राष्ट्रपती निलयम, बोलारम, सिकंदराबाद येथे 29 डिसेंबर 2024 पासून 15 दिवसांचा पुष्प आणि फलोत्पादन महोत्सव ‘उद्यान उत्सव’ आयोजित करणार आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲग्रिकल्चरल मॅनेजमेंट (मॅनेज) हैदराबाद आणि भारतीय कृषी संशोधन परिषद, यांच्या सहकार्याने हा उद्यान उत्सव आयोजित केला जाणार आहे. लोकांच्या सहभागातून निसर्गोत्सव साजरा …
Read More »पदव्युत्तर स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी 4 आठवड्यांच्या हिवाळी कार्यानुभव कार्यक्रम -2024चे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षा विजया भारती सयानी यांनी केले उद्घाटन
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC), भारतातील पदव्युत्तर-स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी 4 आठवड्यांचा वैयक्तिक हिवाळी कार्यानुभव कार्यक्रम -2024 सुरू केला आहे. देशातील विविध विद्यापीठे आणि महाविद्यालयांतील विविध शैक्षणिक विषयांतील 80 विद्यार्थी यात सहभागी होत आहेत. 1,000 हून अधिक अर्जदारांमधून त्यांची निवड करण्यात आली. या उपक्रमाचे उदघाटन करताना,राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या(NHRC),अध्यक्ष ,विजया भारती सयानी यांनी सर्व …
Read More »केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील महिला तुकडी
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील महिलांच्या तुकडीची ठळक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत: (i) वरिष्ठ महिला कमांडंटच्या नेतृत्वाखालील विविध श्रेणीपैकी महिला राखीव तुकडीची क्षमता 1,025 आहे. (ii) विमानतळ, दिल्ली मेट्रो, सरकारी इमारतींची सुरक्षा, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम इत्यादींवरील सुरक्षा कर्तव्यांसाठी जिथे महिलांची आवश्यकता असते अशा ठिकाणी महिला राखीव तुकडी कार्यरत राहू शकेल. (iii) दलातील …
Read More »आयुष्मान भारत डिजिटल मिशनबाबत ताजी माहिती
आयुष्मान भारत डिजिटल मिशन हे प्रत्येक नागरिकाचे इलेक्ट्रॉनिक आरोग्य नोंदी तयार करण्यासाठी आरोग्य व्यवस्थेत आरोग्य डेटाचे आंतरपरिचालन सक्षम करणारा ऑनलाइन मंच तयार करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आले आहे. देशाच्या एकात्मिक डिजिटल आरोग्य पायाभूत सुविधांना बळ देण्यासाठी आवश्यक व्यवस्था विकसित करणे हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे. आयुष्मान भारत डिजिटल मिशनमध्ये प्रमुख …
Read More »संरक्षण क्षेत्रातील नव्या सार्वजनिक उपक्रमांच्या(डीपीएसयूज)भूमिका आणि कार्ये याविषयी संरक्षण मंत्रालयाच्या सल्लागार समितीच्या बैठकीचे संरक्षणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आज 17 डिसेंबर 2024 रोजी नवी दिल्लीत संरक्षण मंत्रालयाच्या सल्लागार समितीची बैठक झाली. या बैठकीत पूर्वाश्रमीच्या आयुध निर्माण मंडळाच्या कॉर्पोरेटायजेशननंतर स्थापन झालेल्या नव्या डीपीएसयूच्या भूमिका आणि कार्ये यावर चर्चा झाली. यावेळी या समितीच्या सदस्यांना आर्थिक आकडेवारी, आधुनिकीकरण, भांडवली खर्च, निर्यात, नव्याने विकसित उत्पादने आणि सध्या …
Read More »श्रीमती तुलसी गौडा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक
कर्नाटकातील आदरणीय पर्यावरणवादी आणि पद्म पुरस्कार प्राप्त श्रीमती तुलसी गौडा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज दुःख व्यक्त केले. आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधानांनी लिहिले आहे: “कर्नाटकातील आदरणीय पर्यावरणवादी आणि पद्म पुरस्कारप्राप्त श्रीमती तुलसी गौडा जी,यांच्या निधनाने तीव्र दुःख झाले आहे.आपले संपूर्ण जीवन त्यांनी,हजारो रोपे लावून निसर्गाचे संगोपन करत आपल्या …
Read More »सर्वात मोठे पर्यटन केंद्र म्हणून भारताचे रूपांतर
युएनडब्ल्युटीओ बॅरोमीटर (मे 2024) अर्थात संयुक्त राष्ट्र जागतिक पर्यटन संस्थेनुसार, 2023* या वर्षात आंतरराष्ट्रीय पर्यटक आगमन आकडेवारी नुसार भारत जागतिक स्तरावर 24 व्या क्रमांकावर होता. या कालावधीत, भारतात 18.89 दशलक्ष आंतरराष्ट्रीय पर्यटकांचे आगमन नोंदवले गेले, जे 2022 मधील 14.33 दशलक्षच्या तुलनेत 31.9% ची लक्षणीय वाढ दर्शविते. *काही देशांमधील डेटा गहाळ …
Read More »गती शक्ती पोर्टलचे ई-श्रम पोर्टलबरोबर एकत्रीकरण
सत्यापित आणि आधारशी संलग्न असा असंघटित कामगारांचा सर्वसमावेशक राष्ट्रीय डेटाबेस तयार करण्यासाठी श्रम आणि रोजगार मंत्रालयाने 26 ऑगस्ट 2021 रोजी देशभरात ई-श्रम पोर्टल (eshram.gov.in) सुरु केले. ई-श्रम पोर्टल हे असंघटित कामगारांना युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) आणि ई-श्रम कार्ड देऊन त्यांची नोंदणी आणि त्यांना मदत करण्यासाठी आहे. गति शक्ती राष्ट्रीय बृहत …
Read More »गेल्या 10 वर्षात देशभरात कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या 97 रुग्णालयांना मान्यता
कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ईएसआयसी) देशभरातील 165 ईएसआय रुग्णालये आणि 1,590 दवाखान्यांद्वारे विमाधारक व्यक्तींना आणि त्यांच्या कुटुंबीयांना वैद्यकीय सेवा, उपचार, औषधे आणि ड्रेसिंग, तज्ञ डॉक्टरांचा सल्ला आणि रुग्णालयात दाखल करणे इत्यादी स्वरूपात सर्वसमावेशक वैद्यकीय सेवा पुरवते. ईएसआयसी देशभरात नवीन ईएसआय रुग्णालये आणि दवाखाने स्थापन करत आहे. ईएसआयसीने गेल्या 10 वर्षात …
Read More »राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह देशाने 1971 च्या युद्धातील शहीद वीरांना विजय दिवसानिमित्त वाहिली आदरांजली; या वीरांचे बलिदान देशासाठी प्रेरणा आणि राष्ट्रीय अभिमानाचा स्रोत: राष्ट्रपती
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह देशवासीयांनी आज विजय दिवसानिमित्त, 1971 च्या युद्धातील शूर सैनिकांना आदरांजली वाहिली. 16 डिसेंबर रोजी पाकिस्तानवर भारताच्या ऐतिहासिक विजयाच्या स्मरणार्थ दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. X या समाज माध्यमावरील एका संदेशात, राष्ट्रपतींनी लिहिले की : “कृतज्ञ राष्ट्र त्या शूरवीरांच्या बलिदानाचे कायम स्मरण करत राहील. या सैनिकांच्या …
Read More »
Matribhumi Samachar Marathi