गुरुवार, सितंबर 10 2026 | 04:01:57 PM

गेल्या 2 वर्षात 1,68,964 निवृत्ती वेतन विषयक तक्रारींचे निवारण करण्यात आले : केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह

Saransh Kanaujia
Saransh Kanaujia - Editor
6 Min Read

केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज लोकसभेत तक्रारींच्या निपटाऱ्यासंबंधी विविध प्रश्नांना उत्तरे दिली. हे प्रश्न सुलभतेपासून ते निवृत्तीवेतनधारकांच्या तक्रारींच्या निपटाऱ्यापर्यंत विस्तृत स्वरूपाचे होते.

सीपीग्राम वापरणाऱ्या नागरिकांसाठी सुलभता : सरकारने दुर्गम आणि ग्रामीण भागातील नागरिकांची सुलभता वर्धित करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. यामुळे देशभरातील 795 जिल्ह्यांमधून सीपीग्राम म्हणजेच केंद्रीकृत सार्वजनिक तक्रार निवारण आणि देखरेख प्रणाली (CPGRAMS) पोर्टलवर सरासरी 70,000 मासिक नागरिक नोंदणी या दराने 28 लाखांहून अधिक नागरिकांची नोंदणी झाली आहे. सामान्य सेवा केंद्रांच्या ग्रामस्तरीय नवउद्योजकांच्या नेटवर्कचा लाभ घेण्यासाठी सरकारने 5.6 लाख गावांमध्ये सामान्य सेवा केंद्रांसोबत सहयोग  केला आहे.

2023 आणि 2024 मध्ये सामायिक सेवा केंद्रांद्वारे 4.68 लाख तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. सीपीग्राम ची जागरूकता आणि उपयोगिता वाढविण्यासाठी सरकारने सीपीग्रामच्या 10 टप्प्यातील सुधारणा स्वीकारल्या आहेत.

तक्रारींचे निराकरण आणि सीपीग्राम: केंद्रीकृत निवृत्तीवेतन तक्रार निवारण आणि देखरेख प्रणाली (CPENGRAMS) ने अनुशेष कमी केला आहे. त्यामुळे आजच्या तारखेला कोणतीही तक्रार  2 वर्षांपेक्षा जास्त काळ प्रलंबित नाही. गेल्या दोन वर्षात (01.11.2022 ते 31.10.2024 पर्यंत) 1,68,964 तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे.

कौटुंबिक निवृत्तीवेतनधारक आणि अति-ज्येष्ठ निवृत्तीवेतनधारकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी, अशा तक्रारींचे विशिष्ट वर्गीकरण करण्यात आले असून योग्य देखरेखीसाठी त्यात कौटुंबिक निवृत्ती वेतन आणि अतिरिक्त निवृत्तीवेतन सुरू होण्यास होणारा विलंब यांचा समावेश आहे. याशिवाय, अशा प्रकरणांसाठी नियमित स्मरणपत्रे जारी केली जातात आणि मासिक आंतर-मंत्रालय पुनरावलोकन बैठका (IMRM) आयोजित केल्या जातात. तसेच, 100 दिवसांच्या कृती योजनेंतर्गत, कौटुंबिक निवृत्तीवेतन तक्रारींचे निवारण करण्यासाठी एक महिनाभर चालणारी विशेष मोहीम जुलै, 2024 मध्ये सुरू करण्यात आली, ज्यातून 94% तक्रारींचे निवारण साध्य करण्यात आले.

सरकारने तक्रारींचे निवारण वेळेवर, अर्थपूर्ण आणि सुलभ करण्यासाठी सीपीग्राम च्या 10 टप्प्यातील सुधारणा स्वीकारल्या आहेत आणि सीपीग्राम पोर्टलवर 103,183 तक्रार अधिकारी नियुक्त केले आहेत. यामुळे शासनाच्या कामकाजातील प्रलंबितता कमी होण्यास मदत झाली. 31 ऑक्टोबर 2024 रोजी भारतातील सार्वजनिक तक्रारींची संख्या 54,339 इतकी म्हणजेच सर्वात खालच्या स्तरावर होती. तक्रार निवारणाचा सरासरी कालावधी 2019 मधील 28 दिवसांवरून 2024 मध्ये 13 दिवसांवर आला आहे. सरकारने 23 ऑगस्ट 2420 रोजी सार्वजनिक तक्रारींच्या प्रभावी निवारणासाठी व्यापक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये समाकलनाची कल्पना करण्यात आली असून विविध सार्वजनिक तक्रार मंच, मंत्रालये आणि विभागांमध्ये समर्पित तक्रार कक्षाची निर्मिती, अनुभवी आणि सक्षम नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती, तक्रारींच्या मूळ कारणांचे विश्लेषण आणि अभिप्रायानुसार कारवाईवर भर, अपीलीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करून निवारण प्रक्रियांना वाढीव बळकटी देणे, तक्रार निवारण करण्याची मार्गदर्शक तत्त्वे आणि निवारण कालावधी आणखी कमी करून त्याची महत्तम मर्यादा 30 दिवसांवरून कमी करून तो 21 दिवसांपर्यंत आणण्याबाबत सूचना दिल्या आहेत.

Annex-1

 

Year

Brought ForwardReceipt During PeriodTotal ReceiptTotal Disposed in the year
20201071603227127033428732319569
20211023304200059030238942135923
2022887971191823828062092143468
2023662741195305726157982307674
2024(1stJan- 31st October, 2024) 

308124

 

2298208

 

2606332

 

2324323

Total104413631439510611230957

Annex-II

 

State

Brought

Forward

Receipt During

Period

Total

Receipt

Total

Disposed*

Government of Andaman & Nicobar85551055955565
Government of Andhra Pradesh29985369446692963322
Government of Arunachal Pradesh548235429022686
Government of  Assam28072124513152585146742
Government of  Bihar60836161395222231214078
Government of  Chattisgarh5492433434883546860
Government of Goa1712733390458195
Government of Gujarat9024259661268685261927
Government of  Haryana45802152271198073186511
Government of  HimachalPradesh19520202543977434174
Government of  JammuandKashmir14759342514901042806
Government of  Jharkhand2837986485114864105266
Government of  Karnataka4217994391136570127779
Government of  Kerala27008475637457169465
Government of  MadhyaPradesh99601177726277327272846
Government of  Maharashtra119868207274327142306027
Government of  Manipur1662644181035930
Government of  Meghalaya1545277743223812
Government of  Mizoram515164221571486
Government of  Nagaland280201822981045
Government of NCT of Delhi14514143509158023152370
Government of Odisha29692653409503276966
Government of  Puducherry628824388718778
Government of Punjab16701100015116716113604
Government of Rajasthan108046144061252107249814
Government of Sikkim766124020061984
Government of TamilNadu23673107019130692123236
Government of Telangana5781373404312142837
Government of  Tripura551741679677702
Government of Union Territory of

Chandigarh

 

320

 

19887

 

20207

 

19988

Government of Union Territory of  Dadra & Nagar Haveli 

52

 

1763

 

1815

 

1696

Government of Union Territory of

Daman & Diu

 

37

 

1848

 

1885

 

1670

Government of Union Territory of

Ladakh

 

6

 

1036

 

1042

 

980

Government of  Union Territory of

Lakshadweep

 

2

 

1053

 

1055

 

1030

Government of Uttar Pradesh115976112677612427521230604
Government  of  Uttarakhand4113168729109860106962
Government of West Bengal469697404312101283392
Total941717338346443251814130135

भारत : 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि) व/या भारत : 1857 से 1957 (इतिहास पर एक दृष्टि) पुस्तक अपने घर/कार्यालय पर मंगाने के लिए आप निम्न लिंक पर क्लिक कर सकते हैं

सारांश कनौजिया की पुस्तकें

 

ऑडियो बुक : भारत 1885 से 1950 (इतिहास पर एक दृष्टि)

Related Post

Share This Article
Follow:
लेखक वर्ष 2011 से पत्रकारिता के क्षेत्र में सक्रिय हैं। अब तक वे इतिहास से जुड़ी चार पुस्तकों का लेखन कर चुके हैं—‘भारत : 1857 से 1957 इतिहास पर एक दृष्टि’, ‘भारत : 1885 से 1950 इतिहास पर एक दृष्टि’, ‘गाँधी जी की राजनीतिक यात्रा के कुछ पन्ने’ और ‘1857 का स्वतंत्रता समर – कारण से परिणाम तक’। पत्रकारिता के क्षेत्र में वे विशेष रूप से राजनीति, अर्थव्यवस्था, सामाजिक विषयों और आध्यात्म से जुड़े समाचारों एवं विषयों पर लेखन करते रहे हैं। वर्षों के पत्रकारिता अनुभव और विभिन्न विषयों पर निरंतर लेखन के माध्यम से उन्होंने समसामयिक घटनाओं के साथ-साथ ऐतिहासिक, सामाजिक और आध्यात्मिक विषयों को भी पाठकों तक पहुँचाने का प्रयास किया है।