नवी दिल्ली, 23 जून 2025. गेल्या अकरा वर्षांत राबविण्यात आलेल्या महत्त्वाच्या सुधारणांमुळे भारताचे खाण क्षेत्र सहकारी संघराज्यवाद आणि पारदर्शक शासकीय व्यवस्थेचे दीपस्तंभ कसे बनले आहे या विषयीचा एक लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सामायिक केला आहे.
केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांच्या एक्स या समाज माध्यमावरील संदेशाला दिलेल्या प्रतिसादात पंतप्रधान म्हणाले:
“केंद्रीय मंत्री @kishanreddybjp यांनी मागील 11 वर्षात राबवण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण सुधारणांमुळे सहकारी संघराज्यवाद खाण क्षेत्राचा एक महत्त्वाचा पैलू कसा बनला आहे, केंद्र राज्य सहकार्य अधिक दृढ झाले असून एकूण प्रशासन सुधारले आहे याविषयी लिहिले आहे.”
भारत : 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि) व/या भारत : 1857 से 1957 (इतिहास पर एक दृष्टि) पुस्तक अपने घर/कार्यालय पर मंगाने के लिए आप निम्न लिंक पर क्लिक कर सकते हैं
ऑडियो बुक : भारत 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि)
Matribhumi Samachar Marathi

