Saturday, October 10 2026 | 02:13:38 PM
Breaking News

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी नामांकन अर्ज दाखल करण्याची मुदत 15 ऑगस्ट 2025 पर्यंत वाढवली

Connect us on:

नवी दिल्‍ली, 22 जुलै 2025. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी (पीएमआरबीपी) ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 15.08.2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल https://awards.gov.in येथे 01.04.2025 रोजी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली. शौर्य, सामाजिक सेवा, पर्यावरण, क्रीडा, कला आणि संस्कृती आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर असामान्य कामगिरी करणाऱ्या मुलांना (बालक) हे पुरस्कार दिले जातात.

5 वर्षांपुढील आणि 18 वर्षांपर्यंत (31 जुलै 2025 रोजी) वयाचे कोणतेही बालक, जे भारतीय नागरिक आहे आणि भारतात राहत आहे, ते या पुरस्कारासाठी पात्र आहे.

कोणत्याही नागरिकाकडून नामांकने केवळ https://awards.gov.in या राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलद्वारे प्राप्त केली जातील. पुरस्कारांसाठी केवळ ऑनलाईन माध्यमातून केलेले स्व-नामांकन आणि शिफारशी दोन्ही विचारात घेतले जाईल. अधिक माहितीसाठी, कृपया पुढील राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलला भेट द्या: https://awards.gov.in.

About Matribhumi Samachar

Check Also

भविष्यातील पर्यावरण आणि हवामान बदल: NGT परिषदेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे महत्त्वपूर्ण संदेश

नवी दिल्ली येथे राष्ट्रीय हरित प्राधिकरणाने (NGT) आयोजित केलेल्या ‘भविष्यातील पर्यावरण आणि हवामानातील बदल’ या …