नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फ्रान्सचे अध्यक्ष एम्मान्युएल मॅक्राँ यांच्यासह पॅरिसमध्ये एआय कृती शिखर परिषदेचे सहअध्यक्षपद भूषवले. एक आठवडाभर चालणाऱ्या या शिखर परिषदेची 6-7 फेब्रुवारी या विज्ञान दिनी सुरुवात झाली. त्यानंतर 8-9 फेब्रुवारीला सांस्कृतिक सप्ताहांचे आयोजन झाले. जागतिक नेते, धोरणकर्ते आणि उद्योग धुरीण यांच्या उपस्थितीत एका …
Read More »व्यापार आणि आर्थिक भागीदारी करार (टी ए पी ए ) अंतर्गत व्यापार आणि गुंतवणुकीला चालना देण्यासाठी भारत, युरोपियन मुक्त व्यापार संघटना (ई एफ टी ए ) मंचाचे उदघाटन करणार
युरोपियन मुक्त व्यापार संघटनेसोबतचे द्विपक्षीय संबंध द्विगुणित करण्याच्या उद्देशाने केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल नवी दिल्लीत भारत मंडपम येथे 10, फेब्रुवारी 2025 रोजी भारत युरोपियन मुक्त व्यापार संघटना (ई एफ टी ए ) मंचाचे उदघाटन करणार आहेत. यावेळी भारत युरोपियन मुक्त व्यापार संघटनेच्या प्रतिनिधी, स्विस राज्य सचिव हेलेन बडलिगर आर्टिडा, नॉर्वेचे व्यापार आणि उद्योग राज्य …
Read More »फ्रान्स आणि अमेरिका दौऱ्याला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निवेदन
नवी दिल्ली, 10 फेब्रुवारी 2025. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी दिलेल्या निमंत्रणाला प्रतिसाद म्हणून मी 10 ते 12 फेब्रुवारी या दरम्यान फ्रान्सला भेट देणार आहे. पॅरिसमध्ये पोहोचल्यावर, मी तिथे होणार असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ताविषयक कृती शिखर परिषदेचे सहअध्यक्षपद भूषविण्यासाठी उत्सुक आहे. या शिखर परिषदेत जगभरातील नेते आणि तंत्रज्ञान क्षेत्रातले जगभरातले अनेक मुख्य कार्यकारी …
Read More »भारत-ब्रिटन सहकार्य मजबूत करणे हे हरित हायड्रोजनवरील कार्यशाळेचे उद्दिष्ट
नवी दिल्ली, 6 फेब्रुवारी 2025. हरित हायड्रोजन उत्पादन आणि नियमनाच्या माध्यमातून हायड्रोजन मानकीकरणावरील भारत-ब्रिटन सहकार्य मजबूत करण्याच्या उद्देशाने, भारतीय मानक ब्युरोने, बीएसआय (ब्रिटिश मानक संस्था) आणि ब्रिटन सरकारचे परराष्ट्र, राष्ट्रकुल आणि विकास कार्यालय (एफसीडीओ) यांच्या सहकार्याने नवी दिल्ली येथे हरित हायड्रोजनवर दोन दिवसीय भारत-ब्रिटन मानक भागीदारी कार्यशाळेचे आयोजन केले होते. …
Read More »नवी दिल्लीतील यशोभूमी येथे 20-21 फेब्रुवारी दरम्यान केले जाणार दिल्ली इंटरनॅशनल लेदर एक्स्पो (डायलेक्स) 2025 चे आयोजन
नवी दिल्ली, 6 फेब्रुवारी 2025. कॉन्सिल फॉर लेदर एक्स्पोर्ट्स (सीएलई) 20-21 फेब्रुवारी या दिवशी नवी दिल्लीतील आयसीसी द्वारका भागातील यशोभूमी येथे दिल्ली इंटरनॅशनल लेदर एक्स्पो (डायलेक्स) 2025 आयोजित करणार आहे. डायलेक्स हा एक प्रमुख बी2बी कार्यक्रम व्यवहार्य स्रोत पर्याय शोधणाऱ्या आंतरराष्ट्रीय खरेदीदारांसमोर उत्पादक आणि निर्यातदारांना त्यांचे नवीनतम संग्रह, नवोन्मेष आणि क्षमता …
Read More »अल्जेरियाच्या पीपल्स नॅशनल आर्मीचे चीफ ऑफ स्टाफ आणि राष्ट्रीय संरक्षण मंत्री यांचे प्रतिनिधी जनरल सय्यद चनेग्रीहा भारताच्या भेटीवर येणार
नवी दिल्ली, 5 फेब्रुवारी 2025. अल्जेरियाच्या पीपल्स नॅशनल आर्मीचे चीफ ऑफ स्टाफ आणि त्यांच्या राष्ट्रीय संरक्षण मंत्री याचे एक प्रतिनिधी म्हणून 06 ते 12 फेब्रुवारी 2025 दरम्यान भारताला भेट देणार आहे. ते बेंगळुरू इथे होणाऱ्या एअरो इंडिया 2025 च्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार असून, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी संवादही साधणार आहेत. …
Read More »भारत- चीन सीमा आणि गस्त पुन्हा सुरू करणे, यासंदर्भात संरक्षण मंत्र्यांचे निवेदन
नवी दिल्ली, 4 फेब्रुवारी 2025. भारत- चीन सीमेवरच्या परिस्थितीबद्दल लष्करप्रमुखांनी केलेल्या निवेदनावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संसदेत केलेल्या वक्तव्याबद्दल 4 फेब्रुवारी 2025 रोजी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ट्वीट केले आहे. लष्करप्रमुखांची निरीक्षणे, सीमेवर दोन्ही देशांद्वारे घातल्या जाणाऱ्या पारंपरिक गस्तीमध्ये आलेल्या तात्पुरत्या अडथळ्यांविषयी होती, असे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. अलीकडेच …
Read More »बेल्जियमच्या पंतप्रधानपदाचा कार्यभार बर्ट डी वेव्हर यांनी स्वीकारल्या बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे
महामहीम बर्ट डी वेव्हर यांनी बेल्जियमच्या पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारल्या बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांचे अभिनंदन केले. भारत आणि बेल्जियम मधील संबंध अधिक दृढ करण्यासाठी आणि जागतिक स्तरावरील मुद्द्यांवर सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी एकत्र काम करण्याचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केला. पंतप्रधानांनी एक्स समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये लिहिले आहे : …
Read More »इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स (आयबीसीए) अधिकृतपणे एक पूर्ण विकसित करार-आधारित आंतर-सरकारी आंतरराष्ट्रीय संघटना म्हणून आली अस्तित्वात
नवी दिल्ली, 3 फेब्रुवारी 2025. एक महत्त्वपूर्ण घडामोडीत, इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स (आयबीसीए- आंतरराष्ट्रीय मार्जारकुळ आघाडी) च्या स्थापनेवरील करार आराखडा अधिकृतपणे अंमलात आला आहे. दिनांक 23 जानेवारी 2025 पासून, इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स आणि त्याचे सचिवालय एक पूर्ण विकसित करार-आधारित आंतर-सरकारी आंतरराष्ट्रीय संघटना आणि आंतरराष्ट्रीय कायदेशीर संघटना म्हणून अस्तित्वात आली आहे. …
Read More »भारत आणि रशिया यांच्यातील मजबूत आणि काळाच्या कसोटीवर खरी उतरलेली मैत्री हे जगासाठी सहकार्य आणि मुत्सद्देगिरीचे अनुकरणीय असे झळाळते उदाहरण आहे : लोकसभा अध्यक्ष
नवी दिल्ली, 3 फेब्रुवारी 2025. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज सांगितले की, भारत आणि रशिया यांच्यातील मजबूत आणि काळाच्या कसोटीवर खरी उतरलेली मैत्री हे जगासाठी सहकार्य आणि मुत्सद्देगिरीचे अनुकरणीय असे एक झळाळते उदाहरण आहे. दोन्ही देशांमधील ऐतिहासिक आणि खोलवर रुजलेली मैत्री अधोरेखित करत त्यांनी नमूद केले की, जागतिक स्तरावर भारत-रशिया …
Read More »
Matribhumi Samachar Marathi