अणु उर्जा विभागाच्या हेवी वॉटर बोर्ड (एचडब्ल्यूबी) ने न्यूक्लिओइलेक्ट्रिका अर्जेंटिना एस.ए (नासा) समवेत जड पाण्याच्या पुरवठ्यासाठी करार केला आहे. हे पाणी अर्जेंटिनामधील नासा द्वारे संचालित प्रेशराईज्ड हेवी वॉटर रिएक्टर्स (पीएचडब्ल्यूआर) यासाठी वापरण्यात येईल. चार वर्षांच्या कालावधीचा हा करार 4 नोव्हेंबर 2024 रोजी झाला.
या प्रसंगी एचडब्ल्यूबी चे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी एस. सत्यकुमार यांनी नमूद केले की, हा करार भारत आणि अर्जेंटिनामधील सामायिक दृष्टीकोन, त्यांची उत्कृष्टतेसाठीची वचनबद्धता आणि विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रगती करण्यासाठी त्यांची सामूहिक समर्पणाची भावना दर्शवतो. त्यांनी असेही सांगितले की, उत्कृष्टतेच्या शोधात एकत्र आलेल्या समान विचारसरणीच्या संस्थांमध्ये असलेले सामर्थ्य आणि क्षमता या सहकार्यामुळे ठळकपणे अधोरेखित होते.
हा करार एक आभासी समारंभात करण्यात आला, ज्यात मुंबईतील अणुशक्ती भवन, ओवायसी, डीएइ मधून एस. सत्यकुमार यांनी आणि अर्जेंटिनामधील ब्युनोस आयर्स येथून नासा चे अध्यक्ष अल्बर्टो लामाग्ना यांनी स्वाक्षरी केली.