Wednesday, December 24 2025 | 04:31:18 AM
Breaking News

‘निस्तार ‘ हे पहिले स्वदेशी पाण्याखाली मदतकार्य करणारे जहाज भारतीय नौदलाकडे सुपूर्द

नवी दिल्ली, 9 जुलै 2025 ‘निस्तार’ हे स्वदेशी रचना आणि निर्मिती असणारे पाण्याखाली  उतरून मदतकार्य करणारे पहिलेच  जहाज हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडने 8 जुलै 2025 रोजी विशाखापट्टणम येथे भारतीय नौदलाकडे सुपूर्द केले. या युद्धनौकेची रचना आणि बांधणी भारतीय नौवहन नोंदणीच्या(IRS) वर्गीकरण नियमांनुसार करण्यात आली आहे. हे जहाज अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण बनावटीचे असून …

Read More »

केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्मार्ट नदी व्यवस्थापनावर चर्चा करण्यासाठी उच्चस्तरीय आढावा बैठकीचे आयोजन

नवी दिल्ली, 9 जुलै 2025. नमामी  गंगे कार्यक्रमांतर्गत देशभरातील नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी तंत्रज्ञान आणि नवोन्मेशाचा वापर करण्याबाबत चर्चा करण्यासाठी आज नवी दिल्ली येथे महत्वाची उच्चस्तरीय आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत, नद्यांच्या सर्वसाधारण, तर लहान नद्यांच्या विशेष व्यवस्थापनातील तंत्रज्ञान आणि नवोन्मेशाचे भवितव्य या …

Read More »

VAMNICOM च्या माध्यमातून एडीटी बारामती येथे सहकारी शिक्षणावर युवा जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन

पुणे/बारामती, 8 जुलै 2025. सहकार मंत्रालयाच्या स्थापना दिनानिमित्त देशभरात साजऱ्या होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये पुण्यातील वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्था (VAMNICOM) तर्फे Agricultural Development Trust (ADT), बारामती यांच्या सहकार्याने एक दिवसीय युवा सहकारी जागरूकता कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रम डॉ. शरदचंद्र पवार कृषी व संलग्न  महाविद्यालयाच्या मंथन सभागृहात संपन्न झाला.     या कार्यक्रमाचा उद्देश महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सहकारी चळवळीचे महत्त्व …

Read More »

आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघ 10 जुलै रोजी सारनाथ येथे आषाढ पौर्णिमा – धम्मचक्र प्रवर्तन दिवस साजरा करणार

नवी दिल्‍ली, 8 जुलै 2025. सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत, आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघ (आय बी सी) आणि महाबोधी सोसायटी ऑफ इंडिया यांनी, गुरुवारी, 10 जुलै 2025 रोजी आषाढ पौर्णिमा – धम्मचक्र प्रवर्तन दिवस साजरा करण्यासाठी सारनाथ येथील मूलगंध कुटी विहार येथे एका पवित्र  आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. आषाढ पौर्णिमेच्या दिवशी भगवान बुद्धांनी …

Read More »

करदात्यांचा सहभाग वाढवण्यासाठी सीजीएसटी ठाणे द्वारे जनसंपर्क कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई, 8 जुलै 2025. करदात्यांचा सहभाग वाढवण्यासाठी आणि उद्योगांबरोबरचे संबंध मजबूत करण्यासाठी, सीजीएसटी आणि केंद्रीय उत्पादन शुल्क ठाणे आयुक्तालयाने 7 जुलै 2025 रोजी जनसंपर्क कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात विविध व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींचा सक्रिय सहभाग होता. आपल्या उद्घाटनपर भाषणात, सीजीएसटी आणि ठाण्याच्या केंद्रीय उत्पादन शुल्क आयुक्तांनी आयुक्तालयाच्या जीएसटी संकलनाच्या कामगिरीची …

Read More »

पीएम जनधन योजनेतील निष्क्रिय खाती बंद करण्याबाबत बँकांना कोणतेही निर्देश देण्यात आलेले नाहीत- वित्त सेवा विभाग

नवी दिल्‍ली, 8 जुलै 2025. पीएम जनधन योजनेतील निष्क्रिय खाती बंद करण्याबाबत माध्यमांमध्ये पसरलेल्या  वृत्तांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या वित्त विभागाने अशा वृत्तांचे खंडन करत, स्पष्ट केले आहे, की अशा प्रकारचे  कोणतेही निर्देश बँकांना देण्यात आलेले नाहीत. पीएम जनधन योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, अटल पेन्शन योजना तसेच इतर कल्याणकारी …

Read More »

‘कला सेतू’ स्टार्ट-अप्ससमोर भारतीय भाषांमधील मजकुरातून मल्टीमीडिया आशय निर्मितीसाठी स्केलेबल एआय साधने तयार करण्याचे ठेवत आहे आव्हान

नवी दिल्‍ली, 8 जुलै 2025. भारताच्या डिजिटल शासनाचा प्रवास वेगवान होत असताना, नागरिकांशी त्यांच्या स्वतःच्या भाषेत, तात्काळ आणि प्रभावीपणे संवाद साधण्याची क्षमता यापूर्वी कधीही नव्हती इतकी महत्त्वाची झाली आहे. लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी अर्थपूर्ण संपर्क प्रस्थापित करण्यासाठी प्रमाण, वेग आणि विविधता यांच्यासह वेग कायम राखण्यामध्ये आशय निर्मितीच्या पारंपरिक पद्धतींना मर्यादा येत आहेत. …

Read More »

ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथे 17 व्या ब्रिक्स शिखर परिषदेत पंतप्रधान झाले सहभागी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 6-7 जुलै 2025 ला  ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथे आयोजित केलेल्या सतराव्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभाग घेतला.जागतिक स्तरावर प्रशासनात सुधारणा, साउथ ग्लोबल  देशांचा आवाज अधिक बुलंद करणे, शांतता आणि सुरक्षा, बहुपक्षीयता बळकट करणे, विकासाचे मुद्दे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यासह ब्रिक्स कार्यक्रम सूचीवरील विविध मुद्द्यांवर सर्व नेत्यांनी फलदायी चर्चा केली. ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांनी  जिव्हाळ्याने केलेल्या आदरातिथ्याबद्दल आणि शिखर …

Read More »

खाजगी क्षेत्राच्या वाढत्या सहभागामुळे,आपली जबाबदारी आता नियंत्रकाची नसून,सुविधा देणाऱ्याची आहे

नवी दिल्ली, 7 जुलै 2025. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 07 जुलै 2025 रोजी नवी दिल्ली येथे महानियंत्रक, संरक्षण लेखा विभागाच्या (डीएडी) परिषदेला संबोधित केले. त्यांनी सशस्त्र दलांची परिचालन सज्जता आणि आर्थिक तत्परता यांना बळकटी देण्यात विभागाची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली. त्यांनी ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा उल्लेख केला आणि आपल्या सैन्याचे शौर्य …

Read More »

केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातर्फे बिमस्टेक देशांसाठी मुंबईत टाटा मेमोरियल केंद्रात कर्करोग उपचारासंदर्भात विशेष प्रशिक्षण कार्यक्रम

मुंबई, 7 जुलै 2025. केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने (एमईए) आज 07 जुलै 2025 रोजी मुंबईत टाटा मेमोरियल केंद्र येथे बिमस्टेक (बहुक्षेत्रीय तंत्रज्ञान आणि आर्थिक सहकार्यावर आधारित बंगालच्या उपसागराशी संबंधित उपक्रम) देशांसाठी टाटा मेमोरियल केंद्रात कर्करोग उपचारासंदर्भात विशेष प्रशिक्षण कार्यक्रम सुरु केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीच 6 व्या बिमस्टेक शिखर परिषदेत …

Read More »