानी ठेवणाऱ्या व्यवस्थेचा पुरस्कार करतो, असे राष्ट्रपतींनी सांगितले.

अपंगत्त्व असलेल्या व्यक्तींप्रति विशेष आदर दर्शवण्यासाठी 2015 पासून त्यांना दिव्यांगजन म्हणून संबोधण्याचा निर्णय घेण्यात आला.दिव्यांग व्यक्तींच्या हिताच्या गोष्टींमध्ये सरकार सोबतच समाजाने देखील तितकेच जागरूक आणि सक्रिय राहिले पाहिजे, यामुळे सरकारच्या प्रगतीशील प्रयत्नांना बळकटी मिळेल, असे त्यांनी सांगितले.

‘गांधी जी की राजनीतिक यात्रा के कुछ पन्ने’ पुस्तक के बारे में जानने के लिए लिंक पर क्लिक करें :

https://matribhumisamachar.com/2025/12/10/86283/

आप इस ई-बुक को पढ़ने के लिए निम्न लिंक पर भी क्लिक कर सकते हैं:

https://www.amazon.in/dp/B0FTMKHGV6

यह भी पढ़ें : 1857 का स्वातंत्र्य समर : कारण से परिणाम तक

About Matribhumi Samachar

Check Also

एडीएद्वारे आयोजित दोन दिवसीय ‘एअरोनॉटिक्स 2047’राष्ट्रीय चर्चासत्राला बंगळुरुमध्ये प्रारंभ

एअरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी (एडीए) द्वारे आयोजित ‘एअरोनॉटिक्स 2047’या दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राला  बंगळुरूच्या सेंटर फॉर एअरबोर्न …