वसंत पंचमीच्या पावन प्रसंगी, आकाशवाणीच्या प्रसारण भवन मधील पंडित रविशंकर म्युझिक स्टुडिओ येथे, ‘हर कंठ में भारत’ या नवीन रेडिओ कार्यक्रमाच्या प्रारंभासाठी एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ‘हर कंठ में भारत’ हा कार्यक्रम विशेषत्वाने भारतीय शास्त्रीय संगीताच्या असंख्य छटा आकाशवाणीवरून सादर करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालय आणि सार्वजनिक सेवा …
Read More »मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी 16.49 कोटी रुपये किमतीचे कोकेन केले जप्त; एका प्रवाशाला केली अटक
मुंबई, 2 फेब्रुवारी 2025. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी 1.649 किलोग्रॅम अमली पदार्थ जप्त केले असून याची अंदाजे किंमत 16.49 कोटी रुपये आहे. 27 जानेवारी 2025 च्या रात्री विशिष्ट माहिती आणि संशयाच्या आधारे अधिकाऱ्यांनी पॅरिसमार्गे साओ पावलो (ब्राझील) येथून मुंबईत आलेल्या एका प्रवाशाला अडवले. या प्रकरणी पाच दिवसांच्या कारवाई दरम्यान अधिकाऱ्यांनी प्रवाशाकडून पांढऱ्या रंगाचा चूर्णयुक्त …
Read More »संरक्षण व्यवस्थापन महाविद्यालयात भविष्याच्या दृष्टीने सज्ज लष्करी नेतृत्व या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न
सिकंदराबाद येथील संरक्षण व्यवस्थापन महाविद्यालयात 30 ते 31 जानेवारी 2025 या कालावधीत Developing Military Strategic Authentic Leaders (MISAL): Re-Imagining Concepts and Strategies अर्थात परिपूर्ण लष्करी नेतृत्वाची जडणघडण : संकल्पना आणि रणनितींची पुनर्कल्पना या विषयावर वार्षिक राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले गेले. या चर्चासत्रात आधुनिक युद्धाच्या स्वरुपाला अनुसरून उदयोन्मुख नेतृत्वाच्या आरखड्याच्या शक्यता तपासून घेण्याच्या उद्देशाने …
Read More »बीएसएनएलच्या विनाव्यत्यय संचार सेवेने प्रयागराज येथील महाकुंभ 2025 मध्ये यात्रेकरूंना आणि सुरक्षा दलांना दिला दिलासा
आत्मनिर्भर भारत उपक्रमांतर्गत, भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) महाकुंभ 2025 मध्ये संचार निगडित पायाभूत सुविधा मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे, जेणेकरून विश्वसनीय दूरसंचार सेवा सुनिश्चित करता येईल. बीएसएनएलने कुंभमेळा परिसरात एक समर्पित ग्राहक सेवा केंद्र स्थापन केले आहे, जिथे यात्रेकरू आणि भक्तगण यांना थेट मदत, तक्रार निवारण आणि अखंड दूरसंचार सेवा मिळत आहेत. …
Read More »इंडोनेशियात जकार्ता येथे श्री सनातन धर्म अलायमच्या महा कुंभाभिषेगमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले संबोधित
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इंडोनेशियातील जकार्ता येथे श्री सनातन धर्म अलायमच्या महा कुंभभिषेगमला व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केले. त्यांनी महामहिम, अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो, मुरुगन टेंपल ट्रस्टचे अध्यक्ष पा हाशिम, व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. कोबलन, तमिळनाडू आणि इंडोनेशियाचे मान्यवर, पुजारी आणि आचार्य, भारतीय वंशाचे सदस्य, या शुभ प्रसंगाचा भाग असलेले इंडोनेशिया आणि इतर देशातील नागरिक तसेच ज्या प्रतिभावान कलाकारांमुळे …
Read More »19 वर्षांखालील आयसीसी महिला टी-20 विश्वचषक 2025 जिंकणाऱ्या भारतीय संघाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 19 वर्षांखालील आयसीसी महिला टी-20 विश्वचषक 2025 जिंकणाऱ्या भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे. एक्स या समाज माध्यमावरच्या एका संदेशात पंतप्रधानांनी म्हटले आहे : “आपल्या नारी शक्तीचा मला खूप अभिमान आहे! 19 वर्षांखालील आयसीसी महिला टी-20 विश्वचषक 2025 जिंकणाऱ्या भारतीय संघाचे अभिनंदन. हा विजय आपल्या उत्कृष्ट …
Read More »केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 चा सारांश
नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी 2025 1 लाख रुपयांपर्यंतच्या सरासरी मासिक उत्पन्नावर कोणताही प्राप्तिकर नाही; मध्यमवर्गीय कुटुंबाच्या बचत आणि क्रयशक्तीमध्ये होईल वाढ नवीन कर व्यवस्थेमध्ये पगारदार वर्गाला वार्षिक 12.75 लाख रुपयांवर कोणताही प्राप्तिकर भरावा लागणार नाही केंद्रीय अर्थसंकल्पात विकासाच्या 4 इंजिनांचा उल्लेख – कृषी, एमएसएमई, गुंतवणूक आणि निर्यात ‘पंतप्रधान धन-धान्य कृषी योजना’चा …
Read More »केंद्रिय अर्थसंकल्प 2025-26 वर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रिया
आर्थिक वर्ष 2025-26 च्या केंद्रिय अर्थसंकल्पावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली. भारताच्या विकासाच्या प्रवासातला हा मैलाचा दगड असल्याचा मुद्दा अधोरेखित करुन मोदी म्हणाले की, या अर्थसंकल्पात 140 कोटी भारतीयांच्या आशाआकांक्षा प्रतिबिंबित झाल्या आहेत आणि प्रत्येक नागरिकांचे स्वप्न यामुळे पूर्ण होईल. युवकांसाठी विविध क्षेत्रांची दारं खुली झाली आहेत आणि विकसित भारत …
Read More »राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे जागतिक पुस्तक मेळा 2025 चे उद्घाटन
नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी 2025. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज नवी दिल्ली येथे ‘नवी दिल्ली जागतिक पुस्तक मेळा 2025 ‘ चे उद्घाटन केले. याप्रसंगी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की पुस्तके वाचणे हा केवळ एक छंद नाही तर तो एक परिवर्तनकारी अनुभव आहे. विविध भाषा आणि संस्कृतींमधील पुस्तके वाचल्याने प्रदेश आणि समुदायांमध्ये सेतू …
Read More »पीएम-उषा अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ येथे सांस्कृतिक विविधता आणि संवेदनशीलता या विषयावर तीन दिवसीय कार्यशाळेला सुरुवात
नागपूर, 29 जानेवारी 2025. प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान (पीएम-उषा) अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ येथे “सांस्कृतिक विविधता आणि संवेदनशीलता” या विषयावर तीन दिवसीय कार्यशाळेचे 29 जानेवारी रोजी उद्घाटन करण्यात आले. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील नॅशनल बुक ट्रस्टचे अध्यक्ष प्रा.मिलिंद सुधाकर मराठे यांनी कार्यशाळेचे उद्घाटन केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे …
Read More »
Matribhumi Samachar Marathi