नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी 2025. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरु रविदासजींच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटले आहे की “गुरु रविदासजींच्या जयंतीच्या पावन प्रसंगी मी सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा देते. गुरु रविदासजी हे एक महान भारतीय संत होते ज्यांनी आपल्या लेखनातून सर्वांना एकता आणि बंधुत्वाचा संदेश दिला. …
Read More »संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बेंगळुरू येथील एअरो इंडिया 2025 मध्ये भारत, आयडीईएक्स आणि कर्नाटक पॅव्हेलियनचे केले उद्घाटन
नवी दिल्ली, 10 फेब्रुवारी 2025. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 10 फेब्रुवारी 2025 रोजी बेंगळुरू येथे एअरो इंडिया 2025 मध्ये भारत, आयडीईएक्स आणि कर्नाटक पॅव्हेलियनचे उद्घाटन केले. भारत पॅव्हेलियन हे देशातील संरक्षण उद्योगांचा ढाचा, विकास, नवोन्मेष आणि उत्पादन क्षमतांचे सादरीकरण करत आहे, जे अत्याधुनिक उत्पादने आणि तंत्रज्ञानाद्वारे दर्शवले जात आहे. हे …
Read More »व्यापार आणि आर्थिक भागीदारी करार (टी ए पी ए ) अंतर्गत व्यापार आणि गुंतवणुकीला चालना देण्यासाठी भारत, युरोपियन मुक्त व्यापार संघटना (ई एफ टी ए ) मंचाचे उदघाटन करणार
युरोपियन मुक्त व्यापार संघटनेसोबतचे द्विपक्षीय संबंध द्विगुणित करण्याच्या उद्देशाने केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल नवी दिल्लीत भारत मंडपम येथे 10, फेब्रुवारी 2025 रोजी भारत युरोपियन मुक्त व्यापार संघटना (ई एफ टी ए ) मंचाचे उदघाटन करणार आहेत. यावेळी भारत युरोपियन मुक्त व्यापार संघटनेच्या प्रतिनिधी, स्विस राज्य सचिव हेलेन बडलिगर आर्टिडा, नॉर्वेचे व्यापार आणि उद्योग राज्य …
Read More »गुजरातमध्ये भुईमूग खरेदीला 6 दिवसांच्या आणि कर्नाटकमध्ये 25 दिवसांच्या मुदतवाढीला केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांची मान्यता
नवी दिल्ली, 10 फेब्रुवारी 2025. केंद्र सरकारने 15 व्या वित्त आयोगाच्या काळात 2025-26 पर्यंत एकात्मिक प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान (पीएम-आशा) योजना सुरू ठेवण्यास मान्यता दिली. एकात्मिक प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान (पीएम-आशा) योजनेत मूल्य समर्थन योजना (पीएसएस), मूल्य तूट भरणा योजना (पीडीपीएस), बाजार हस्तक्षेप योजना (एमआयएस) आणि मूल्य स्थिरीकरण निधी …
Read More »फ्रान्स आणि अमेरिका दौऱ्याला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निवेदन
नवी दिल्ली, 10 फेब्रुवारी 2025. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी दिलेल्या निमंत्रणाला प्रतिसाद म्हणून मी 10 ते 12 फेब्रुवारी या दरम्यान फ्रान्सला भेट देणार आहे. पॅरिसमध्ये पोहोचल्यावर, मी तिथे होणार असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ताविषयक कृती शिखर परिषदेचे सहअध्यक्षपद भूषविण्यासाठी उत्सुक आहे. या शिखर परिषदेत जगभरातील नेते आणि तंत्रज्ञान क्षेत्रातले जगभरातले अनेक मुख्य कार्यकारी …
Read More »यंदाच्या परीक्षा पे चर्चा या संवादात्मक उपक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला
नवी दिल्ली, 10 फेब्रुवारी 2025. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील सुंदर नर्सरी येथील विद्यार्थ्यांशी ‘परीक्षा पे चर्चा’ (पीपीसी) कार्यक्रमाद्वारे संवाद साधला. संवादात्मक उपक्रमाचा हा 8 वा भाग होता. देशभरातील विद्यार्थ्यांशी अनौपचारिक संवाद साधताना पंतप्रधानांनी विविध विषयांवर चर्चा केली. हिवाळ्यात शरीर उबदार ठेवण्यासाठी पारंपरिकपणे दिल्या जाणाऱ्या तिळापासून बनवलेल्या मिठाईंचे वाटप …
Read More »दिल्लीतील आर्मी हॉस्पिटल (रिसर्च अँड रेफरल) येथील नर्सिंग महाविद्यालयाच्या अकराव्या तुकडीच्या 29 नर्सिंग कॅडेट्सचा दीपप्रज्वलन समारंभ संपन्न
दिल्लीतील आर्मी हॉस्पिटल (रिसर्च अँड रेफरल) येथील नर्सिंग महाविद्यालयाच्या अकराव्या तुकडीच्या 29 नर्सिंग कॅडेट्सचा दीपप्रज्वलन समारंभ 8 फेब्रुवारी 2025 रोजी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात वरिष्ठ अधिकारी, लष्करी परिचारक सेवेतील अधिकारी, निवृत्त अधिकारी, सिव्हिल नर्सिंग विद्यालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते. लेफ्टनंट जनरल शंकर नारायण, कमांडंट, एएच (आर अँड आर) यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांना व्यावसायिक दर्जा राखण्यासाठी प्रेरितही केले. …
Read More »महाकुंभ 2025: प्रयागराज येथे भाविकांसाठी परवडणाऱ्या दरात दर्जेदार शिधा पुरवण्यासाठी विशेष योजना
महाकुंभ 2025 दरम्यान प्रयागराज येथे भाविकांना परवडणाऱ्या दरात दर्जेदार शिधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने विशेष योजना सुरू केली आहे. नाफेड – (राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ – नॅशनल अॅग्रीकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया) कडून गहू पीठ, डाळी, तांदूळ आणि इतर आवश्यक वस्तू अनुदानित दराने वितरित केल्या जात आहेत. भाविकांना व्हॉट्सअॅप किंवा दूरध्वनीद्वारेही …
Read More »विदर्भाचे खरे सामर्थ्य खासदार औद्योगिक महोस्तवातून सादर – केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री मंत्री पियुष गोयल यांचे प्रतिपादन
नागपूर 9 फेब्रुवारी 2025. भारताने औद्योगिक क्रांतीचे नवे स्वरूप 4.0 ही संधी गमावून चालणार नाही असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले असून औद्योगिक क्षेत्राकडून त्यांच्या अपेक्षा आहेत. अश्यातच खासदार औद्योगिक महोस्तव या आयोजनातून आपण विदर्भाचे खरे सामर्थ्य सादर केल्याचे प्रतिपादन प्रतिपादन मुख्य अतिथी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी आज केले. असोसिएशन फॉर …
Read More »शेतकऱ्यांकडे राजकीय ताकद आणि आर्थिक क्षमता आहे ; त्यांनी कोणाच्याही मदतीवर अवलंबून राहू नये – उपराष्ट्रपती जगदीप धनखड
शेतकरी हे अन्नदाते आहेत, त्यांनी कोणाच्याही मदतीवर अवलंबून राहू नये, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले. ते आज चित्तोडगड येथे अखिल मेवाड प्रदेश जाट महासभेला संबोधित करत होते. “जेव्हा शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारते तेव्हाच देशाची परिस्थिती सुधारते. कारण, शेतकरी हेच अन्नदाते आहेत. त्यामुळे त्यांनी कोणाकडेही पाहू नये किंवा मदतीसाठी कोणावरही अवलंबून राहू …
Read More »
Matribhumi Samachar Marathi