Tuesday, December 09 2025 | 03:38:34 AM
Breaking News

Business

भारताच्या औद्योगिक उत्पादन निर्देशांकाने नोव्हेंबर 2024 मध्ये नोंदवली 5.2% वृद्धी

औद्योगिक उत्पादन निर्देशांकाचा (आयआयपी) त्वरित अंदाज दर महिन्याच्या 12 तारखेला (अथवा 12 तारखेला सुट्टी असेल तर त्याआधीच्या कामाच्या दिवशी) जाहीर केला जातो, जो स्त्रोत संस्थेकडून मिळालेल्या डेटा (विदा) च्या आधारावर संकलित केला जातो. या संस्था उत्पादक कारखाने/ आस्थापनांकडून डेटा मिळवतात. आयआयपीच्या सुधारणा  धोरणानुसार पुढील निवेदनात या त्वरित अंदाजांमध्ये सुधारणा केली जाते. · ठळक मुद्दे: नोव्हेंबर 2024 महिन्यासाठीचा आयआयपी …

Read More »

भांडवली खर्चाला गती देण्यासाठी आणि विकास आणि कल्याणाशी संबंधित खर्चांना वित्तपुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारांना 1,73,030 कोटी रुपयांचे कर हस्तांतरण केले जारी

केंद्र सरकारने आज राज्य सरकारांना 1,73,030 कोटी रुपयांचे कर हस्तांतरण जारी केले. डिसेंबर 2024 मध्ये राज्य सरकारांना जारी करण्यात आलेले कर हस्तांतरण 89,086 कोटी रुपये इतके होते. भांडवली खर्चाला गती देण्यासाठी, तसेच विकास आणि कल्याणाशी संबंधित खर्चाला वित्तपुरवठा करण्यास राज्यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने या महिन्यात अधिक रक्कम हस्तांतरित केली जात आहे. जारी केलेल्या रकमेचे राज्यनिहाय तपशील पुढील …

Read More »

भविष्यासाठी स्वतःला सज्ज बनवण्याच्या दिशेने भारतीय रेल्वेची वाटचाल सुरु, प्रवाशांना सुरक्षित, जलद आणि जागतिक दर्जाचा प्रवासाचा अनुभव देण्यासाठी चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीपैकी 76% रक्कम क्षमता विकासावर केले खर्च

नवी दिल्‍ली, 8 जानेवारी 2025 कोट्यवधी भारतीयांना वाजवी दरात जलद, सुरक्षित आणि जागतिक दर्जाचा प्रवासाचा अनुभव देणे ही सोपी गोष्ट नाही. मात्र, भौगोलिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण भारताला सेवा देणारी भविष्यासाठी सज्ज असलेली संस्था म्हणून स्वत:मध्ये परिवर्तन घडवून, भारतीय रेल्वेने हे काम मिशन मोडमध्ये हाती घेतले आहे. अर्थसंकल्पीय तरतुदीशी …

Read More »

भारतीय नवीकरणीय ऊर्जा विकास संस्थेने सलग चौथ्या वर्षी सामंजस्य करार कामगिरीमध्ये मिळवले उत्कृष्ट मानांकन

भारतीय नवीकरणीय ऊर्जा विकास संस्था मर्यादित(IREDA) ने नूतन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयासोबत 2023-24 या आर्थिक वर्षाकरिता केलेल्या सामंजस्य कराराच्या कामगिरीसाठी 98.24( पूर्णांकी 98) गुणांसह सर्वोत्कृष्ट मानांकन मिळवले आहे. सलग चौथ्या वर्षी या संस्थेने सर्वोत्कृष्ट हे मानांकन मिळवून परिचालनात्मक उत्कृष्टता आणि कॉर्पोरेट शासनाच्या सर्वोच्च निकषांप्रति आपल्या अविचल वचनबद्धतेचे दर्शन घडवले आहे. …

Read More »

एनटीपीसी अर्थात राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळाचा सोलापूर येथील प्रकल्प, ऊर्जा निर्मितीसाठी कोळशामध्ये मिसळण्यासाठी बांबू बायोमास खरेदी करणार

मुंबई , 6 जानेवारी 2025 एनटीपीसी अर्थात राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळाच्या सोलापूर येथील  ऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी  कोळशामध्ये मिसळण्यासाठी बांबू बायोमास खरेदी करणार आहे. यादृष्टीने शाश्वत पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी  शेतकरी उत्पादक कंपन्यांसोबत पन्नास वर्षांसाठी प्रारंभिक करार केले जातील. पर्यावरण संवर्धनासाठी बायोमासवर आधारित ऊर्जा प्रकल्प  ही काळाची गरज आहे, असे एनटीपीसीचे अध्यक्ष …

Read More »

केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री श्री गिरीराज सिंह यांनी पश्चिम बंगाल मध्ये फुलिया, नादिया, येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हँडलूम टेक्नॉलॉजीच्या नवीन वास्तुचे (कॅम्पस) केले उद्घाटन

केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी IIHT( इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॅन्डलूम टेक्नॉलॉजी अर्थात भारतीय हातमाग तंत्रज्ञान संस्था) फुलियाच्या नवीन कायमस्वरूपी वास्तुचे (कॅम्पस) उद्घाटन केले.  संस्थेची नवीन वास्तू, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून 5.38 एकर जागेत, 75.95 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आली आहे. ही इमारत, उत्तम दर्जाचे वर्ग (स्मार्ट क्लासेस), डिजिटल ग्रंथालय आणि आधुनिक सुसज्ज चाचणी प्रयोगशाळा, अशा आधुनिक पायाभूत सुविधांनी …

Read More »

भारतीय स्टार्टअप्सची वाढ आणि जागतिक पातळीवर त्यांच्या विस्ताराला गती देण्यासाठी DPIIT ची स्ट्राईड व्हेंचरशी भागीदारी

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या उद्योग आणि देशांतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने (DPIIT) भारतीय स्टार्टअप्सच्या वाढीला अधिक गती देण्यासाठी आणि जागतिक स्तरावर त्यांचा अधिक ठसा उमटावा, यासाठी स्ट्राइड व्हेंचर्स या उद्यम कर्ज क्षेत्रातील आघाडीच्या फर्मसोबत भागीदारी केली आहे. आर्थिक सहाय्याला धोरणात्मक मार्गदर्शन आणि बाजारपेठ उपलब्धतेची जोड देऊन स्टार्ट-अप्सना मोठ्या संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने हे …

Read More »

‘फराळ शक्ती’ उपक्रमाच्या माध्यमातून महिला उद्योजकांचे सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने महिला उद्योजकता मंचाची मीरा भाईंदर महानगर पालिकेसोबत भागिदारी

मिरा – भाईंदर शहरातील महिला उद्योजकांच्या सक्षमीकरणासाठी मीरा – भाईंदर महानगर पालिकेने (MBMC) फराळ सखी या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची संकल्पना आखली आहे. पारंपारिक स्नॅक्स अर्थात हलक्या फुलक्या पारंपारिक खाद्य पदार्थांच्या उत्पादनात व्यवसायाशी जोडलेल्या महिला उद्योजकांना त्यांच्या उद्योग व्यवसायाचा शाश्वत पद्धतीने आणि परिणामकारित्या विस्तार करता यावा या उद्देशाने, अशा महिला उद्योजकांना सहकार्य करण्याच्या उद्देशाने …

Read More »

वैद्यकीय वस्त्रांसाठीच्या गुणवत्ता नियंत्रण आदेशाचा (Quality Control Order – QCO) अवलंब करण्यासाठीच्या कालावधीला मुदतवाढ

भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाने वैद्यकीय वस्त्रांकरता गुणवत्ता नियंत्रण आदेश (Quality Control Order – QCO) जारी केला होता. वैद्यकीय वस्त्रे, वैद्यकीय वस्त्रोद्योग (गुणवत्ता नियंत्रण) आदेश, 2024 या शिर्षकाअंतर्गत हा आदेश जारी केला गेला होता. वैद्यकीय वस्त्रांच्या श्रेणीअंतर्गत येणाऱ्या उत्पादनांची सुरक्षा आणि कार्यक्षमता सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने मंत्रालयाने हा आदेश जारी केला होता. या आदेशाच्या माध्यमातून …

Read More »

ईपीएफओच्या भारतभरातील सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये केंद्रीकृत पेन्शन पेमेंट प्रणाली पूर्ण क्षमतेने कार्यान्वित

निवृत्ती वेतन वितरण सेवेचा विस्तार करण्याच्या दिशेने महत्वाचे पाऊल उचलत, ईपीएफओने डिसेंबर 2024 मध्ये कर्मचारी पेन्शन योजना 1995 अंतर्गत नवीन केंद्रीकृत निवृत्ती वेतन वितरण प्रणाली (सीपीपीएस) पूर्ण क्षमतेने कार्यान्वित केली. ईपीएफओच्या सर्व 122 पेन्शन वितरण क्षेत्रीय कार्यालयांशी संबंधित 68 लाखांहून अधिक पेन्शनधारकांना डिसेंबर 2024 साठी सुमारे 1570 कोटी रुपये पेन्शन वितरित करण्यात आले. सेंट्रलाइज्ड पेन्शन पेमेंट सिस्टीमचा (सीपीपीएस) पहिला प्रायोगिक उपक्रम ऑक्टोबर, 2024 मध्ये …

Read More »