Thursday, January 01 2026 | 05:18:08 AM
Breaking News

Tag Archives: Draupadi Murmu

राष्ट्रपतींनी आयएनएस वाघशीर या पाणबुडीमधून केला प्रवास

नवी दिल्‍ली, 28 डिसेंबर 2025. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पश्चिम किनाऱ्यावर पाणबुडी आयएनएस वाघशीरमधून पाण्याखालून प्रवास केला. नौदलप्रमुख ऍडमिरल दिनेश के. त्रिपाठी यावेळी राष्ट्रपतींसोबत होते. त्यांनी आज (डिसेंबर 28, 2025) कर्नाटकातील कारवार नौदल बंदर येथे पाणबुडीमध्ये प्रवेश केला. सुमारे 2 तास चाललेल्या या फेरीदरम्यान त्यांनी पाणबुडीतील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला आणि …

Read More »

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ’प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ प्रदान

नवी दिल्‍ली, 26 डिसेंबर 2025. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (26 डिसेंबर 2025) नवी दिल्ली येथे आयोजित एका समारंभात, शौर्य, समाजसेवा, पर्यावरण, क्रीडा, कला आणि संस्कृती, तसेच विज्ञान- तंत्रज्ञान या क्षेत्रांत अपवादात्मक कामगिरी करणाऱ्या मुलांना  “प्रधानमंत्री  राष्ट्रीय बाल पुरस्कार’’ प्रदान केले. या प्रसंगी बोलताना राष्ट्रपतींनी प्रधानमंत्री  राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन …

Read More »

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते संथाली भाषेतील भारतीय राज्यघटनेचे प्रकाशन

नवी दिल्‍ली, 25 डिसेंबर 2025. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (25 डिसेंबर 2025) राष्ट्रपती भवन येथे आयोजित एका समारंभात संथाली भाषेमधील भारतीय राज्य घटनेचे प्रकाशन केले. यावेळी राष्ट्रपतींनी उपस्थितांना संबोधितही केले. या प्रकाशनामुळे भारतीय राज्यघटना आता ‘ओल चिकी’ लिपी आणि संथाली भाषेत उपलब्ध झाली असल्याचे त्यांनी सांगितले. संथाली भाषिकांसाठी ही अभिमानाची …

Read More »

भारतीय संरक्षण लेखा सेवेच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

नवी दिल्‍ली, 24 डिसेंबर 2025. भारतीय संरक्षण लेखा सेवेतील  (2025 तुकडी) प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी आज (24 डिसेंबर, 2025) राष्ट्रपती भवनात  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. यावेळी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन  करताना राष्ट्रपती म्हणाल्या की, भारतीय संरक्षण लेखा सेवेचे अधिकारी भारतीय सशस्त्र दल आणि संबंधित संस्थांच्या आर्थिक संसाधनांच्या व्यवस्थापनात एक महत्त्वाचे स्थान भूषवतात. अर्थसंकल्प …

Read More »

राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रपती भवनात ‘परम वीर दीर्घा’चे उद्घाटन

नवी दिल्ली, 16 डिसेंबर 2025. राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी आज 16 डिसेंबर 2025 रोजी विजय दिनाच्या निमित्ताने राष्ट्रपती भवन येथे ‘परम वीर दीर्घा’चे उद्घाटन केले. या दालनामध्ये परम वीर चक्र ने सन्मानित सर्व 21 योद्ध्यांची पोर्ट्रेट्स प्रदर्शित करण्यात आली आहेत. देशाच्या रक्षणासाठी ज्यांनी असामान्य निर्धार आणि अदम्य भावनेचे दर्शन घडवले …

Read More »

तीन देशांच्या राजदूतांनी आपली ओळखपत्रे राष्ट्रपतींना सादर केली

नवी दिल्ली, 15 डिसेंबर 2025. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन येथे आज 15 डिसेंबर 2025 रोजी इराण, बृनेई दारुस्सलाम, मायक्रोनेशिया या तीन देशांच्या राजदूतांकडून त्यांची ओळखपत्रे स्वीकारली. पुढील व्यक्तींनी आपले ओळखपत्र यावेळी सादर केले- 1. मोहम्मद फथली , इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणचे राजदूत 2. सिती आर्नीफारिजा मोहम्मद जैनी,बृनेई …

Read More »

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने आयोजित केलेल्या मानवाधिकार दिनाच्या समारंभाचे राष्ट्रपतींनी भूषविले अध्यक्षस्थान

नवी दिल्ली, 10 ऑक्टोबर 2025 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (दिनांक 10 डिसेंबर 2025) नवी दिल्ली येथे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने आयोजित केलेल्या मानवाधिकार दिन समारंभाचे अध्यक्षस्थान भूषविले  आणि उपस्थितांना संबोधित केले. मानवी हक्क अविभाज्य आहेत आणि ते एका न्याय्य, समतापूर्ण आणि क्षमाशील समाजाचा पाया रचतात,यांचे स्मरण करून देण्याचा हा दिवस …

Read More »

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय हस्तकला पुरस्कार 2023 आणि 2024 चे वितरण

नवी दिल्ली, 9 डिसेंबर 2025 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (9 डिसेंबर 2025) नवी दिल्ली येथे 2023 आणि 2024 या वर्षांसाठीचे राष्ट्रीय हस्तकला पुरस्कार प्रदान केले. कला आपल्या भूतकाळातील आठवणींना, वर्तमानकाळातील अनुभवांना आणि भविष्यातील महत्त्वाकांक्षांना प्रतिबिंबित करते,  प्राचीन काळापासून मानव आपल्या भावभावना चित्र किंवा शिल्पांच्या माध्यमातून व्यक्त करत आला आहे. …

Read More »

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी वर्ष 2025 साठीचे दिव्यांग व्यक्ती सक्षमीकरण राष्ट्रीय पुरस्कार केले प्रदान

नवी दिल्ली, 3 डिसेंबर 2025. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (3 डिसेंबर 2025) आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनाच्या निमित्ताने नवी दिल्ली येथे 2025 साठी दिव्यांग व्यक्ती सक्षमीकरण राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केले. समानता हा दिव्यांग व्यक्तींचा देखील अधिकार आहे. समाज आणि  राष्ट्राच्या विकासाच्या यात्रेत त्यांचा समान सहभाग सुनिश्चित करणे हे  दानधर्माचे कार्य नव्हे तर …

Read More »

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची पादत्राणे डिझाइन आणि विकास संस्थेच्या दीक्षांत समारंभाला उपस्थिती

नवी दिल्ली, 1 डिसेंबर 2025. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज (1 डिसेंबर 2025) नवी दिल्ली येथील पादत्राणे डिझाइन आणि विकास संस्थेच्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहिल्या. पादत्राणांचे उत्पादन आणि वापराच्या बाबतीत भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे, असे राष्ट्रपती म्हणाल्या. 2024-25 या आर्थिक वर्षात, भारताची पादत्राण निर्यात 2500 कोटी अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त होती, तर …

Read More »