Thursday, December 11 2025 | 12:52:28 AM
Breaking News

भारतीय नौदलाचे ‘मुंबई’ ही विनाशिका बहुराष्ट्रीय सराव ‘ला पेरूस’मध्ये सहभागी होणार

Connect us on:

स्वदेशी बनावटीची  आणि मार्गदर्शन प्रणालीयुक्त क्षेपणास्त्र विनाशिका  ‘आयएनएस मुंबई’ बहुराष्ट्रीय सराव ला पेरूस च्या चौथ्या आवृत्तीत सहभागी होत आहे. या आवृत्तीत रॉयल ऑस्ट्रेलियन नेव्ही, फ्रेंच नेव्ही, रॉयल नेव्ही, युनायटेड स्टेट्स नेव्ही, इंडोनेशियन नेव्ही, रॉयल मलेशियन नेव्ही, रिपब्लिक ऑफ सिंगापूर नेव्ही आणि रॉयल कॅनेडियन नेव्ही यासह विविध सागरी भागीदारांचे कर्मचारी आणि भूपृष्ठभागावर कार्यरत संबंधितांचा सहभाग असेल. या सरावाचे उद्दिष्ट सागरी देखरेख, सागरी प्रतिबंधात्मक कारवाई आणि हवाई कारवाई क्षेत्रात सहकार्य वाढविणे तसेच प्रगतीशील प्रशिक्षण आणि माहितीची देवाणघेवाण करून सामान्य सागरी परिस्थिती बाबत जागरूकता विकसित करणे हे आहे. या सरावामुळे समान विचारसरणीच्या नौदलांना नियोजन, समन्वय आणि माहितीच्या देवाणघेवाणीत परस्पर संबंध विकसित करण्याची संधी मिळेल आणि त्यांच्या  सामरिक आंतरकार्यक्षमता वाढण्यास मदत होइल . या सरावात पृष्ठभागावरील युद्ध, हवाई युद्ध, हवाई संरक्षण, क्रॉस डेक लँडिंग आणि सामरिक युद्धाभ्यास, तसेच VBSS (विजिट, बोर्ड, सर्च आणि सीजर) ऑपरेशन्स /कारवाई सारख्या पोलिस-दल संबंधित मोहिमा, यासारख्या कठीण आणि प्रगत विविध विषयांच्या सरावांचा समावेश असेल.

या सरावात भारतीय नौदलाचा सहभाग समान विचारसरणीच्या नौदलांमधील उच्च पातळीचे समन्वय आणि आंतरकार्यक्षमता आणि सागरी क्षेत्रात नियम-आधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्थेसाठी त्यांची वचनबद्धता दर्शवितो. ही भेट भारताच्या ‘सागर’ (प्रदेशातील सर्वांसाठी सुरक्षा आणि विकास) या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे, ज्यामुळे सुरक्षित इंडो-पॅसिफिक प्रदेशासाठी सागरी सहकार्य वाढू शकेल.

About Matribhumi Samachar

Check Also

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय हस्तकला पुरस्कार 2023 आणि 2024 चे वितरण

नवी दिल्ली, 9 डिसेंबर 2025 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (9 डिसेंबर 2025) नवी दिल्ली …