नवी दिल्ली, 20 फेब्रुवारी 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुणाचल प्रदेश स्थापना दिनाबद्दल तेथील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.अरुणाचल प्रदेश हा समृद्ध परंपरा आणि निसर्गाशी जवळीक यासाठी ओळखला जातो,असे मोदी यांनी म्हटले आहे भावी काळातही अरुणाचल प्रदेशाची समृद्धी वाढत राहो आणि प्रगती तसेच ऐक्य असेच बहरत राहो’ असेही मोदी यांनी म्हटले आहे.
पंतप्रधानांनी एक्स या समाज माध्यमावरच्या पोस्टवर म्हटले आहे,
“अरुणाचल प्रदेशच्या नागरिकांना त्यांच्या राज्य स्थापना दिनाच्या शुभेच्छा. हा प्रदेश समृद्ध परंपरा आणि निसर्गाशी जवळीक यासाठी ओळखला जातो.अरुणाचल प्रदेशचे कष्टाळू आणि उत्साही माणसे भारताच्या विकासात मोठे योगदान देत आहेत.याशिवाय त्यांचा चैतन्यदायी आदिवासी वारसा आणि थक्क करून सोडणारी जैवविविधता या राज्याला वैशिष्ट्यपूर्ण बनवते.अरुणाचल प्रदेशची अशीच भरभराट होवो आणि प्रगती तसेच एकात्मतेच्या मार्गावरील त्याचा प्रवास भावी काळातही बहरत जावो.”
भारत : 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि) व/या भारत : 1857 से 1957 (इतिहास पर एक दृष्टि) पुस्तक अपने घर/कार्यालय पर मंगाने के लिए आप निम्न लिंक पर क्लिक कर सकते हैं
ऑडियो बुक : भारत 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि)
Matribhumi Samachar Marathi

