Friday, January 30 2026 | 09:37:00 PM
Breaking News

Regional

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आपल्या छत्तीसगड दौऱ्याच्या पहिल्या दिवशी, रायपूरमध्ये छत्तीसगड पोलिसांना ‘राष्ट्रपती ध्वज’ केला प्रदान

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज आपल्या छत्तीसगड राज्याच्या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी रायपूर येथे छत्तीसगड पोलिसांना प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रपती ध्वज’ प्रदान केला. छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साय  आणि उपमुख्यमंत्री  विजय शर्मा यांच्यासह अनेक प्रमुख मान्यवरांनी या सोहळ्याला हजेरी लावली. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आपल्या भाषणात ‘राष्ट्रपती …

Read More »

भारतीय मानक ब्युरोने सिंधुदुर्ग येथे जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांसाठी जागरूकता कार्यक्रमाचे केले आयोजन

भारतीय मानक ब्युरोच्या मुंबई शाखा कार्यालयाने 12 डिसेंबर 2024 रोजी सिंधुदुर्ग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांसाठी सर्वसमावेशक जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी अनिल पाटील (आयएएस) होते. पाटील यांनी  शासन आणि लोककल्याणातील भारतीय मानकांची महत्त्वाची भूमिका अधोरेखित करून वस्तू खरेदी करताना आयएसआय चिन्ह असलेल्या  उत्पादनांचा वापर  करण्याच्या महत्त्वावर भर दिला. भारतीय मानक …

Read More »

एफसीआय महाराष्ट्रने खुला बाजार विक्री योजना (देशांतर्गत) अंतर्गत गहू आणि तांदूळ विक्रीची केली घोषणा – 18 डिसेंबर 2024 रोजी लिलाव

भारतीय अन्न महामंडळ (एफसीआय ), प्रादेशिक कार्यालय महाराष्ट्र ने  खुली बाजार विक्री योजना (देशांतर्गत [ओएमएसएस (डी)] अंतर्गत ऑगस्ट 2024 च्या  पहिल्या आठवड्यापासून तांदूळ आणि डिसेंबर 2024 च्या पहिल्या आठवड्यापासून गहू विक्रीची घोषणा केली आहे.  इच्छुक खरेदीदार गहू आणि तांदूळ साठा खरेदी करण्यासाठी भारतीय अन्न महामंडळाच्या ई-लिलाव सेवा प्रदाता, “m-Junction Services Limited”(https://www.valuejunction.in/fci/)  या पॅनेलमध्ये स्वतः ला समाविष्ट …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुमारे 5500 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुमारे 5500 कोटी रुपयांच्या विविध  विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण केले.  उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधान संगमाची  पवित्र भूमी असलेल्या प्रयागराजसमोर भक्तीभावाने नतमस्तक झाले आणि महाकुंभसाठी उपस्थित असलेल्या संत आणि साधूंना अभिवादन केले.  मोदी यांनी कर्मचारी, श्रमिक आणि सफाई कर्मचाऱ्यांप्रति कृतज्ञता व्यक्त …

Read More »

‘महापेक्स 2025′ येथे टपाल तिकिटांचा उत्सव साजरा करा: सहभागासाठी प्रवेशिका पाठवण्याची अंतिम मुदत 16 डिसेंबरपर्यंत वाढवली !

महाराष्ट्र पोस्टल सर्कलने महापेक्स 2025 या राज्यस्तरीय फिलाटेलिक प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी प्रवेशिका पाठवण्याची मुदत 16 डिसेंबर 2024 पर्यंत वाढवली आहे. हे प्रदर्शन 22 ते 25 जानेवारी 2025 या कालावधीत वर्ल्ड ट्रेड सेंटर, मुंबई येथे होणार आहे. महापेक्स 2025 प्रदर्शन आणि आकर्षक उपक्रमांच्या माध्यमातून टपाल तिकिटांच्या संग्रहाला प्रोत्साहन देईल आणि भारताचा …

Read More »

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रधानमंत्री  नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान कार्यालयाच्या एक्स समाजमाध्यमावरील पोस्ट पुढीलप्रमाणे: “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री @Dev_Fadnavis , यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली. @CMOMaharashtra”   भारत : 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि) व/या भारत : 1857 से 1957 (इतिहास पर एक दृष्टि) पुस्तक …

Read More »

पंतप्रधान 13 डिसेंबर रोजी उत्तर प्रदेश दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 डिसेंबरला उत्तर प्रदेशला भेट देणार आहेत. प्रयागराज येथे ते  दुपारी 12.15 च्या सुमाराला  संगमावर दर्शन घेतील आणि पूजा करतील. त्यानंतर दुपारी 12:40 च्या सुमारास पंतप्रधान अक्षय वटवृक्षाची पूजा करतील आणि त्यानंतर हनुमान मंदिर आणि सरस्वती कूप येथे दर्शन आणि पूजा करतील. दुपारी दीडच्या सुमारास ते महाकुंभ …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुब्रमण्यम भारती यांना वाहिली आदरांजली

कवी आणि लेखक सुब्रमण्यम भारती यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  आदरांजली वाहिली. सुब्रमण्यम भारती यांच्या जयंतीनिमित्त आज दुपारी १ वाजता ७, लोककल्याण मार्गावर आयोजित एका कार्यक्रमात त्यांच्या कार्याचा संग्रह प्रकाशित करण्याची घोषणाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या समाज माध्यमावर लिहिलेला संदेश …

Read More »