नवी दिल्ली, 22 नोव्हेंबर 2025. भारत, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा या देशांनी आज ‘ऑस्ट्रेलिया-कॅनडा-भारत तंत्रज्ञान आणि नवोन्मेष (एसीआयटीआय) भागीदारी’ नामक एका नव्या त्रिपक्षीय तंत्रज्ञान आणि नवोन्मेष भागीदारी करण्याबाबत सहमती दर्शवली.
सध्या अस्तित्वात असलेल्या द्विपक्षीय उपक्रमांना पूरक ठरावे म्हणून तिन्ही देशांमध्ये असलेली महत्त्वाच्या आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानांमध्ये सहकार्याची आकांक्षा बळकट करण्यावर या देशांनी सहमती दर्शवली.
सदर उपक्रम तिन्ही देशांच्या नैसर्गिक ताकदींचा वापर करेल आणि त्यात हरित उर्जा नवोन्मेष तसेच महत्त्वपूर्ण खनिजांसह लवचिक पुरवठा साखळ्या उभारण्यावर अधिक भर दिला जाईल. याद्वारे या देशांच्या संबंधित आकांक्षा तसेच शून्य उत्सर्जनाच्या दिशेने धोरणात्मक सहयोग आणखी दृढ होईल तसेच सुरक्षित, शाश्वत आणि लवचिक भविष्यासाठी पुरवठा साखळ्यांच्या आणखी वैविध्यीकरणाला चालना मिळेल. आपल्या नागरिकांचे जीवन सुधारण्यासाठी ही भागीदारी, कृत्रिम बुद्धीमत्तेचा विकास आणि सार्वत्रिक स्वीकार यांचे देखील परीक्षण करेल.
या उपक्रमाला गती देण्यासाठी आगामी 2026 या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत अधिकाऱ्यांची भेट घालून देण्यासाठी तिन्ही देशांनी संमती दिली.
‘गांधी जी की राजनीतिक यात्रा के कुछ पन्ने’ पुस्तक के बारे में जानने के लिए लिंक पर क्लिक करें :
https://matribhumisamachar.com/2025/12/10/86283/
आप इस ई-बुक को पढ़ने के लिए निम्न लिंक पर भी क्लिक कर सकते हैं:
https://www.amazon.in/dp/B0FTMKHGV6
यह भी पढ़ें : 1857 का स्वातंत्र्य समर : कारण से परिणाम तक
Matribhumi Samachar Marathi

