‘सार्वजनिक प्रशासन आणि शासन सुधारणा क्षेत्रातील सहकार्य’ यावर भारत-मलेशिया संयुक्त कार्यगटाची बैठक झाली. प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रारी विभागाचे सचिव व्ही. श्रीनिवास आणि सार्वजनिक सेवा (विकास) उपमहासंचालक दातुक डॉ. अनेसी बिन इब्राहिम यांनी संयुक्तपणे संयुक्त कार्यगटाचे अध्यक्षपद भूषवले. या बैठकीला राष्ट्रीय सुशासन विभागाचे महासंचालक डॉ. सुरेंद्रकुमार बागडे; प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रारी विभागाचे अतिरिक्त सचिव पुनीत यादव आणि दोन्ही देशांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मलेशियातील भारताचे उच्चायुक्त बी.एन. रेड्डी यांनी बैठकीचे सूत्रसंचालन केले.
उभय देशांनी प्रशासकीय सुधारणा आणि सुशासनातील घडामोडी सामायिक केल्या.
संयुक्त कार्यगटाच्या बैठकीचे फलित म्हणून, दोन्ही देशांनी पुढील बाबींवर सहमती दर्शवली:
- एनसीजीजी च्या माध्यमातून मलेशियाच्या नागरी सेवकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम तयार करण्यासाठी एक संयुक्त कार्य गट स्थापन करणे. संयुक्त कार्यकारी गटात डीएपीआरजी, पीएसडी, मलेशिया, एनसीजीजी मधील सदस्य आणि परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी यांचा समावेश असेल.
- दोन्ही सरकारांद्वारे सर्वोत्तम पद्धतींचे आदानप्रदान करण्यासाठी एक संयुक्त वेबिनार आयोजित करणे ज्यामध्ये सरकारचे योग्य प्रतिनिधित्व, सार्वजनिक सेवा कायदा; दोन्ही सरकारांद्वारे सर्वोत्तम पद्धतींच्या वाटणीसाठी कामगिरीवर आधारित पुरस्कार इ. समावेश असेल.