Saturday, February 07 2026 | 07:16:46 PM
Breaking News

Matribhumi Samachar

सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना वाहिली आदरांजली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे. सावित्रीबाई फुले या महिला सक्षमीकरणाचा दीपस्तंभ आहेत , तसेच त्या शिक्षण आणि सामाजिक सुधारणांच्या क्षेत्राच्या आद्य प्रवर्तक आहेत अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सावित्रीबाई फुले यांचा गौरव केला आहे. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या समाज माध्यमावर लिहिलेला संदेश …

Read More »

राणी वेलू नचियार यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी केले त्यांचे स्मरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शूर राणी वेलू नचियार यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण केले आहे. अतुलनीय शौर्य आणि सामरिक तेज दाखवून त्यांनी  वसाहतवादी राजवटीविरुद्ध वीरतापूर्ण लढा दिला, असा उल्लेख मोदींनी केला. X वर एका पोस्टमध्ये मोदींनी लिहिले की: “शूर राणी वेलू नचियार यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे भावपूर्ण स्मरण! त्यांनी अतुलनीय शौर्य आणि सामरिक तेज दाखवत वसाहतवादी राजवटीविरुद्ध वीरतापूर्ण लढा दिला. येणाऱ्या पिढ्यांना त्यांनी दडपशाहीविरुद्ध उभे राहण्यासाठी आणि …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीतील अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील अनेक महत्त्वाच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यानिमित्ताने झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना संबोधितही केले. त्यांनी उपस्थितांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. 2025 हे वर्ष भारताच्या विकासासाठी अफाट संधींचे वर्ष ठरेल आणि हे वर्ष देशाला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या ध्येयपूर्तीच्या दिशेने घेऊन जाईल, असा …

Read More »

पंतप्रधान 4 जानेवारी रोजी नवी दिल्ली येथे ग्रामीण भारत महोत्सव 2025 चे करणार उद्घाटन

नवी दिल्ली – दि.  03 जानेवारी, 2025 नवी दिल्ली येथील भारत मंडपममध्‍ये उद्या – 4 जानेवारी रोजी सकाळी 10:30 वाजता  पंतप्रधान  नरेंद्र मोदी ग्रामीण भारत महोत्सव 2025 चे उद्घाटन करणार आहेत. यावेळी ते उपस्थितांना संबोधित करणार आहेत. ग्रामीण भारताची उद्योजकता आणि सांस्कृतिक वारसा साजरा करणारा, हा महोत्सव 4 ते 9 जानेवारी या कालावधीत होणार आहे. विकसित भारत 2047 साठी एक लवचिक ग्रामीण भारत निर्माण करणे  …

Read More »

हिंदू आणि सनातन संदर्भात भारतात उमटणाऱ्या धक्कादायक प्रतिक्रिया आकलना पलीकडील आणि वेदनादायक असल्याचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे प्रतिपादन

हिंदू आणि सनातन संदर्भात भारतात उमटणाऱ्या धक्कादायक प्रतिक्रिया आकलना पलीकडील आणि वेदनादायक असल्याचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटले आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील कन्व्हेन्शन सेंटर येथे आज वेदांताच्या 27 व्या आंतरराष्ट्रीय काँग्रेसच्या उद्घाटनपर भाषणात उपराष्ट्रपती धनखड म्हणाले की, “आपली संस्कृती सर्वात प्राचीन संस्कृतींपैकी एक असून, ती सर्व प्रकारे एकमेवाद्वितीय आहे. उपरोधाची आणि खेदाची गोष्ट …

Read More »

बंगळुरू येथे निम्हान्सच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याला राष्ट्रपती उपस्थित

राष्ट्रपती  द्रौपदी मुर्मू आज (3 जानेवारी, 2025) बेंगळुरू येथे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरो सायन्सेस (निम्हान्स) संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी समारंभात सहभागी झाल्या. याप्रसंगी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की, अपवादात्मक रूग्ण सेवेसह अभिनव संशोधन आणि कठोर शैक्षणिक कार्यक्रमामुळे निम्हान्स हे मानसिक आरोग्य आणि न्यूरोसायन्सच्या क्षेत्रात एक अग्रणी संस्था बनली आहे. समुदाय-आधारित मानसिक आरोग्य …

Read More »

युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने 2024 चे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार केले जाहीर

नवी दिल्‍ली, 2 जानेवारी 2025 युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने आज 2024चे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर केले. राष्ट्रपती 17 जानेवारी 2025(शुक्रवार) रोजी सकाळी 11 वाजता या पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपती भवनात आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष समारंभात करणार आहेत. समितीच्या शिफारशींवर आधारित आणि आवश्यक ती छाननी  केल्यानंतर, सरकारने खालील खेळाडू, प्रशिक्षक, विद्यापीठ आणि संस्थांना पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे. i.  मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024 क्र. खेळाडूचे नाव क्रीडा प्रकार 1. गुकेश डी बुद्धिबळ 2. हरमनप्रीत सिंग हॉकी 3.  प्रवीण कुमार पॅरा-ॲथलेटिक्स 4. मनु भाकर नेमबाजी ii. क्रीडा आणि खेळ 2024 मध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार क्र. खेळाडूचे नाव क्रीडा प्रकार 1 ज्योती येराजी ॲथलेटिक्स 2 अन्नू राणी ॲथलेटिक्स 3 नितू मुष्टियुद्ध 4 स्वीटी मुष्टियुद्ध 5  वंतिका अग्रवाल बुद्धिबळ 6 सलीमा टेटे हॉकी 7  अभिषेक हॉकी …

Read More »

जागतिक कापड आणि वस्त्र प्रावरणे क्षेत्रातील व्यापारात भारताचा वाटा 3.9%

नवी दिल्‍ली, 2 जानेवारी 2025 2023 या वर्षात भारत हा जगात सहाव्या क्रमांकाचा कापड आणि पोशाख निर्यात करणारा देश ठरला आहे. 2023-24 मध्ये भारताच्या एकूण निर्यातीमध्ये हस्तकला  आणि पोशाख (T&A) यांचासह हा वाटा 8.21% इतका लक्षणीय  आहे. कापड  आणि वस्त्र प्रावरणे  यांच्या जागतिक व्यापारात आपल्या देशाचा वाटा 3.9% आहे.भारतातून  कापड …

Read More »

जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाने 284 कोटी रुपये खर्चाच्या कृषी प्रक्रिया सुविधा प्रकल्प उभारणीसाठीचे बहाल पत्र केले जारी

मुंबई, 2 जानेवारी 2025 जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण, जेएनपीएने आयात-निर्यात आणि देशांतर्गत शेतमालावर आधारित प्रक्रिया प्रकल्पाचा विकास आणि जेएनपीए येथे साठवणूक सुविधा उभारण्यासाठी 30 डिसेंबर 2024 रोजी मेसर्स ट्रायडेंट ॲग्रोकॉम एक्सपोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड आणि मेसर्स मॅन इन्फ्राकन्स्ट्रक्शन लिमिटेड (कन्सोर्टियम) यांना बहाल पत्र (LoA) जारी केले. हा प्रकल्प बंदर संकुलात 27 …

Read More »

फेम -II योजनेअंतर्गत 16 लाख 15 हजार इलेक्ट्रीक वाहनांना प्रोत्साहन

नवी दिल्‍ली, 2 जानेवारी 2025 जनतेला रास्त दरातील व पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा पर्याय उपलब्ध करुन देण्यावर भर देण्यासाठी भारत सरकार अनेक उपक्रम राबवित आहे. इलेक्ट्रिक वाहनांना मागणी प्रोत्साहन देऊन त्यांच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी भारतात इलेक्ट्रीक वाहन (हायब्रिड) जलद स्वीकार आणि उत्पादन (फेम-इंडिया) योजना सुरू करण्यात आली. या योजनेच्या पहिल्या टप्प्याला …

Read More »