Sunday, December 07 2025 | 07:53:01 PM
Breaking News

Tag Archives: Prime Minister

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रधान मंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार केले प्रदान

नवी दिल्‍ली, 26 डिसेंबर 2024 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (26 डिसेंबर 2024) राष्ट्रपती भवनातील सांस्कृतिक केंद्र येथे आयोजित समारंभात 7 श्रेणीत 17 मुलांना त्यांच्या असामान्य कामगिरीबद्दल प्रधान मंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान केले.     यावेळी बोलताना राष्ट्रपतींनी सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले तसेच संपूर्ण देशाला आणि समाजाला त्यांचा …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 डिसेंबर रोजी नवी दिल्लीत वीर बाल दिवस कार्यक्रमात होणार सहभागी

नवी दिल्‍ली, 25 डिसेंबर 2024 पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे 26 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 12 वाजता वीर बाल दिवस या देशव्यापी उत्सवात सहभागी होणार आहेत. भारताचा भविष्याचा पाया असणाऱ्या लहान मुलांना सन्मानित करण्यासाठी या उत्सवाचे आयोजन केले जाते. पंतप्रधान यावेळी उपस्थितांना संबोधित करणार आहेत. पंतप्रधान ‘सुपोषित …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशात खजुराहो येथे केली केन-बेतवा नदी जोड राष्ट्रीय प्रकल्पाची पायाभरणी

नवी दिल्‍ली, 25 डिसेंबर 2024 माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंतीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशात खजुराहो येथे विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी भारत आणि जगभरातील ख्रिस्ती समुदायाच्या लोकांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या. डॉ. मोहन यादव यांच्या नेतृत्वाखालील …

Read More »

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त, 25 डिसेंबर रोजी मध्य प्रदेशात केन-बेतवा नदी जोड राष्ट्रीय प्रकल्पाची पंतप्रधान करणार पायाभरणी

नवी दिल्ली, 24 डिसेंबर 2024 माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 डिसेंबर रोजी मध्यप्रदेशला भेट देणार आहेत. पंतप्रधान दुपारी 12:30 वाजता  खजुराहो मधील अनेक विकास प्रकल्पांचे उद्‌घाटन आणि पायाभरणी यावेळी करणार आहेत. यावेळी राष्ट्रीय नदीजोड योजनेअंतर्गत, विविध प्रांतातील नद्यांना जोडणारा देशातील पहिला प्रकल्प केन-बेतवा या नद्यांना जोडणाऱ्या …

Read More »

माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले त्यांचे स्मरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांचे त्यांच्या जयंतीदिनी स्मरण केले. X या समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधानांनी म्हटले आहे: “गरीब आणि शेतकऱ्यांचे खरे हितचिंतक माजी पंतप्रधान भारतरत्न चौधरी चरण सिंह जी यांना त्यांच्या जयंती दिनी विनम्र अभिवादन. राष्ट्राप्रती त्यांचे समर्पण आणि सेवाभाव प्रत्येकाला प्रेरित करत राहील.” …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारी विभाग आणि संघटनांमध्ये नियुक्त झालेल्या नवनियुक्तांना रोजगार मेळ्या अंतर्गत केले 71,000 पेक्षा जास्त नियुक्तीपत्रांचे वितरण

नवी दिल्ली, 23 डिसेंबर 2024 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून रोजगार मेळाव्याला संबोधित केले आणि सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नवनियुक्त 71,000 हून अधिक युवांना नियुक्ती पत्रांचे वितरण केले. हा रोजगार मेळा पंतप्रधानांच्या रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्याच्या वचनबद्धतेला अधोरेखित करत असून युवकांना राष्ट्रउभारणी आणि आत्मसक्षमीकरणात योगदान देण्यासाठी अर्थपूर्ण …

Read More »

रोजगार मेळाव्या अंतर्गत पंतप्रधान उद्या २३ डिसेंबर रोजी केंद्र सरकारच्या विभागांमध्ये नव्याने नियुक्त झालेल्या ७१,००० हून अधिक उमेदवारांना नियुक्ती पत्रांचे वितरण करणार

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी हे उद्या म्हणजे २३ डिसेंबर रोजी सकाळी १०:३० वाजता दूरस्थ पद्धतीने नव्याने नियुक्त झालेल्या उमेदवारांना ७१,००० हून अधिक उमेदवारांना नियुक्ती पत्रांचे वितरण करणार आहेत. या प्रसंगी ते उपस्थितांना संबोधित देखील करणार आहेत. रोजगार मेळावा हा पंतप्रधान यांच्या रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या वचनाची पूर्तता करण्याच्या दिशेने …

Read More »

नवी दिल्लीतील सीबीसीआय सेंटरमध्ये 23 डिसेंबर रोजी कॅथलिक बिशप्स कॉन्फरन्स ऑफ इंडियाद्वारे आयोजित नाताळ उत्सव कार्यक्रमात पंतप्रधान होणार सहभागी

पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 डिसेंबर रोजी संध्याकाळी 6:30 वाजता नवी दिल्ली येथील कॅथलिक बिशप्स कॉन्फरन्स ऑफ इंडिया (सीबीसीआय) केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या नाताळ विशेष कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान ख्रिस्ती समुदायातील कार्डिनल, बिशप आणि चर्चचे इतर प्रमुख नेत्यांशी संवाद साधतील. पंतप्रधान कॅथलिक चर्चच्या मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. …

Read More »

पंतप्रधानांचा कुवेतच्या सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

कुवेतचे अमीर, महामहिम शेख मशाल अल-अहमद अल-जाबेर अल-सबा यांनी पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांना कुवेतचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार “ऑर्डर ऑफ मुबारक अल-कबीर” प्रदान केला. या प्रसंगी कुवेतचे पंतप्रधान महामहिम शेख अहमद अल-अब्दुल्ला अल-अहमद अल-सबा देखील उपस्थित होते. पंतप्रधानांनी हा पुरस्कार भारत आणि कुवेत यांच्यातील दीर्घकालीन मैत्रीला, कुवेतमधील भारतीय समुदायाला आणि 1.4 अब्ज भारतीय नागरिकांना समर्पित …

Read More »

कुवेत दौऱ्यावर रवाना होणापूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेले निवेदन

कुवेतचे अमीर अमीर शेख मेशाल अल – अहमद अल – जाबेर अल – सबाह यांच्या निमंत्रणावरून आज मी दोन दिवसांच्या कुवेत दौऱ्यावर रवाना होत आहे. गेल्या अनेक पिढ्यांपासून कुवेतसोबत जपल्या गेलेले ऐतिहासिक नाते खूपच महत्वाचे असल्याचेच आम्ही मानतो. आम्ही केवळ व्यापार आणि ऊर्जा क्षेत्रातील मजबूत भागीदार नाही, तर पश्चिम आशिया क्षेत्रातील …

Read More »