Saturday, February 14 2026 | 12:21:46 AM
Breaking News

Matribhumi Samachar

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ग्रामीण भारत महोत्सव 2025 चे उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत भारत मंडपम इथे ग्रामीण भारत महोत्सव 2025 चे उद्घाटन केले. विकसित भारत 2047 च्या दृष्टीने लवचिक ग्रामीण भारताची उभारणी ही या महोत्सवाची संकल्पना आहे. या महोत्सवात भाषणाच्या प्रारंभी पंतप्रधानांनी उपस्थितांना नवीन वर्षांच्या शुभेच्छा दिल्या. वर्षाच्या सुरुवातीलाच आयोजित केलेला भव्य ग्रामीण भारत महोत्सव ही …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 5 जानेवारी रोजी दिल्ली इथे 12,200 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 5 जानेवारी रोजी दुपारी 12.15 वाजण्याच्या सुमाराला दिल्ली इथे 12,200 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत. त्याचबरोबर उद्या सकाळी 11 वाजता ते साहिबाबाद आरआरटीएस स्थानक ते न्यू अशोक नगर आरआरटीएस स्थानकापर्यंत नमो भारत रेल्वे गाडीतून प्रवास देखील करणार आहेत. यावेळी …

Read More »

‘फराळ शक्ती’ उपक्रमाच्या माध्यमातून महिला उद्योजकांचे सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने महिला उद्योजकता मंचाची मीरा भाईंदर महानगर पालिकेसोबत भागिदारी

मिरा – भाईंदर शहरातील महिला उद्योजकांच्या सक्षमीकरणासाठी मीरा – भाईंदर महानगर पालिकेने (MBMC) फराळ सखी या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची संकल्पना आखली आहे. पारंपारिक स्नॅक्स अर्थात हलक्या फुलक्या पारंपारिक खाद्य पदार्थांच्या उत्पादनात व्यवसायाशी जोडलेल्या महिला उद्योजकांना त्यांच्या उद्योग व्यवसायाचा शाश्वत पद्धतीने आणि परिणामकारित्या विस्तार करता यावा या उद्देशाने, अशा महिला उद्योजकांना सहकार्य करण्याच्या उद्देशाने …

Read More »

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2024 मध्ये महाराष्ट्राचे खेळाडू चमकले

महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आणि प्रशिक्षकांनी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2024 मध्ये सर्वोच्च सन्मान मिळवून राज्याला पुन्हा एकदा वैभव मिळवून दिले आहे. 17 जानेवारी 2025 रोजी राष्ट्रपती भवनात भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात येणारे हे पुरस्कार केवळ त्यांच्या यशाचा नव्हे, तर आव्हानांवर मात करत, देशाला प्रेरणा देण्याच्या त्यांच्या निर्धाराचाही बहुमान ठरेल. महाराष्ट्राचे असामान्य पुरस्कार विजेते: मुरलीकांत राजाराम पेटकर – अर्जुन पुरस्कार …

Read More »

वैद्यकीय वस्त्रांसाठीच्या गुणवत्ता नियंत्रण आदेशाचा (Quality Control Order – QCO) अवलंब करण्यासाठीच्या कालावधीला मुदतवाढ

भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाने वैद्यकीय वस्त्रांकरता गुणवत्ता नियंत्रण आदेश (Quality Control Order – QCO) जारी केला होता. वैद्यकीय वस्त्रे, वैद्यकीय वस्त्रोद्योग (गुणवत्ता नियंत्रण) आदेश, 2024 या शिर्षकाअंतर्गत हा आदेश जारी केला गेला होता. वैद्यकीय वस्त्रांच्या श्रेणीअंतर्गत येणाऱ्या उत्पादनांची सुरक्षा आणि कार्यक्षमता सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने मंत्रालयाने हा आदेश जारी केला होता. या आदेशाच्या माध्यमातून …

Read More »

वंदे भारत स्लीपर रेल्वेगाड्या लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना लवकरच देणार जागतिक दर्जाच्या रेल्वे प्रवासाचा अनुभव

हे नवे वर्ष भारतातील प्रवाशांना जलद आणि सुरक्षित रेल्वे प्रवासाची भेट देण्यासाठी सज्ज झाले आहे.  केंद्र सरकारने याआधीच देशभरातील रेल्वे प्रवाशांकरता, कमी आणि मध्यम पल्ल्याच्या बसण्याची आसन व्यवस्था ( chair car) असलेल्या रेल्वे गाड्यांमधून जलद, सुरक्षित आणि जागतिक दर्जाच्या प्रवासाचा अनुभव घेण्याची सुविधा यशस्वीरित्या उपलब्ध करून दिली आहे. त्यानंतर आता भारतीय रेल्वे याच प्रकारच्या …

Read More »

ईपीएफओच्या भारतभरातील सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये केंद्रीकृत पेन्शन पेमेंट प्रणाली पूर्ण क्षमतेने कार्यान्वित

निवृत्ती वेतन वितरण सेवेचा विस्तार करण्याच्या दिशेने महत्वाचे पाऊल उचलत, ईपीएफओने डिसेंबर 2024 मध्ये कर्मचारी पेन्शन योजना 1995 अंतर्गत नवीन केंद्रीकृत निवृत्ती वेतन वितरण प्रणाली (सीपीपीएस) पूर्ण क्षमतेने कार्यान्वित केली. ईपीएफओच्या सर्व 122 पेन्शन वितरण क्षेत्रीय कार्यालयांशी संबंधित 68 लाखांहून अधिक पेन्शनधारकांना डिसेंबर 2024 साठी सुमारे 1570 कोटी रुपये पेन्शन वितरित करण्यात आले. सेंट्रलाइज्ड पेन्शन पेमेंट सिस्टीमचा (सीपीपीएस) पहिला प्रायोगिक उपक्रम ऑक्टोबर, 2024 मध्ये …

Read More »

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय संचार ब्युरोच्या प्रदर्शनाला भेट

पुणे, दिनांक ३ जानेवारी २०२५ पुण्यामध्ये आर्मी दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्यूरोतर्फे नागरिकांसाठी सैन्य विषयक माहिती आणि चित्र प्रदर्शन उभे करण्यात आले आहे. या बहुमाध्यम प्रदर्शनाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील भेट दिली. यामध्ये भारतीय लष्कराशी संबंधित छायाचित्रे आणि माहिती प्रदर्शित करण्यात आली आहे. सोबतच डिजीटल मीडियाचा उपयोग करुन आकर्षक आणि मनोरंजक …

Read More »

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली आयलंड डेव्हलपमेंट एजन्सीची (आयडीए) सातवी बैठक संपन्न

केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली येथे आयलंड डेव्हलपमेंट एजन्सी (आयडीए), अर्थात बेट विकास संस्थेची सातवी बैठक पार पडली. बैठकी दरम्यान केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अंदमान-निकोबार बेटे आणि लक्षद्वीपमध्ये सुरू असलेल्या विकास प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला. गृह मंत्रालय, अंदमान आणि निकोबार बेटे प्रशासन आणि लक्षद्वीप प्रशासनाने …

Read More »

राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी)च्या प्रजासत्ताक दिन शिबिर 2025 मध्ये सहभागी होणाऱ्या 2,361 पैकी 917 इतक्या विक्रमी संख्येने मुलींचा सहभाग

राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) च्या प्रजासत्ताक दिन शिबिर 2025 मध्ये 2,361 पैकी 917 इतक्या विक्रमी संख्येने मुलींचा सहभाग असून हे प्रमाण आतापर्यंतचे सर्वाधिक आहे. महिनाभर चालणाऱ्या या शिबिरात जम्मू आणि काश्मीर आणि लडाखमधील 114 आणि ईशान्य विभागातील 178 छात्रांचा समावेश आहे असे राष्ट्रीय छात्र सेनेचे महासंचालक (डीजीएनसीसी) लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंग यांनी 3 जानेवारी 2025 रोजी, दिल्ली कँट येथील पत्रकार परिषदेत सांगितले. युवक आदानप्रदान कार्यक्रमाअंतर्गत 18 मित्र …

Read More »