Saturday, December 06 2025 | 09:30:24 AM
Breaking News

भारताची पहिली सर्वात मोठी स्वदेशी सर्वेक्षण नौका (एसव्हीएल) आयएनएस संधायक’ने मलेशियातील क्लांग बंदराला दिली भेट

भारतात रचना आणि निर्मिती केलेली भारतीय नौदलाची सर्वेक्षण नौका (एसव्हीएल) आयएनएस संधायक’ने 16 ते 19 जुलै 2025 दरम्यान हायड्रोग्राफिक सहकार्यासाठी मलेशियातील पोर्ट क्लांग येथे भेट देऊन आपला पहिला बंदर दौरा केला. या भेटीतून भारतीय नौदल हायड्रोग्राफिक विभाग (आयएनएचडी) आणि राष्ट्रीय हायड्रोग्राफिक कार्यालय प्रारुपांतर्गत प्रादेशिक हायड्रोग्राफिक क्षमता उभारणीतील भारताची व्यापक भूमिका …

Read More »

रोममध्ये झालेल्या 88 व्या कोडेक्स कार्यकारी समितीच्या बैठकीत भरड धान्यांच्या बाबतीत असलेल्या भारतीय मानकांची केली प्रशंसा

भारताच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेल्या संपूर्ण भरड धान्यांच्या समूह मानकाला कोडेक्स अ‍ॅलिमेंटेरियस आयोगाच्या (सीएसी47) गेल्या वर्षीच्या अधिवेशनात मान्यता मिळाल्यानंतर, नुकतेच इटलीमध्ये रोम येथील अन्न आणि कृषी संघटनेच्या मुख्यालयात 14  ते 18  जुलै 2025 दरम्यान झालेल्या 88 व्या कोडेक्स कार्यकारी समितीच्या (सी सी ई एक्स ई सी 88) अधिवेशनात भारताच्या नेतृत्वाचे कौतुक …

Read More »

खासदार निधीचा वापर करताना शिक्षण व आरोग्याला प्राधान्य – श्रीपाद नाईक

पणजी, गोवा दि. 19.07.2025 खासदार निधीचा नियोजित पद्धतीने विनोयोग करताना आम्ही नेहमी शिक्षण व आरोग्याला प्राधान्य देत आलो आहोत. विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे सुलभ व्हावे यासाठी शाळांना विविध सुविधा प्राप्त करून दिल्या जात आहेत, स्कूल बसेस पुरवल्या जात आहेत, असे केंद्रीय  ऊर्जा आणि नवीन व नवीनीकरण ऊर्जा  राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले. पणजी येथील …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील मोतिहारी येथे 7,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन केले

नवी दिल्ली, 18 जुलै 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमधील मोतिहारी येथे 7,000 कोटी रुपयांहून अधिक  खर्चाच्या  विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि राष्ट्रार्पण केले. पवित्र श्रावण महिन्यात बाबा सोमेश्वरनाथांच्या चरणी नमस्कार करत पंतप्रधानांनी आशीर्वाद मागितले आणि बिहारमधील सर्व नागरिकांच्या जीवनात आनंद आणि समृद्धी नांदो, अशी सदिच्छा व्यक्त केली. सभेला संबोधित …

Read More »

56 व्या इफ्फीच्या सुकाणू समितीची पहिली बैठक मुंबईत संपन्न

मुंबई , 18 जुलै, 2025. गोव्यातील 56 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी  सुकाणू समितीच्या पहिल्या बैठकीचे आज मुंबईतील राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या (एनएफडीसी) मुख्यालयात आयोजन करण्यात आले. माहिती आणि प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या बैठकीचे अध्यक्षपद भूषवले. यावेळी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू, महोत्सवाचे संचालक शेखर कपूर, एनएफडीसीचे व्यवस्थापकीय …

Read More »

मुंबईतल्या एनएफडीसी संकुलात आयआयसीटीच्या पहिल्या कॅम्पसचे उद्घाटन

मुंबई , 18 जुलै, 2025. मुंबईतल्या एनएफडीसी संकुलात आज सकाळी झालेल्या कार्यक्रमात ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी’ (आयआयसीटी) च्या पहिल्या कॅम्पसचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण, रेल्वे, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते झाले. प्रशासकीय इमारत आणि वर्ग दोन्हींचे उदघाटन यावेळी झाले. त्यानंतर, …

Read More »

परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने जागतिक बाजारात संधी मिळवून देण्याच्या साधनांसह भारतीय निर्यातदारांना सक्षम करण्यासाठी आयआयजीएफ आणि टॉय बिझ इंटरनॅशनल एक्स्पोमध्ये ट्रेड कनेक्ट ई-व्यासपीठाचे प्रात्यक्षिक केले सादर

नवी दिल्ली, 17 जुलै 2025. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अधिपत्याखालील परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने (डीजीएफटी) ट्रेड कनेक्ट व्यासपीठाबाबत जनजागृती आणि सहभाग वाढवण्यासाठी जुलै महिन्यात 71वा भारत आंतरराष्ट्रीय परिधान मेळा आणि 16 वा टॉय बिझ इंटरनॅशनल बी टू बी एक्स्पो 2025 या दोन प्रमुख व्यवसाय ते व्यवसाय (बीटूबी) प्रदर्शनांमध्ये भाग घेतला. केंद्रीय वस्त्रोद्योग …

Read More »

पंतप्रधानांचा 18 जुलै रोजी बिहार आणि पश्चिम बंगाल राज्यांचा दौरा

नवी दिल्ली, 17 जुलै 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 जुलै रोजी बिहार आणि पश्चिम बंगाल राज्यांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. बिहारमधील मोतीहारी इथे सकाळी सुमारे 11.30 वाजता राज्यातल्या 7,200 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे भूमीपूजन, उद्घाटन आणि लोकार्पण त्यांच्या हस्ते केले जाणार आहे. या कार्यक्रमात त्यांचे भाषणही होणार आहे. त्यानंतर …

Read More »

राष्ट्रपतींच्या हस्ते स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 च्या विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण

नवी दिल्ली, 17 जुलै 2025. निकालांची घोषणा झाली! केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार (एमओएचयुए) मंत्रालयाने नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात आयोजित केलेल्या कार्यक्रमात, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 च्या विजेत्यांना पारितोषिके प्रदान केली. केंद्रीय मंत्री मनोहर लाल आणि गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार राज्यमंत्री तोखन साहू यांच्या उपस्थितीत झालेल्या या …

Read More »

दत्तक विषयक केंद्रीय प्राधिकरणाने दत्तक प्रक्रियेच्या सर्व टप्प्यांवरील समुपदेशन सेवा बळकट करण्याचे राज्यांना दिले निर्देश

वी दिल्ली, 17 जुलै 2025. केंद्र सरकारच्या महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या अखत्यारितील केंद्रिय दत्तक प्रक्रिया  संसाधन  प्राधिकरणाने (कारा) सर्व राज्य दत्तक प्रक्रिया  संसाधन  संस्थांसाठी  व्यापक  आदेश जारी केले आहेत. दत्तक प्रक्रियेतील दत्तकपूर्व, दत्तक प्रक्रियेदरम्यानच्या आणि दत्तक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच्या अशा सर्व टप्प्यांवरील संरचित समुपदेशन सेवांचे बळकटीकरण व नियमितीकरण करण्याबाबतचे हे आदेश …

Read More »